पत्नीसाठी

घरची परी (बायकोसाठी)

Submitted by Dr Raju Kasambe on 22 January, 2020 - 01:28

घरची परी

ती तशी परिच असते
सदा ती आपल्या घरीच असते

बघायला ती बरीच असते
स्वतःसाठी मात्र परिच असते

जळवायला एखादी शेजारीच असते
तशी तीही देखणी भारीच असते

खुणावत जीन्समधली छोरीच असते
सौंदर्य खुलते नेसून नऊवारीच असते

वाचवत आपल्याला खबरदारीच असते
नाहीतर मानेवर आडवी सुरीच असते

झीरो फिगर मिरवणारी गुलछडीच असते
संसाराची गोडी जाडजूड पुरणपोळीच असते

मायावी दुनियेपासून रोखणारी दोरीच असते
सुखी संसाराची ती अखंड शिदोरीच असते

जरी ती आपल्या घरीच असते
तरी ती आपली परिच असते

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - पत्नीसाठी