Submitted by एम.कर्णिक on 25 August, 2009 - 02:59
बनुताई शाळेमधे जायला आता लागल्यात
शाळा आहे राजवाड्याजवळच्या एका बंगल्यात
नाव त्यांच्या शाळेचे होली क्रॉस कॉन्व्हेंट
टीचर मिस हेलन अन् फादर बर्टी व्हिन्सेंट
बनुताईंना खूऽऽपच आवडली आहे शाळा
जामानिमा केलाय् बाबानी सगळा गोळा
काळे शूज, निळा स्कर्ट, पांढराधोप टॉप
लाल हेअर बँड, युनिफॉर्म टिपटॉप
पाठीवरच्या स्कूलबॅगवर सश्याचे तोंड
पाण्याच्या बाटलीला हत्तीची सोंड
टिफिनमधे कधी मफिन, ब्रेडजॅम कधी
तूपसाखरपोळीभाजी असते अधीमधी
मफिन, जॅम, तूपसाखर होते चट्टामट्टा
ब्रेड, पोळीभाजी बनतात कावळ्यांचा वाटा
बसनी जायचं शाळेला हे आईला नाही पास
म्हणून नेण्याआणण्यासाठी रिक्शा आहे खास
रिक्शावाल्या सुरेशची भरते कंबक्ती
"मस्ती नको" म्हणून जेव्हा करतो तो सक्ती
बनुताई दादा बनुन हल्लाबोल करतात
धुडकावून त्याला, हॉर्न वाजऽऽव वाजवतात
-मुकुंद कर्णिक
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे मुकुंद तुम्ही ह्या
छान आहे मुकुंद तुम्ही ह्या कवितांची साखळीच लिहा आणि तुमच्या बनुताईंना ह्या कवितांच एक पुस्तक (प्रिंट करुन सुबक चित्र काढुन, बाईंड करुन) भेट द्या वाढदिवसाची
मुकुंद दादा मस्तच !! कवी ला
मुकुंद दादा मस्तच !! कवी ला अनुमोदन अगदी मनातल, मस्त चित्रा सकट पुस्तक, मस्त भेट होईल.
अजुन, बनु ताईंचा होमवर्क, गॅदरींग, सहल, मजा येइल वाचायला
कविता, स्मिता, आभारी आहे.
कविता, स्मिता,
आभारी आहे. यापूर्वीच्या बनुताईंवरच्या सगळ्या कविता वाचल्या का? नसतील तर जरूर वाचा. तुम्हाला त्याही आवडतील अशी आशा आहे. कविता, साखळी लिहिण्याचा विचार सुचवलात त्याबद्दल तुमचे आणि बनुताईंच्या सगळ्या अॅक्टिव्हिटीजमधे इंटरेस्ट ठेवल्याबद्दल स्मिता, तुमचे पुन्हा एकदा आभार.
-मुकुंद (दादा)
मुकुंद, त्या वाचल्यात तिथेही
मुकुंद, त्या वाचल्यात तिथेही प्रतिसाद दिलाय. त्यातुनच हि कल्पना सुचली मला
मी असा विचार सानिकाच्या ५ व्या वाढदिवसासाठी केलेला पण माझी तेव्हढी प्रतिभा नाही म्हणुन बारगळला तेव्हा तुम्हाला तस जमु शकेल अस वाटल म्हणुन तुम्हाला सुचवला
कविता, अहो तुमच्या सानिकेत
कविता,
अहो तुमच्या सानिकेत देखील या बनुताई आहेतच. तेव्हा तुम्हीही या कविता सानिकेला भेट म्हणुन द्या, एका न पाहिलेल्या आजोबाकडून म्हणून.
सही मुकुंददा !
सही मुकुंददा !
बनुताई खुपच गोड! माझ्या घरीही
बनुताई खुपच गोड! माझ्या घरीही अशीच बनुताई आहे.जितकी गोड तितकीच
तिखटही! पण तरीही खुप Sweet !
ही पण गोड कविता!
ही पण गोड कविता!
मुकुंदजी, तुमची बनुताई मस्त
मुकुंदजी, तुमची बनुताई मस्त रंगात येतेय. अल्बम करा एखादा बनुताईचा.