(पहीला भाग - https://www.maayboli.com/node/72790) .
(कथेमध्ये थोडेसे (जास्तच) इंग्लिश शब्द आलेले आहेत..... तरीही वाचकहो गोड मानुन घ्या .
तुमच्या सुचनांचे नेहमीप्रमाने स्वागत आहे.)
*****
' रात्री बेडवर पडून मी विचार करत होतो . ' जाई आणि मी कॉलेज फ्रेंड. ३ वर्षा पुर्वी जॉबसाठी कॅनडाला आलो . खुपदा भेटत असतो आणि इन्डियन म्हणुन आपुलकीही आहे . माझं मात्र तीच्यावर एकतर्फी प्रेम आहे . गम्मत अशी की, तीला हे कधी समजल नाही . आणि मी केव्हा सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त वाट बघत राहीलो , for right time आणि आता इकडे माझी वाट लागायची वेळ आली आहे . तीने सकाळी हॉटेल मध्ये असताना जे काही सांगीतले त्याने माझी झोपच उडाली . मागच्या एका वर्षांपासून ती कोणाच्या तरी प्रेमात आहे . ते पण कॅनडीयन ऑनलाईन डेटिंग साईडवर....तीच्या मते हे अगदी सिरियस मॅटर. हिने तर अगदी लग्नाची स्वप्न बघीतली होती.... मेसेजेस, चॅट वगैरे सगळेच ऑनलाईन... प्रत्यक्षात कधी भेट नाही. पण हे मॅटर एवढ पुढे गेल की, आता तीला त्या मुलाची सवय झाली आहे.... तो मुलगा ही सिरिअस होता म्हणे.... तो जास्त वेळ जर्मनीलाच असतो म्हणुन भेटायचा योग आला नाही. पण दोघांनी आधीच आपापल्या प्रेमाची कबुली दिली होती. '
' पण खरा सीन तर वेगळाच झाला.
आता जेव्हा जाईने एक स्टेप पुढे घेत भेटण्याची गळ घातली, तर तो तीचा ऑनलाईन बिएफ वेळ नसल्याचे कारण देत, चक्क तीला ईग्नोर करायला लागला. मेसेज , कॉल ला रिप्लाय करत नाही . म्हणुन ही रडुन-रडुन लाल झाली होती . वरती म्हणे , रडुन मन हलक झाल म्हणुन. मॅटर एवढ पुढे गेल , तेव्हा कुठे मॅडमना आमची आठवण झाली . माझ्या तर स्वप्नात सुद्धा तीच्याबद्दल असा काहीही विचार केव्हा आला नाही . किती साधी भोळी ती....अगदी नावाप्रमाने होती. तीच्याबद्दल वाईट वाटाव, की स्वतःबद्दल हेच मला कळेना . एक मात्र खर की , माझ्या आजच्या हॅपी संन्डेची तीने अगदी पद्धतशीरपणे वाट लावली होती . तरीही डोक्यातील विचार स्वस्थ बसु देईनात आणि जाईला अश्या अवस्थेमध्ये पहावत ही नाही . '
शेवटी न रहावुन मी तीचा नंबर डाईल केला.
" हॅलो ! how are you जाई ? "
" i'm ok सिद्धु ... सध्यातरी ठीक आहे."
" take care "
" नाही रे सिद्धु , माझच चुकल ना ? मी अस कोणत्याही ऑनलाईन साईडवर कोणावर विश्वास ठेवायला नको होता. माझ्या चुकीमुळे मी फसले." तीचा आवाज अगदी कापरा झाला होता . (कित्ती ईमोशनल)
" जाई ऐक ना ! नाव किवा त्याचा पत्ता असेल तर मला शेअर करु शकतेस का ? मी कॉन्टाक्ट करतो आणि ...."
माझ वाक्य पुर्ण व्हायच्या आतच तीने सुरुवात केली.
" सिद्धु तुला काय वाटत ? मी काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही का ? आयरा आणि मी गेल्या काही दिवसात खुप शोधाशोध केली . त्याने दिलेली सगळी माहिती खोटी निघाली , तो काम करत असलेल्या कंपनीच नाव देखिल कुणी ऐकलेल नाहीय. त्याच्या स्वत:च्या नावा पलिकडे मला काहीही माहीत नाही. कदाचित तेही खोट असाव. पुढे काय शोधणार आपण ? पण.... पण तो खुप छान बोलायचा रे .... आमचे बरेचसे विचार जुळायचेही . माझ्या साधेपणाचा फायदा घेतला, त्यामुळेच त्याने मला सहज चीट केल. काल तर शेवटी त्याने मला ब्लॉक केल रे !....आणि... आणि... "
जाईला पुढे बोलवेना . ईतका वेळ अडवून ठेवलेले तीचे अनावर हुंदके शेवटी बाहेर आले.
' २१ व शतक आहे . जग एवढ पुढे गेलय . पण हे लोक .... असे ऑनलाईन प्रेमात पडतात आणि लग्नाचे डिसिजन्स ही घेऊन मोकळे होतात. ते पण प्रत्यक्ष एकदाही न भेटता.... प्रगती म्हणावी , की अधोगती ? इकडे साला आपण आत्तापर्यंत मुलींच्या मागे-पुढे करत राहीलो. ४ -५ वर्षात एकदाही सांगण्याची हिम्मत नाही, की माझ तुझ्यावर प्रेम आहे. आयला हे लोक पोहोचले चंद्रावर आणि आम्ही अजुन बंदरावर आहोत तर ! ऑनलाईन चॅट वगैरे आपण पण करतो. पण यामध्ये सिरिअसनेस अजिबात नाही. नुसताच टाइमपास.... ' मी स्वतःच्याच विचारात मग्न होतो , आणि पलिकडून जाई राहुन-राहून सारखी रडत होती.'
" जाई प्लिज शांत हो . मी काही मदत करु शकतो का ? तु लवकरात लवकर या सगळ्यातुन बाहेर निघ. हव तर त्याला ब्लॉक कर . म्हणजे तुला याचा त्रास होणार नाही . जर तो मुलगा खरच तुझ्या बाबतीत सिरीअस असेल, तर तो स्वत:हुन तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल ."
बास्स ! मी एवढच बोललो आणि कल्याण झालं . आता तिच्या मुसुमुसु रडण्याचा भोंगा झाला होता. "अॅ....ह्या .....त्याने काल रात्री मला ब्लॉक केल, सिद्धु . आणि मी त्याला माझ खर नाव सांगीतलेल नाही . मी सुद्धा खोट्याच नावाने चॅट करायची. but i am so serious about him... त्याला सगळ खर सांगायच होत म्हणुन भेटायला बोलावत होते . पण मॅडीने ब्कॉक केल रे ! " (परत भोंगा चालू)
' नाव ऐकुन मला ४४० चा करंट लागला. '
" व्काय्य ! काय नाव म्हणालीस ? मॅडी ? पुढे काय ? " मी जवळ-जवळ ओरडलोच.
" मॅडी बिच. पण इट्स ओके सिद्धु... मी यातुन बाहेर पडायच ठरवल आहे.... माझा निर्णय झाला आहे. "
मॅडी बिच, नाव ऐकुन मला एक क्षण वाटल की माझ्या मेंदूचा भुगा होतो का काय ? ती पुढे काय बोलली ते मी ऐकलच नाही.... मी पुन्हा तीला प्रश्न केला. " आणि तू मघाशी म्हणालीस की, तू सुद्ध्या त्याला फेक नावाने डेट करत होतीस, आय मीन चॅट करत होतीस (मी माझ सेंटेंस करेक्ट केल). ते नाव काय ?
" मी पॉला नावाने. पॉला फर्टीन . बट दॉट्स इनफ....नो मोअर डिस्कशन प्लिज....मी डिसीजन घेतला आहे. आणि बघ तस ही....."
' पुढे ती काय बोलते ते मी ऐकलच नाही. माझ्या हातातून फोन गळून पडला....उभ्या-उभाच सरळ खाली कोसळलो .
भोगा आता आपल्या कर्माची फळे ! '
(क्रमश)
छान चालू आहे. साधारण अंदाज
छान चालू आहे. साधारण अंदाज आला होता ट्विस्टचा, दुसऱ्या परिच्छेदात.
मस्त झालाय भाग...
मस्त झालाय भाग...
जरा वेगळाच वाचतोय, उत्कंठावर्धक!... वेटिंग!
भारीच बिच्चारा सिद्धू
भारीच
बिच्चारा सिद्धू
भारीये ट्विस्ट! पुभाप्र!
भारीये ट्विस्ट!
पुभाप्र!
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
छान आहे कथा. पण याआधी कुठे
छान आहे कथा. पण याआधी कुठे प्रसिद्ध केली आहे का? जरा देजावू फिलिन्ग येत आहे
thanks to all
thanks to all
अजुन पुढे ट्विस्ट आहेत. stay tuned.
छान आहे कथा. पण याआधी कुठे प्रसिद्ध केली आहे का? जरा देजावू फिलिन्ग येत आहे
Submitted by मनिम्याऊ on 24 December, 2019 - 16:59
- हो. माझ्या ब्लॉग वरती आहे.
- STORYMIrror , MOMspresso वरती सुद्धा वरती टाकली आहे.
हा भाग देखिल छान. पु.भा.प्र.
हा भाग देखिल छान. पु.भा.प्र.
वाचतोय येऊदया भराभर.
वाचतोय येऊदया भराभर.
लय भारी...... ट्विस्ट
लय भारी...... ट्विस्ट