सरप्राईज गिफ्ट द्याव का? त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर? त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला माझ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे! बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले मागच्या वर्षी तो होता पुतळी हार!
घरची परी
ती तशी परिच असते
सदा ती आपल्या घरीच असते
बघायला ती बरीच असते
स्वतःसाठी मात्र परिच असते
जळवायला एखादी शेजारीच असते
तशी तीही देखणी भारीच असते
खुणावत जीन्समधली छोरीच असते
सौंदर्य खुलते नेसून नऊवारीच असते
वाचवत आपल्याला खबरदारीच असते
नाहीतर मानेवर आडवी सुरीच असते
झीरो फिगर मिरवणारी गुलछडीच असते
संसाराची गोडी जाडजूड पुरणपोळीच असते
मायावी दुनियेपासून रोखणारी दोरीच असते
सुखी संसाराची ती अखंड शिदोरीच असते
जरी ती आपल्या घरीच असते
तरी ती आपली परिच असते
प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )
कुठून सुरु करू माझी गोष्ट ? आज १० जानेवारी २०२० म्हणजे आता त्या घटनेला चार दशके आणि चार वर्षे होऊन देखील तो दिवस मला लख्ख आठवतोय .....
"जा रे, दिपकच्या आई कडून एक वाटी साखर घेऊ ये " आजी ने फर्मान सोडले. मला नेमके न आवडणारे काम माझ्या समोर आले . खरे तर दिपकची आई मला कधीच रागवत नसे. पण कोणाकडे जाऊन काही मागून आणायचे म्हटले कि माझ्या अंगावर काटा येत असे.
" बाय तुज नाव काय ? " विष्णू सरपंचाने घसा खाकरत प्रश्न केला.
" मंजुळा " साडीच्या पदराचे एक टोक बोटाला गुंडाळत , पायाच्या बोटाने जमीन उकरत, मंजु तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
" जवान-खान बनवता येत काय ? " लगोलग थोरल्या बाईसाहेबांचा प्रश्न आला.
" अहो ! अहह्ह्ह ! " सरपसर पुन्हा खाकरले.
" म्हंजी मला आस मनायच हुत की , भाकर तुकडा बनवती ना ? नाहीतर मी शिकवीनच हो . आपलं आसचं इचारती. " आपले अहो रागवलेले पाहून थोरल्या बाईसाहेबांनी थोडी विषय सारवासारव केली.
"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,
परदेशी नागरिकत्व मिळूनही, भारताबद्दल अतूट प्रेम वाटते, किंबहुना या भूमीवरती पाऊल ठेवले की भरून येते. इथे ना कधी उपरेपणा जाणवला ना जाणवेल. किती का पाश्चात्य संस्कृती अंगवळणी पडलेली असू देत, पण या जागेबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल जो जिव्हाळा वाटतो तो अवीट आहे व तसाच राहील .
मुलगी ३ वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत गेलो त्यापश्चात, यावेळेला मुलीबरोबर पहिली भारतवारी केलेली. म्हणजे तिच्याकरता पहिली. खूप anxiety होती की तिला हि भूमी कशी वाटेल , तिला आवडेल का, ममत्व वाटेल का? अर्थात आवडेल ना आवडेल त्यात मला काहीच say नव्हता, तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक अनुभव होता. पण तरीही!
माहेर, सासर
नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा
अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले
चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर
मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते
मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर
- पाषाणभेद
०८/१२/२०१९