नातीगोती
देणं सीजन २ – भाग १
देणं सीजन १ - अंतिम भाग ५
https://www.maayboli.com/node/73905
देणं सीजन २ - भाग १
माझी शोभा ताई
सचिन ,ममा , विश्वास दादा ,मोहम्मद दादा सर्वांची व्यक्तिरेखा रेखाटून झाली. एका व्यक्तीची राहिली होती. तिची व्यक्तिरेखा रेखाटणं म्हणजे माझ्यासारख्या धसमुसळ्या मुलीने पट्टीशिवाय सरळ रेषा आखणं ! साक्षात ब्रह्मदेवालाही जी गोष्ट शक्य नाही ,ती मी करण्याचं धाडस करते आहे. आमची शोभाताई . श्रवणयंत्राला कुलूप लावून अखंडपणे वाक् यंत्र चालू ठेवणारी ,क्षणात हसून क्षणात गंभीर होणारी , आपल्या हट्टपणाने सर्वांचं पित्त असंतुलित करणारी मात्र तरीही आम्हा सर्वांच्या हृदयाची अधिकारिणी असलेली अशी ही ताई. काळेभोर टपोरे दाक्षिणी ललनेसारखे डोळे तिने ज्याच्यावर रोखले ,त्याच्या पापाची रांजणे भरलीच समजा .
माझे बाबा
माझे बाबा म्हणजे माझे आजोबा . श्री . आनंद देसाई , नावाप्रमाणेच आनंदी . यांच्याकडे बघून कोणाला सुधीर जोशींचा 'आनंदी आनंद गडे ' हा नाच आठवला नाही तरच नवल ! ऐन तारुण्यातच कॉर्पोरेट विश्वाचा उंबरठा ओलांडल्यामुळे ३ रुपये ५० पैशाचं केळं ५० रुपयाला विकण्याचीही ताकद त्यांच्या अंगी आहे .मानेमागून डोकावणारी पांढरी शुभ्र केस जणू या अंगीकृत गुणांचं आ,णि अनुभवांचं दर्शनच घडवीत असतात. कोणतंही स्थळ ,काळ आणि विषयाचे बंधन नसलेले माझे बाबा जगातल्या कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतात . आजची युवा पिढी google वरून ज्ञान डाउनलोड करून ते आपल्या मेंदूत अपलोड करते. मात्र बाबा यापैकी काहीच करत नाहीत.
टीका विरुद्ध सर्वसमावेशकता
माझा अजून एक खट्याळ दादा ....
मी एक शांत वृत्तीचा माणूस आहे असे दाखवणारा एक अशांत माणूस म्हणजे मोहम्मद दादा .नसा-नसात मालवणी भाजका मसाला असलेली ही एक अस्सल मालवणी वल्ली . मोहम्मद दादाच्या बुद्धीचं वैशिष्ट्य म्हणजे ती वरपासून खालपर्यंत अशा सर्व स्तरांवर आपली चुणूक दाखवते . दररोज संध्याकाळचे निवांत कषाय ( दाक्षिणात्य चहा ) पिताना आम्ही सर्वजण एकत्र बसून मस्त गप्पा मारतो . गप्पा म्हणजे एक ब्रेक फेल झालेली ,सुसाट धावणारी गाडीच . या गोष्टीची जाणीव मला नेहमी गप्पा मारतानाच होते .
बहिण भाऊ
माझा दादा .
माझा विश्वास दादा . सर्वांचा लाडका आणि प्रेमळ . निरनिराळे अवतार घेऊनच तो या पृथ्वीतलावर अवतारलाय. खाण्यात भीमाचा अवतार ,खोड्या करण्यात कृष्णाचा अवतार मात्र विनोद करण्यात तो पुलंचा अवतार आहे असं मी काही म्हणणार नाही . कारण बऱ्याचदा त्याचे विनोद 'विनोद ' या गटात मोडत नाहीत . असो. तो म्हणजे आमच्या घराचं चैतन्य . बालिशपणा आणि जबाबदारपणा या दोहोंच्या मिश्रणाने बनलेलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व म्हणजे माझा विश्वास दादा .
Couple Goals & मी !
परवा ऑफिस कन्टीनमध्ये बोलता बोलता ऑफिस मधील सहकाऱ्याने प्रश्न विचारला "What are your couple goals this year ?". फेब्रुवारी महिना नुकताच संपला होता अणि महिन्याचे व्यावसायिक ध्येय(target) पूर्ण झा ल्याच्या आनंदात होतो। मार्चमध्ये पुढे काय वाढून ठेवले आहे अणि महिन्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे याची जुळ णी मनात चालू होती.
माझं सुंदर घर
माझं घर आणि मी
Pages
![Subscribe to RSS - नातीगोती](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)