मागच्या आठवड्यात काही कपडे खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. थंडी वाढेल तसं बाहेर पडण्याचा आळस टाळून काही ना काही घेणं गरजेचं होतं. लेकाला प्लेडेट (play date , इथे तो डोळे फिरवणारा स्माईली पाहिजे) ला सोडून दोन तासांत यायचं ठरवून बाहेर पडलो. एकतर खूप दिवसांनी असे फक्त खरेदीला बाहेर पडलो होतो त्यात लेकीला कधी नव्हे ते एकटीला घेऊन. सुरुवातीला दुकानांत गेल्यावर तिच्यासाठी न घेता माझी खरेदी सुरु केली. तरीही तिने कुरकुर न करता स्वतः मला काय चांगलं दिसेल ते सुचवायला सुरुवात केली. दोन चार झगमगीत कपडे मी पाहिले तर म्हणे,"आई तू हे असलं घालशील?". म्हटलं, का नाही? तिने तसा बराच वेळ संयम ठेवला.
थकलेले जीव सारे,
रात्रीच्या कुशीत निजले होते.
आभासी दुनियेत हळूच जाऊन,
स्वप्न आपली रंगवत होते.
दिवसभराचा ताण शीणवटा,
हिरावून घेतला स्वप्नांनी.
कोवळी किरणे सूर्याची,
अन् पक्षांच्या किलबिलाटानी.
सुरू झाला दिवस मैत्रीच्या हाकेनी,
Good morning ला साथ दिली उत्स्फूर्त कवी मनानी.
एकमेकांपासून आपण लांब जरी,
मैत्रीची वीण आहे गुंफलेली.
"येल्लो रिच ! कैसी है रे तू? ", रिचाने फोन उचलताच तिला बोलायची संधीही न देता भाविन ओरडला.
"क्या रे गुज्जू कैसा है?", तीही त्याच आवेशात बोलली.
लेक मोठी व्हायला लागली. सणासुदीला तिला तयार होताना निरखून पहायला लागली होती. कधी कपडे निवडतांना सुचवू लागली. हे चप्पल नको, तुझ्या ड्रेससोबत हे बूट्स घाल असं हक्कानं सांगायला लागली. तर कधी 'कुठल्या काळातले कपडे घालतेस गं आई?' असे टोमणेही मारायला लागली होती. तिच्या वळवून नीट केलेल्या केसांना हात लावून पाहू लागली होती. 'माझेही असेच सेट कर' म्हणून हट्ट करू लागली. कधी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिक पाहून, 'मलाही मेकअप करायचा' म्हणून रुसू लागली. आणि हे सगळं ती जवळून पाहतांना तिला मात्र एकच भीती होती....
त्या दिवशी मला फेसबुक वरच्या कोणत्यातरी एका पेज वरची पोस्ट वाचण्यापेक्षा कंमेंट वाचण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता. पोस्ट आठवत नाही कोणती होती ते पण त्याच्यात कंमेंट होत्या त्या पोस्ट ला अनुसरून अजिबात न्हवत्या. कंमेंट वाचायला खूप मज्जा येत होती म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण त्याच पेज वर गेली पुन्हा तसच पोस्ट ला अनुसरून कंमेंट न्हवत्याच.
डिसक्लेमर - मी डॉक्टर नाही. माझ्या माहीतीप्रमाणे, डिमेन्शिया रिव्हर्स करता येत नाही. त्याच्यावरती रामबाण उपाय अजुन तरी सापडायचा आहे. याचा अर्थ प्रत्येक पेशंट मरावा अशी इच्छा करणे हा मार्ग नाही. सकारात्मक आशावाद ठेऊन, औषध सापडण्याची वाट पहाणे, सुश्रुषा करणे हे मार्गच अवलंबिणे श्रेयस्कर आहे. पण मुद्दा हा आहे की, वृद्ध आणि मनाने खचलेल्या साथीदाराच्या मनात, खालील विचारही येऊ शकतात, त्या विचारांत गैर काहीही नाही.
" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्या अविनाशला विभा विचारत होती.
" हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.
ती पुन्हा... " का ? आणि मला न भेटताच ? "
" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पाहताच उत्तर दिले.
" जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली.
" विभा हे शक्य नाही. '
" अरे पण का ? "
" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "
" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली.
लहान मुलांचे संगोपन हा विषय फार गहन आहे. या विषयावर अनेक मंडळींनी अनेक पुस्तके लिहिली आहेत परंतु त्याचा उपयोग होईलच असे नाही. काही गृहितके धरून ती लिहिली जातात आणि तशी स्थिती प्रत्यक्षात नसतेच. प्रत्येक मूल हे असाधारण असते आणि प्रत्येक घरातील वातावरण वेगवेगळे असते . अमुक एका पद्धतीने संगोपन होऊ शकत नाही किंवा त्या साठी एखादी स्टँडर्ड आँपरेटींग प्रोसिजरही अस्तित्वात नाही. साधारण अडीच तीन वर्षाची आणि त्या नंतरची मुले, कळती होईपर्यंत सांभाळणे याला फार सहनशक्ती लागते आणि आताच्या पालकांकडे ती कमी प्रमाणात असते.
माझी एक मैत्रिण आहे. शरयु म्हणुन. ती साधारण २९-३० वयामध्ये अमेरीकेमध्ये आली. त्यावेळी तिची लेक होती ३ वर्षांची. पहील्यांदा ती आली आणि मग तीन महीन्यांनी तिचा नवरा, लेकीला घेउन आला. बरं हिचा जॉब व्यवस्थित चालू होता. पण नवर्याला काही जॉब लागत नव्हता. कारण त्याचं फील्ड फार वेगळं होतं शिवाय एच-४ व्हिसा. मग ३-४ वर्षं नवरा मुलीला सांभाळत धडपड करत होता. आणि ही घरातील, एकमेव अर्निंग मेंबर होती. ही मात्र उशीरा पर्यंत ऑफिसात कामाला जुंपलेली असे. वीकेन्डसना देखील क्वचित ऑफिसात जावे लागे. या सर्वात तिच्या मुलीला फार कमी वेळ देता येई.