धरेस ढग बिलगले

Submitted by नितिन देशमुख on 9 September, 2009 - 00:54

जमला थेंब सागरातला, अन् एक आला नदितला
एकात झ-याचा ओलावा तर, एक होता नाल्यातला

नभात एकवटून सारे गडगडाट करुन उठले
मनात चर्रर्र माझ्या गलबलून अंग शहारले

बरसण्यास आता त्यांना माझ्या अंगणातला देश
तू नाहीस अजून आली कसा देउ मी आदेश

विज उगाच कड्कडती अन् नभ भरुन येती
मलाच अस्वस्थ करते माझ्या मनातील भिती

आई तू ये घरा मी एकटाच आहे
ढग असू दे रंगित डोळे दारातच आहे

वळिव अस्वस्थ करतो मन वाइट चिंतते
वासरु गोठ्यातले गाईकरता हंबरते

इतक्यात आली कुठून मंद हवेची झुळूक
जरा नभाकडे बघता स्मित करे तो हळूच

आई दारात उभी देई घट्ट मिठी
मी ही नभास दिली बरसण्याची चिठ्ठी

धरेवर धारा कोसळती अंगण माझे ओले
मी सोबत आईच्या धरेस ढग बिलगले....

गुलमोहर: 

मस्त आहे. Happy
पण असे शब्द हल्ली कळतच नाहीत नाही मुलांना ? पण गरजेच आहे खर तर ते, जुन्या मराठी कविता किती तरी छान आहेत अशाप्रकारच्या.