ह-झ-ल : पाहतो कोठे बिपाशा फार हल्ली...
Submitted by अ. अ. जोशी on 9 November, 2012 - 09:43
का पुन्हा धरलाय त्याने बार हल्ली ?
पाहतो कोठे बिपाशा फार हल्ली
घातली टोपी, उठविली बोंब सारी
शोधतो आहे तिला भंगार हल्ली
"चालतो आम्ही समाजाच्याबरोबर.."
का? कुणीही देत नाही कार हल्ली ?
बैठका झाल्या कमी अन भांडणेही..
आमचा असतो रिकामा जार हल्ली...
पाहतो मी 'दूरदर्शन' फक्त आता
बंदही ठेवीत नाही दार हल्ली...
केवढे लिहितात, बडबडतात सारे
काय कोणा मिळत नाही मार हल्ली ?
रोज ढुसक्या सोडती हे न्यूजचॅनल
पादण्या फुकटात मिळती पार हल्ली
खेळही ज्याने करावा भ्रष्ट, कुजका
त्या गळ्यामध्येच पडती हार हल्ली...
एवढे पाणी मिळत नाहीच कोठे ?
वापराव्या खास चड्ड्या चार हल्ली
शब्दखुणा: