गिफ्ट सरप्राईज असावे का?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 January, 2020 - 00:54

सरप्राईज गिफ्ट द्याव का? त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर? त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला माझ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे! बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले मागच्या वर्षी तो होता पुतळी हार! माझ्या पसंतीच डिझाईन. नेटवर शोधून काढल! आता यावर्षी मुलीला काय घ्यावं? एकत॒र मी गिफ्ट देणे हेच एक सरप्राईज असते त्यातून सरप्राईज गिफ्ट असा मामला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिफ्ट हे आपल्याला आनंद व्हायला घेतात. समोरच्याला आनंद झालेला बघुन आपल्याला आनंद होतो, आणि त्या 'आपल्या आनंदासाठी' गिफ्ट असतं.

हर्पेन, मानस सरोवराची लाखाची दगडे वेचून ईथे आणून विकणे ही तस्करी झाली.
सोने हा देशद्रोह आहे तिथे हा महादेशद्रोह झाला.

पुष्पगुच्छ पाठवा, खूप छान वाटतं!
>>>

+७८६
हे मी पहिल्या पोस्टमध्ये लिहिलेले.
प्लॉवर्स, सोबत भावना व्यक्त करणारे पत्र ग्रीटीण्ग, आणि मग बजेटनुसार तिच्या आवडीचे गिफ्ट, त्या गिफ्टमध्ये सरप्राईजच्या भानगडीत का पडा. फ्लॉवर्स आणि स्वत: लिहिलेले पत्र ग्रीटीण्ग हे भारी सरप्राईज नाही का??

दोरी वाला चॉपर.

रोज भाज्या कापताना तिला तुमची आठवण येइल. तसेही आर्मीत फार पार्ट्या जेवणे करावी लागतात. उपयोगी वस्तू आहे.

तुम्ही (यापूर्वी जर लेकीला हे काही दिलं नसेल, तर) तिच्या विविध मूडस् चा फोटो कोलाज किंवा व्हिडिओ क्लिप बनवून देऊ शकता.

तिला आणि तुम्हाला एकत्र बांधणारी आठवण, जागा, प्रसंग ह्याची बघता क्षणी ओळख पटेल असे पेंटींग, भरतकाम, मुद्दाम घडवलेला दागीना असे काही पण देऊ शकाल.

प्राचीन यांनी सुचवलेला फोटो कोलाज छान ऑप्शन आहे.
माझ्या बायकोने मला हे मागे दोनदा दिलेले. दोन्ही वेळा अफाट आनंद झालेला. कारण मला स्वत:लाही फोटोंची आवड आहे.
पहिले वेळी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला दिलेले. आमचे लग्नाआधीपासूनचे त्या दिवसापर्यण्तचे विविध फोटो एका ड्राँईंगबूकवर एका पानावर एक चिकटवून भोवताली नक्षीकाम केलेले तर बाजूच्या पानांवर स्वरचित प्रेमाची वाक्ये लिहिलेली.
दुसरयावेळी माझ्या वाढदिवसाला माझे लिखाण प्लस माझे फोटो यांचे एकत्रित पुस्तक छापून दिले होते.

>>दोरी वाला चॉपर.
म्हणजे?? (चॉपर हेलिकॉप्टरलापण म्हणतात ना? माझ्या डोळ्यापुढे एकदम खाली दोर लटकत असलेलं हेलिकॉप्टर आलं).

कॉस्मेटिक्स / स्किनकेअर प्रॉडक्टस?? मला जर माझ्या फेवरिट ब्रँडची प्रॉडक्टस कुणी गिफ्ट दिली तर खूपच आवडेल.

नटायची हौस असल्यास इमिटेशन जुलरी, सिल्वर जुलरी (aadya), गोल्ड जुलरी, साडी, ड्रेस

वाचनाची आवड असल्यास पुस्तकं
होम डेकॉर मध्ये पेंटिंग

चॉपर हेलिकॉप्टरलापण म्हणतात ना?
>>>
ते हल्ली हल्ली म्हणतात. चॉपर हे एक हत्यार असते. राडा करायला वापरले जाते. फावल्या वेळेत भाज्याही कापत असावेत.

हर्पेन, मानस सरोवराची लाखाची दगडे वेचून ईथे आणून विकणे ही तस्करी झाली.
सोने हा देशद्रोह आहे तिथे हा महादेशद्रोह झाला.
>>>

ऋन्मेष - कॉम्रेड आहेस का तू पण ? चीनच्या हद्दीतून भारतात दगडमाती आणली तर ती तस्करी कसली; चीनचा भूभाग बळकावून आणलाय मी भारताकडे Proud

भूभाग आणलाय मी भारताकडे Proud
>>>>
आणि ईथे त्या भूभागाचा सौदा करत आहात. अहो तुम्ही देश विकत आहात. हा देशद्रोह नाही तर काय...

बाई दवे, तुम्ही हसण्याची स्माईली टाकली ती कॉपी पेस्ट केल्यावर ईंग्रजी भाषांतर proud कसे झाले? Uhoh

> तुम्ही (यापूर्वी जर लेकीला हे काही दिलं नसेल, तर) तिच्या विविध मूडस् चा फोटो कोलाज किंवा व्हिडिओ क्लिप बनवून देऊ शकता. > हा बेस्ट पर्याय वाटतोय.

अदरवाईज ऋन्मेषशी सहमत.

नवीकोरी टाटा नॅनो गाडी द्या.
एकतर उत्पादन थांबलं आहे आणि रिसेल व्हॅल्यू फार कमी आहे. माझ्या मते ही इरॅशनल भेटवस्तू असावी.

तुमच्या मुलीला मुलगी असेल तर तिच्या नावे FD करा आणि मुलीला द्या किंवा तुमच्या मुलीच्या नावेच FD करा. हे गिफ्ट तिला खूप खूप आवडेल.

कॅरटलेन चे बटरफ्लाय इयरिंग कलेक्शन पहा.
किंवा सरळ सेफर साईड छोट्या हिऱ्याच्या कुड्या/नाजूक छोटे टॉप्स
आवडणार नाहीत असं होणारच नाही.

साईड छोट्या हिऱ्याच्या कुड्या/नाजूक छोटे टॉप्स. ... +1

Mi hech lihayala ale hote.kinva angathi.

Cash द्या नाहीतर फ्लिपकार्ट,अमेझॉन चे गिफ्ट कूपन द्या.

ताम्रपत्रावर (असं काही मिळतं का खरच ते माहीत नाही) किंवा तत्सम कशावर सोन्याच्या पत्र्याचं नक्षीकाम वगैरे केलेली फ्रेम. म्हणजे एथनिकपण झालं, इरॅशनल पण झालं (सोनं इरॅशनल आहे म्हणताय म्हणून) आणि काही निमित्त लागणार नाही.

<<< पुष्पगुच्छ पाठवा, खूप छान वाटतं! >>>
नको. पुष्पगुच्छ 3-4 दिवसात खराब होणार, भेट अशी पाहिजे की ती टिकणारी असेल.

मी तुमच्या जागी असतो तर हिऱ्याचे छानसे पेंडंट दिले असते म्हणजे जे सोन्याच्या चेनमध्ये लावून रोजच्या वापरासाठी पण उपयोगी पडू शकेल. बजेट जास्त असेल तर हिऱ्याचा नेकलेस घ्यायचा जो सणासुदीला किंवा पार्टीमध्ये वापरला जाऊ शकेल. मी हे दोन्ही पर्याय अनेकदा वापरले आहेत. हिऱ्याचे दागिने न आवडणारी स्त्री माझ्यातरी पाहण्यात अजून आली नाही.

मी दागिने हे consumption या दृष्टीने बघतो, गुंतवणूक म्हणून नाही. त्यामुळे दागिने वगैरे मोडायचा किंवा विकायचा विचार कधी करत नाही. बाबांनी दिलेली भेट म्हणून तुमची मुलगी पण बहुदा हा विचार करेल आणि आपोआपच भावनिक गुंतवणूक होईल.

ता.क. 'टायटन तनिष्क" मधून मी हिऱ्याचे दागिने घेतले आहेत. तो पर्याय बघा एकदा.

सरप्राईझ गिफ्ट देताना आपण त्या व्यक्तीला किती चांगले ओळखतो त्यावर सगळी मजा अवलंबून असते. मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे>> तर मग तुम्हाला भेट देताना गंमत वाटेल आणि लेकीलाही भेट मिळाल्यावर आश्चर्य वाटेल आणि तिच्या चेहर्‍यवर हसू उमटेल असे काहीतरी द्या. लेकीला ज्वेलरीचे वेड नसेल तर सोन्याचा दागिना वगैरे नका देवू. कारण ' सोने खरेदी इर्ररॅशनल ' यापलीकडे त्यात काही गंमत नाही. मनस्वास्थ्यासाठी करताय तर मग या खेळात चिटिंग नको. 'एक गंमत' असा दृष्टीकोन ठेवा, पारंपारिक हवे या तुमच्या अटीत बसणारे बरेच पर्याय मिळतील. लेकीला तुमच्याकडून अपेक्षित नसलेले, पण तिला आवडेल असे काहीतरी शोधण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

>>हिऱ्याचे दागिने न आवडणारी स्त्री माझ्यातरी पाहण्यात अजून आली नाही.>.
सर्वच स्त्रीयांना दागिने आवडतातच असे नाही. स्वतःच्या अनुभवावरुन सांगते, दागिने खरोखर आवडत नसतील तर अशा गिफ्ट्सचे फक्त ओझेच वाटते.

लेकीचा/ तिच्या आवडत्या व्यक्तीचा फोटो वुड एनग्रेव्ह करून द्या.
बहिणीला लता मंगेशकर फार आवडते, तर तिचा फोटो करून दिलेला. फार आवडलेला तिला. ट्राय इट

>>>>>>>बाबांनी दिलेली कुठलीही गिफ्ट पोरीला भारीच वाटते. त्यामुळे तिला आवडेल की नाही याचा जास्त विचार करू नका.>>>>>>> +१०००००२०००००३००००
___________________________________
एखाद्या आउटिंगची (केरळ/ म्हैसूर) २ तिकीटं द्या (विमान/रेल्वे/बसज्किंवा हॉटेल) तुमच्या बजेटप्रमाणे. मला फार आवडलं असतं असं. होपफुली अनेक जण असतील ज्यांना आवडेल व आपली लेकही त्या लोकांपैकी एक असेल.

Pages