Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 January, 2020 - 00:54
सरप्राईज गिफ्ट द्याव का? त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर? त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला माझ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे! बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले मागच्या वर्षी तो होता पुतळी हार! माझ्या पसंतीच डिझाईन. नेटवर शोधून काढल! आता यावर्षी मुलीला काय घ्यावं? एकत॒र मी गिफ्ट देणे हेच एक सरप्राईज असते त्यातून सरप्राईज गिफ्ट असा मामला आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ करा पण तुमच्या मुलीच्या
माफ करा पण तुमच्या मुलीच्या आवडीनिवडी या तुम्हाला जास्त चांगल्या माहिती असतील. मायबोलीकर काय सांगणार त्यात.
बोकलत बेसिक तत्वाबाबत तर काही
बोकलत बेसिक तत्वाबाबत तर काही सांगता येईल ना? मला आवडीनिवडीबाबत अंदाज येत नाहीये!
बाबांनी दिलेली कुठलीही गिफ्ट
बाबांनी दिलेली कुठलीही गिफ्ट पोरीला भारीच वाटते. त्यामुळे तिला आवडेल की नाही याचा जास्त विचार करू नका.
जास्त कन्फ्यूजन असेल तर
जास्त कन्फ्यूजन असेल तर ग्रीटींग/लेटर, फ्लॉवर्स, आणि जे बजेट आहे ते कॅश स्वरुपात पाकिटात भरून द्या....
मला स्वत:ला जास्त महागडी सरप्राईज गिफ्ट्स आवडत नाही. खर्च केलाय तर माझी आवड त्यात हवी
छानसे कानातले, ब्रेसलेट-कडं
छानसे कानातले, ब्रेसलेट-कडं द्या.
जे बजेट आहे ते कॅश स्वरुपात
जे बजेट आहे ते कॅश स्वरुपात पाकिटात भरून द्या....>> हाही विचार केला पण मग ते रॅशनल होत, गिफ्टमधे इरॅशनल कंटेंट हवा आहे. ते हौसेला मोल नसते वगैरे सारखा!
प्रत्येक माणसाला मला हे
प्रत्येक माणसाला मला हे कध्धीच्चं हवं होतं / मला हे घ्यायचं आहे अशी एकतरी वस्तु असतेच. तशी खात्रीच्या सोर्सेसकढुन माहिती काढा. आणि ती वस्तु घ्या.
सोनं हा देशद्रोह!!!!
सोनं हा देशद्रोह!!!!
तुम्ही देशप्रेमी असाल तर मग सोनंच द्या! एकदम इर्रेशनल होईल म्हणजे.
सस्मित या कटात बायकोलाही
सस्मित या कटात बायकोलाही सामील केले आहे. पण ती म्हणते कि तिला दागिने वैगेरची क्रेझ नाही.
तिला दागिना कपडे वगैरे
तिला दागिना कपडे वगैरे घ्यायचे तर बायको ला घ्यायचय सांगुन दुकानात न्या.. व तिची नजर वारंवार कुठे जातेय ते बघुन हळुच ती वस्तु घ्या
क्रेझ नसली तरी एखादा रोज
क्रेझ नसली तरी एखादा रोज वापरता येणारा नाजुक सुंदर दगिना आवडतोच मुलीं-बायकांना
आणि वर बोकलत नी लिहिल्याप्रमाणे बाबांनी दिलेलं गिफ्ट आवडतंच लेकीला.
अमितव तुम्ही कॊम्रेड अजित
अमितव तुम्ही कॊम्रेड अजित अभ्यंकरांची चर्चा वा व्याखाने ऐकली असतील तर ते हेच म्हणतात.
चार दिवस तुमचं कुटुंब आणि
चार दिवस तुमचं कुटुंब आणि तिचं कुटुंब बाहेर जाल अशा बीच/ रिसॉर्टचं बुकिंग करा, आणि घेऊन जा. सुट्ट्या मॅनेज करायला तिच्या स्पाऊसची मदत घेता येत्येय का बघा.
ती तुमच्या गावात रहात नसेल तर अचानक दोन दिवस भेट देऊन या.
सोन्याच्या नथींच्या नवनवीन
सोन्याच्या नथींच्या नवनवीन डिझाइन्स मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ज्या डिझाईनची नथ मुलीकडे नाही अशी कोणतीही तिला गिफ्ट करू शकता.
नंतर काय गिफ्ट दिलं हे आवर्जून सांगा.
अमितव, जावई लष्करी अधिकारी
अमितव, जावई लष्करी अधिकारी आहे. त्याच्या सुट्टीनुसार घ्यायच झाल तर तोपर्यंत गिफ्टची उर्मी निघून जाईल ना!
कुणीतरी माझ्या पप्पांना हा
कुणीतरी माझ्या पप्पांना हा धागा वाचायला द्या.
माझं लग्न झाल्यानंतर वाढदिवसाचं गिफ्ट, दिवाळीला आई पप्पा दोघेही हजार हजार रुपये देतात. तिघाही भावंडांना. आमच्या मुलांना पण.
कितीही सांगितलं की आता हे पैसे देऊ नका. कशाला वैगेरे तरी नाहीच ऐकत. आम्हीही घेतो मग.
डिस्प्ले आर्ट (पेंटिंग/
डिस्प्ले आर्ट (पेंटिंग/ स्क्ल्प्चर) तयार... किंवा पेंटिंग असेल तर ऑनलाईन मेड टू ऑर्डरही करता येईल... असं काही सापडतंय का बघा.
असं काही तरी गिफ्ट द्या ज्याने मेमरीज तयार होतील... कानातले इ. आधीच दोन - चार असतील तर त्यात अजुन एकाची भर. पाच दहा वर्षांनी हा कोणी दिलेला हे ही आठवायचं नाही. (अर्थात, जवळच्या माणसांनी दिलेला आठवेलही... )
ब्रँडेड वॉच द्या चांगलं.
ब्रँडेड वॉच द्या चांगलं..किंवा मुलगी जावई दोघानाही द्या पेअ र !
किंवा भारीपैकी क्विल्ट च्या रजया द्या हलक्या वजनाच्या...किंवा त्यांच्या घराला मॅच होतील असे डिझाईनर शुभ्र पडदे..काहीही सुंदर , कलात्मक द्या.....जे तिच्या नजरेत राहील कायम व तुमची आठवण तिला होत राहील...
चांगले घड्याळ घेऊन द्या,
चांगले घड्याळ घेऊन द्या, आवडेल.
दहा वर्षांनी हा कोणी दिलेला
दहा वर्षांनी हा कोणी दिलेला हे ही आठवायचं नाही.>>>>>>>> असं काही नसतं हो. बायकांना कुणी कधी काय दिलं ते (आणि काय दिलं नाही ते ही) चांगलंच लक्षात रहातं. दागिने तर नक्कीच
कालच माझ्या पप्पांनी मला एक
<<< बाबांनी दिलेली कुठलीही गिफ्ट पोरीला भारीच वाटते. >>> +११११११११११११
<<< सोन्याच्या नथींच्या नवनवीन डिझाइन्स मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ज्या डिझाईनची नथ मुलीकडे नाही अशी कोणतीही तिला गिफ्ट करू शकता. >>> +१११
मुलीसाठी काहिही घेताना फारसा विचार करायची गरज नसावी असेच वाटते.
दहा वर्षांनी हा कोणी दिलेला
दहा वर्षांनी हा कोणी दिलेला हे ही आठवायचं नाही.>>>>>>>> असं काही नसतं हो. बायकांना कुणी कधी काय दिलं ते (आणि काय दिलं नाही ते ही) चांगलंच लक्षात रहातं. दागिने तर नक्कीच Happy
नवीन Submitted by सस्मित on 28 January, 2020 - 12:43 >>> +१११११११११
मागे एकदा एक बातमी वाचली होती
मागे एकदा एक बातमी वाचली होती. अमेरिकेत नव्याने स्थायिक झालेल्या एका मुलीने आपल्या आई-वडिलांना सरप्राईज भेट द्यायचं ठरवलं. मुलगी विमानाने येऊन पहाटे घरापाशी आली आणि उत्साहाच्या भरात बेल वाजवली. पण त्या सरप्राईज पेक्षा तो अनपेक्षित धक्का, तो पण झोपेतून उठून आल्यावर, बसल्यामुळे आईस हार्ट अटॅक आला. ते वाचून वाटलं की सरप्राईज नकोच!
ओके.
ओके.
अजित अभ्यंकर कोण ? त्यांचं
अजित अभ्यंकर कोण ? त्यांचं काय ते एव्हढं मनावर घ्यायचं?
मन:स्वास्थ्य कोणाचे जपायचे आहे? का जपले जात नाहीये?
बजेट किती आहे?
असे अनेक प्रश्न पडत आहेत.
पण तुर्तास एक प्रस्ताव आहे.
माझ्याकडे मानस सरोवराच्या काठावरून स्वतः वेचून आणलेले पवित्र दैवी वगैरे वगैरे दगड / खडे आहेत. अतिशय मौल्यवान आहेत. आहेत म्हणजे तुम्ही जर ते पंचवीस हजाराला एक अशा किंमतीत विकत घेतले तर नक्कीच बनतील. एकदम चार घेतलेत तर एक दगड फुकट देईन. तुम्ही सव्वालाखाची भेट देतोय असे सांगा.
दगड एथनिक गणले जातील आणि किंमत इर्ररॅशनल होईल. नसेल होत तर अजून जास्त किंमत द्या.
बघा चालेल का? विचार करून सांगा. तुम्ही सव्वा क लाखाला असे खडे विकत आणलेत ह्या इतके मोठे सरप्राईझ दुसरीकडे कुठेही मिळणार नाही
दिवा, हलके ई. काय काय ते घ्यालच
हर्पेन आणि एकदम अभ्यंकर
हर्पेन आणि एकदम अभ्यंकर स्टँप्ड देशप्रेमी ... (तू तुझा देशप्रेमी शिक्का बनवलास तर लोकली अप्रुव्ह्ड ) वगैरे असेल.
हर्पेन आयडिया चांगली आहे.
हर्पेन आयडिया चांगली आहे. माझ्याकडे जुनी भोकाची नाणी होती त्यात लाल रिबिन बांधून मी फेंग शुई गिफ्ट तयार करुन एकाला दिले होते. त्याला फेंगु शूई बद्दल प्रेम असल्याने व ही नाणी ओरिजिनल असल्याने त्याला ते खूप आवडले.
फेंग शुई म्हणजे इर्रॅशनलपण
फेंग शुई म्हणजे इर्रॅशनलपण झालं ना?
Dirt alert
.
.
.
.
.
विल & ग्रेसमध्ये ग्रेसचा एक अतिप्रेमळ बॉयफ्रेंड तिला रोज काही ना काही भेट देत असतो.
रस्त्यात दिसलेलं सुंदर पान वगैरे.
एकदा एक छान खडा आणून देतो. कुठे मिळाला ते सा़गतो.
ग्रेस हातात घेऊन पाहते तर तो च्युइंगगम असतो म्हणे.
हर्पेनचं खडे पुराण वाचून हे आठवलं.
बाबांनी आणलेले काहीही मुलीला
बाबांनी आणलेले काहीही मुलीला आवडतेच वगैरे सेंटी ऐकून भावनेच्या भरात घाईघाईत काही घेऊ नका. बाबांनी गिफ्ट आणले ही भावना नक्कीच आनंददायी आहे आणि त्या भावनेचा आदर म्हणून जे आहे ते गोड मानून घेतलेही जाईल. पण ज्याला आपण गिफ्ट देतोय त्याच्यावर आपण का अशी आहे ते गोड मानायची वेळ आणावी असे मला वाटते...
एक सरप्राईज फॅक्टर सोडला तर मुलीच्या आवडीने तिला काही घेतले विचारून तर आनंद कमी होणार आहे का तिला??
पुष्पगुच्छ पाठवा, खूप छान
पुष्पगुच्छ पाठवा, खूप छान वाटतं!
Pages