फुगे

Submitted by shrishrikant on 7 July, 2009 - 09:12

निळे हिरवे लाल पांढरे
फुगे गुलाबी दूर चालले
निळ्या सावळ्या मेघांमधूनी
घेत भरार्‍या पुढे चालले

बालीचा हा फुगा निराळा
छपरावरचा जसा भोपळा
शिल्पाचा हा फुगा पिटुकला
बाजारातील जसा आवळा

शंभर फुगे छपरावरती
घेउनी मुले खेळत होती
धडाड्-धूम फुगे फुटले
लहान मुले पळत सुटले

गुलमोहर: 

छान आहे की Happy

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं