Submitted by अ. अ. जोशी on 9 November, 2012 - 09:43
का पुन्हा धरलाय त्याने बार हल्ली ?
पाहतो कोठे बिपाशा फार हल्ली
घातली टोपी, उठविली बोंब सारी
शोधतो आहे तिला भंगार हल्ली
"चालतो आम्ही समाजाच्याबरोबर.."
का? कुणीही देत नाही कार हल्ली ?
बैठका झाल्या कमी अन भांडणेही..
आमचा असतो रिकामा जार हल्ली...
पाहतो मी 'दूरदर्शन' फक्त आता
बंदही ठेवीत नाही दार हल्ली...
केवढे लिहितात, बडबडतात सारे
काय कोणा मिळत नाही मार हल्ली ?
रोज ढुसक्या सोडती हे न्यूजचॅनल
पादण्या फुकटात मिळती पार हल्ली
खेळही ज्याने करावा भ्रष्ट, कुजका
त्या गळ्यामध्येच पडती हार हल्ली...
एवढे पाणी मिळत नाहीच कोठे ?
वापराव्या खास चड्ड्या चार हल्ली
केवढी झाली महागाई सणाला
फोड नाही मिळत, खातो खार हल्ली
सातवा लागेल ही भीती जगाला
स्नान करतो, गरम नाही - गार हल्ली
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>केवढे लिहितात, बडबडतात
>>केवढे लिहितात, बडबडतात सारे
>>काय कोणा मिळत नाही मार हल्ली ?
>>रोज ढुसक्या सोडती हे न्यूजचॅनल
>>पादण्या फुकटात मिळती पार हल्ली
शेवटचे कडवे (शेर) नाही कळाला
धन्यवाद महेश. सातवा -
धन्यवाद महेश.
सातवा - महिन्याला उद्देशून नाही, तर सिलेंडरला उद्देशून होता...
>>सातवा - महिन्याला उद्देशून
>>सातवा - महिन्याला उद्देशून नाही, तर सिलेंडरला उद्देशून होता...
ह्म्म म्हणजे लिहितानाच वाचकांना संशय येईल असे लिहिले आहे तर...