Submitted by गणेश कुलकर्णी on 17 March, 2009 - 10:45
झोप झोप रे बाळा!|| धृ||
वासरे आली गायीच्या पोटाशी...
तशी डोळ्यांच्यां पापण्यांची
मिटण्याची घाई! ||१||
झोपली धरणी माय...
आभाळात चांदोबाचां
दिसतोय गाव ||२||
काजव्यांचा येतोय थवा...
तुला पाहण्यासाठी,
पारिजातकाने केव्हाच टाकलाय
सडा दाराशी! ||३||
मायेचा भरला गारवा...
या सर्व नभात,
तुला मिळेल उब रे माझ्या
पदरात! ||४||
झोप झोप रे बाळा!...
:गणेश कुलकर्णी (समीप)
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख,
सुरेख, गणेशजी !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )