गद्यलेखन

मी आणि नवा पाऊस

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली कथा. जुन्या मायबोलीवरून इथे परत.
---------------------------------------------------------------------------------
‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा. त्याशिवाय का मे महिन्याच्या शेवटी शेवटी विद्यापीठात आलाय हा.
"मित्र?" माझा प्रश्न

प्रकार: 

एका हरण्याची गोष्ट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अडमाच्या लिस्टीत टाकण्यासाठी ही कथा परत टाकतेय इथे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात.

तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही. स्वतःला अजून दुखवून घेणं परवडण्यासारखं नव्हतं तिला.

प्रकार: 
शब्दखुणा: 

सोनमोहर... नि आकाशकंदील

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही वर्षांपुर्वी मी बिशानमधे रहायचो. फेब्रुवारी महिन्याच्या एका संध्याकाळी मी मेरीमाउंट भागात फिरायला गेलो. विनय साने सिंगापुरात असताना त्याच्याकडे 'तुझं आहे तुजपाशी' ह्या नाटकाच्या कित्येक तालमी सानेंच्या घरी होत असतं. त्या निमित्ताने मेरीमाउंटला येणे व्हायचे. केवढा मोठ्ठा होता नाटकाचा तो वर्ग! ते मेरीमाउंटच्या जवळपासचं रहायचे. पण त्यावेळी कधीचं माझी नजर या परिसरतल्या निसर्गावर गेली नव्हती. असे कसे घडले? मी मलाचं शभंरवेळा हा प्रश्न विचारला. 'बहवा' हा वृक्ष सिंगापुरात फुलतो तो काळ फेब्रुवारी आणि नाटक बसवायचा काळ असायचा 'मे' ते 'ऑगस्ट' हे महिने. फक्त फुले हेच खरे या झाडाचे सौदर्य.

प्रकार: 

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे

फुर्सत के रात दिन गेले कुठे?

Submitted by स्वप्ना_तुषार on 15 November, 2010 - 02:41

आंतरजालावरून माझ्या मैत्रिणीने पाठवलेला हा लेख सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावणारा आहे.

आज प्रत्येकजण उरीपोटी फ़ुटेस्तोवर धावतोय.या धकाधकीत, जगण्याच्या मस्तीत आपण आपल्या आयुष्याशी किती खेळतोय, याचा विचार करण्याचीही कुणाला उसंत नाही.परिणामी 35 ते 45 वयोगटातील व्यावसायिकांना जीवघेणे विकार घडण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेय.कंदिलाची वात मोठी केली तर कंदिल लवकर विझतो हे सगळ्यांनाच कळते; पण वळत मात्र नाही.असे का होते ? यावर उपाय काय? या प्रश्नांचा ऊहापोह करणारा लेख.

बह्यनी उप्पाद मारु !!

Submitted by ज्ञानु on 14 November, 2010 - 05:48

आहिरानीना जोक
१न्हानभु: डाक्टर डाक्टर .... मी परतेक गोष्ट इसराले लागी गऊ
डाक्टर : हाऊ आजार तुले कधी पासून रे न्हानभु ?
न्हानभु : कोणता आजार ?
हाहा... हीही...हुहू...हेहे...हीही!!!

प्रांत/गाव: 

हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कुजबुज

२१ ऑक्टोबर २०१०

नमस्कार वाचकहो,

टायटल बघून दचकू नका. कुजबुजची "धार वाही" कादंबरी दररोज मायबोलीवर प्रकाशीत करण्याचा आमचा अजिबात मानस नाही. पण गेल्या काही अंकाच्या प्रकाशना नंतर "अंक फार लहान वाटला" "मॅटर ज..रा कमी वाटतेय" अशी तक्रार काही वाचकांनी केली होती. त्याला घाबरून यावेळी आम्ही विचारपूर्वक हे शिर्षक दिले आहे जेणे करून यावेळी पण कुजबुज मधे मॅटर कमी वाटल्यास हाफ प्लेट आहे म्हणत वेळ मारून नेता येईल.

प्रकार: 
शब्दखुणा: 

खोटे कधी बोलू नये ....

Submitted by मामी on 15 October, 2010 - 12:47

खोटे कधी बोलू नये असं आपल्याला शिकवलेलं असतं. पण आपण सगळेच सर्रास छोटं, मोठं खोटं बोलत असतो. कधी कधी अशावेळी गंमतीशीर प्रसंग घडतात तर कधी कधी ते आपल्या अंगाशी येतं. अशा आपल्या किंवा आपल्या आजूबाजूला घडलेल्या खोटेपणाचे किस्से.

माझ्याकडे नविनच कामाला लागलेली मंदा, ४ थ्या की ५ व्या दिवशीच बरीच उशिरा आली. तोवर मी तिने दिलेल्या नंबरवर फोन करून ती घरातून वेळेवर निघाली असल्याची खात्री करून घेतली होती. फोन जिचा होता ती निघाली मंदाची नणंद - छाया. फोनवर चार ईकडच्या-तिकडच्या गोष्टी करताना, या छायाला एक ९ वर्षांची मुलगी असल्याचं पण कळलं होतं.

कथाबीज - ४ : तीन मित्र, संगीत मैफल, वीस वर्ष...

Submitted by संयोजक on 4 September, 2010 - 01:29

2010MB_Kathabij_Poster4.jpgकार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन