बनुताईंची मराठी भाषा

Submitted by एम.कर्णिक on 5 September, 2009 - 08:09

सकाळपासुन आईच्यामागे बनुताई भुणभुण लावी
"ट्रीपआय आमची आफ्टर टुमॉरो, बाबांचि पर्मिशन हवी,

जुनियर, सिनियर के जी जाणार फोर्ट पन्हाळ्याला
टीचरनि सांगलय सगळ्याना ट्वेंटी रुपीज आणायला"

बाबा म्हटले "आपण बनुताई, जाऊ ना गाडीनी
तर म्ह्टल्या त्या "नोऽऽ नं, बाबा आय वाँटु गो बसनी"

"फत्तेसिंग, रुशिकेश, सुचित्रा, संजुहि जाणारैत
अ‍ॅग्री केलंय आजोबानि, ट्वेंटि रुपीज देणारैत"

बाबा झाले तयार रदबदलीने आईच्या
अन मग पारावार न उरला खुशीस बनुताईंच्या

बनुताई बोलतात अशी अस्खलित कॉन्व्हेंटची भाषा
(जरि म्हणती त्या श्लोक रोजचे बिनचुक अक्षरश:)

गुलमोहर: 

कविता, पूजा, अक्षरी, आर्या, प्रकाश आणि स्मिता,
तुम्ही सारे नेहमीच बनुताईंचे कौतुक करता. तेव्हा, औपचारिक वाटले तरीही , त्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. आता बनुताई मोठ्या होतायत. तेव्हा तुमची आणि त्यांची पुढची भेट बालकवितेच्या सदराऐवजी कवितांच्या सदरात घडवून आणायचा विचार आहे. बघुया रुंदावलेल्या क्षितिजामधे वावरताना त्याना घाबरायला होईल का ते.

तुमच खुप खुप कौतुक. तुमच्या सारखे प्रेमळ आणि हो कविता करणारे आजोबा सगळ्या बनुताईंना मिळु दे Happy आम्हाला ही भेटायला आवडेल तुमच्या बनुताईंना

पुन्हा एकदा सर्वांचे आभार. बनुताईंवर असेच प्रेम असू द्या. त्यांनी लिहिलेली एक कविता 'कविता' या सदरात दिली आहे. तीही जरूर वाचा.
-मुकुंद कर्णिक