सफर

Submitted by boski on 3 October, 2009 - 09:31

सागराच्या पोटात थेंबांचे घर;
सफरीची आली त्यांना लहर.

शुभ्र ढगाच्या बग्गीत बसून;
वार्‍याला जूंपले बग्गीला कसून.

दमदार वार्‍यावर हो ऊन स्वार;
गावे,देश केली पार.

उंचीवरच्या थंडीने मग गारठून;
टपकले खाली थेंब बग्गीतून.

गवताच्या गादीवर्,फूलांच्या कुशीत;
पानांच्या चटईवर्,कळीच्या मिठित.

तेवढ्यात झरा एक शोधत आला;
ओढत सार्‍यांना घरी घेऊन गेला.

गुलमोहर: 

मस्तंच कविता.. Happy
आणि तुमचा आयडी पण. Happy
राखी, आणि गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार हिचं टोपणनाव आहे बोस्की... Happy