जशास तसे म्हणजे Tit For Tat

Submitted by सत्यजित on 13 January, 2009 - 02:20

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची सांगतो तुम्हा fact (फॅक्ट)

कोल्होबा करकोचा होते सख्खे मित्र
दोघांनाही दोघांवाचुन नव्हत कुणी तिसरं

करकोचा कोल्होबाला रोज देई मासे
कोल्होबाच्या शिकारीतले खाई तो जरासे

कोल्होबाच झाल लग्न भेटली त्याला कोल्हीण
भोळ्या करकोचाला कुणी भेटे ना सोबतीण

कोल्होबाला आला होता कंटाला शिकारीचा
कोल्हीणीला म्हणाला बेत करना खिरीचा

कोल्हीण म्हणाली...
खिर खायला आले जर करकोचा भावजी
अर्धीच वाटी मिळेल एका वाटी ऐवजी

कोल्होबाला कळेना आता करावे काय?
ऐनवेळी मित्राला म्हणणार कस नाय

करकोचाला वाढली खिर पसरट वाटीत
करकोचाच्या खिर काही येईना चोचीत

मिटक्या मारीत कोल्होबानी संपवली खिर
अरे लवकर खा ना मित्रा, किती करिशी उशीर?

कोल्होबा प्राण्यांत हुशार तर करकोचा पक्षांत
लबाडीचा डाव त्याच्या आला लगेच लक्षात

हमम... आता बिचारा करकोचा काय करणार...? असा लबाड मित्र असल्यावर
पण तो पण मोठा हुश्शार हं.. तो म्हणाला कोल्होबाला...

मस्त होती खिर मित्रा आता तू ये जेवायला
मस्त ताजे ताजे मासे देतो तुला खायला

कोल्होबाला मोठी गंम्मत वाटली, अरे वाह कस फसवलं करकोचाला.. वरती हा मला मासे खायला बोलवतो आहे...आहा...आता मस्त मास्यांवर ताव मारु

कोल्हा दोन दिवस उपवास करुन...
दोन दिवस उपवास करुन गेला करकोच्याच्या घरी
मास्यांवर ताव मारण्या तयार होती स्वारी

कोल्होबाही बसला करकोचांच्या संगतीत
वाटी नाही.. ताट नाही.. फक्त सुरयां होत्या पंगतीत (!)

लांब तोंडाच्या सुरईत भरले होते मासे
सुरईत तोंड जाईना आता खावे बरे कसे ?

मास्यांचा वास आणि भुक लागली होती सडकून
हरवेपणा केला आणि तोंड पडले अडकुन.. हा हा...

मोठ्या मुष्कीलीने तोंड सुटले कसे बसे
करकोचा विचारे "मित्रा कसे आहेत मासे?"

भराभरा मासे खाउन उडाली मग पंगत
कोल्होबाच्या ध्यानी आली मित्राची गंमत

कोल्होबाला वाटू लागली स्वत:चीच लाज
मित्रा "जशास तसे" असे.. कळले मला आज ... कळले मला आज ..कळले मला आज

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची कशी होती fact?

तर बालमित्रांन्नो कळाने ना.. आपण जसे दुसर्‍यांशी वागतो तसेच दुसरे ही आपल्याशी वागतात... आपण सळ्यांशी चांगले वागलो की सगळे आपल्याशी चांगले वागतात..

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची अशी होती fact...

-सत्यजित.

गुलमोहर: 

मस्त रे.... मुलं खुश होतील Happy

आजोबा, "फिट फॉर फॅट" वर लिहीता येईल का काही ???? सांगा बरं.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

कौतुक नातू: ते माहित असत तर मी फॅट झालो असतो का? आपल्यासठी तर फिट इस फॅट आहे Happy

छान आहे. आजच वाचून दाखवते लेकीला

किती गोड!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

छान आहे Happy
.
.
काय गोड गुरुची शाळा | सुटला जनक जननीचा लळा ||
- श्री साई सच्चरित

बालकवी ग्रेट!

सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना Happy

थांकू बर का सगळ्यांना...!!!

कौतुक नातू: ते माहित असत तर मी फॅट झालो असतो का? आपल्यासठी तर फिट इस फॅट आहे >>

हे जर खरं असेल तर "फॅट इज फिट" हेच विधान इथे जास्त योग्य आहे. Proud

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?