दर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे..
दर्शनाने नुसत्या जो पावलाय म्हणे..
देव माझ्या स्पर्शाने बाटलाय म्हणे...
भाट गब्बर गाभारी आजकाल दिसे
देव त्याच्या दिमतीला ठेवलाय म्हणे..
एकटी असली की भेटायचे म्हणते
एरवी भाव तिचाही वाढलाय म्हणे
लीलया गुंते सोडविलेस तू सगळे
जीव का माझ्यात अजुन गुंतलाय म्हणे
टोक आता नात्याचे आणखी रुतते
काटकोनाचा कर्णच वाकलाय म्हणे
एवढी का त्याने केली गहाण खतें
पोर आता शाळेला चाललाय म्हणे..
आजही त्याच्या आठवणीत माय नसे..
रोज त्याला घास जरी लागलाय म्हणे..
रंग आभाळाला भगवा कसा चढला
वाघ कोण्या हत्तिणिवर भाळलाय म्हणे
शीर तुटले सीमेवर, पण पुन्हा लढला