बाळराजे

Submitted by कौतुक शिरोडकर on 8 February, 2009 - 23:18

बाळराजे रुसले आणि खिडकीत जाऊन बसले
काय झाले, काय घडले, कुण्णा नाही कळले

मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये, राग मोठा मोठा
लाल नाक, गुबरे गाल, शब्द नाही ओठा
सोन्या, राजा, बाळा, सारे समजूत काढून हरले

आई, बाबा, आज्जा, आजी, सारे पडले कोड्यात
बाळाने का कट्टी घेतली, येत नाही डोक्यात
कोणी काढली कळ त्याची , कुणामुळे फ़ुगले ?

आई देई पुरणपोळी, बाबा लाडू, पेढे
आजी हाती चॉकलेट मोठे, ज्यात काजू पुढे
आज्जा मात्र हात टेकवून घोडा होऊन सजले

खुशामत करती सारे, म्हणती झाले काय?
खोडी काढली कोणी तुझी, नाव त्याचे काय ?
सारे जण गुडघ्यावर, कान धरून बसले

शेवटी आले बाळ घेऊन एक फोटो अलबम
ज्यात होते सारेजण खुशीमध्ये एकदम
मम्मी पप्पांच्या लग्नाला मला का नाही नेले ?

बाळाच्या या प्रश्नावरी, सारे खो खो हसले
त्यांच्या अशा हसण्याने, बाळ राजे चिडले
पुन्हा घेतली कट्टी आणि पुन्हा राजे रूसले

गुलमोहर: 

मस्त. Biggrin
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

छान Happy

छान.

Lol खर आहे माझा मुलागा पण हेच विचारतो.... Happy छान.

व्वा! अत्यन्त सुंदर! मुला-मुलींना खूप भावेल.

शरद

कौतुकजी एकदम मस्त....

किशोर ब. पांचाळ