काही दिवसांपूर्वी मित्रवर्य श्री. प्रकाश काळेल यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याचे समजले आणि त्याच सुमारास त्यांनी काढलेले 'Father and Daughter' हे अप्रतिम स्केचही बघायला मिळाले. त्या दिवसापासून ही कविता मनात घोळायला लागली होती. नंतर बनुताईंकडून 'इरा'ला दसर्याची भेट म्हणून मी ही प्रकाशना पाठवली. आज त्यांच्या अनुमतीने येथे तुम्हाला वाचायला देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.
मॉलमध्धे काय झाली गम्मत, आजोबा, माइताय का?
अहो आम्हाला भेट्लं तिथं कोण ओळखा?…प्रकाशकाका !!
काकांच्या पोटावर बांधलेली कांगारूची पोटली
पोटलित होती एक छान अन गुटगुटीतशी गठली
काकानि मला ओळखले हं ! म्ह्ण्ले, "हाय् बनुताई"
मी पण म्हटले, "हाय्" पण गठली मुळीच बोलली नाई
डोक्याला तिच्या होते गुबगुबित एस्कीमोचे बॉनेट
गोलगोल डोळ्यानी बघतच र्हायली माझ्या डोळ्यात थेट
काका हसले आणि म्हणाले, "मीट हर, शी इज इरा;
आणि इरा, या बनुताई बरं का. बघ तरि यांचा तोरा !"
डुच्कन हलली मान अन इरा हसली बोळके उघडुन
इवल्या हातात पटकन् माझे बोट तिने ठेवले पकडुन
काका म्हटले, "इराला 'धुम मचाले' शिकवाल का?"
आईच बोलली, "थांबलय ते; आता घोष आहे 'हडिप्पा' "
कित्ती गोड लिहिलीये . मस्तच .
कित्ती गोड लिहिलीये . मस्तच . जाम आवडली .
बनुताई नेहमीच आवडते. ही पण
बनुताई नेहमीच आवडते. ही पण मस्तच!
छानच आहेत बनुताई
छानच आहेत बनुताई
(No subject)
घ्या, मस्त मस्त कविता लिहिताय
घ्या, मस्त मस्त कविता लिहिताय तुम्ही...
आता बनुताईंचा अल्बम निघालाच पाहिजे...
पक्या कुठे राहिला?
सह्हीच एकदम, चित्र आल सगळ
सह्हीच एकदम,
चित्र आल सगळ डोळ्या पुढे
दक्स डोळे फ़िरवायला काय झाले
दक्स डोळे फ़िरवायला काय झाले तुला ?
मी डोक्यावरच तर आहे तुझ्या !
हडिप्पा. मस्त आहे.
हडिप्पा.
मस्त आहे.
खूप गोड कविता. प्रकाश, इराला
खूप गोड कविता. प्रकाश, इराला आवडली का? ती हसली का बोळकं पसरुन?
बनुताई महान! खूप गोड!!!!
बनुताई महान!
खूप गोड!!!!
मस्त
मस्त !
.......................................................................
आम्ही इथेही पडिक असतो...
http://magevalunpahtana.wordpress.com/
कर्णीक तुमची बनुताई एकदम मस्त
कर्णीक तुमची बनुताई एकदम मस्त आहे... आतापर्यंतच्या सगळ्या कविता आवडल्यात