आठवण...

Submitted by अ. अ. जोशी on 6 February, 2012 - 08:37

आठवण

सकाळच्या कोवळ्या किरणांबरोबरच
आज पुन्हा तुझी आठवण आली
मन भरून आलं
डोळे भरून आले
खोली मात्र रिकामीच होती

भुरुभुरु पडणार्‍या पावसाबरोबर
आठवणींचे शिंतोडे उडत होते
हातावर पडणारे थेंब मी पुसले खरे...
पण.. पावसाचे कुठले ? डोळ्यातले कुठले ?

थेब पुसत असताना
मनाचा कोपरा मनाला बोचला
नको असतानासुद्धा
गारवा निर्माण झाला

आठवणींच्या कोपर्‍यातून आलेल्या
जराशा हलक्या हवेने
क्षणांत शहारा आला
मान जशी थरथरली
देह खुर्चीवर कोलमड्ला
मन थार्‍यावर येताना
मोडक्या खुर्चीत
तुझ्याच आठवणींनी
पुन्हा आसरा दिला...

*****

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा वा वा!

अधिक आवडलेल्या ओळी:

पण.. पावसाचे कुठले ? डोळ्यातले कुठले ?

मनाचा कोपरा मनाला बोचला

मान जशी थरथरली
देह खुर्चीवर कोलमड्ला
मन थार्‍यावर येताना
मोडक्या खुर्चीत
तुझ्याच आठवणींनी
पुन्हा आसरा दिला...

तसेच, नको असलेला गारवा हेही आवडले.

एका ठिकाणी थेंबचे थेब असा टायपो झालेला दिसतो.

कविता छान. धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सुंदर..

भुरुभुरु पडणार्‍या पावसाबरोबर
आठवणींचे शिंतोडे उडत होते
हातावर पडणारे थेंब मी पुसले खरे...
पण.. पावसाचे कुठले ? डोळ्यातले कुठले ?

>> हे अस्सल उतरले आहे! Happy

थेब पुसत असताना
मनाचा कोपरा मनाला बोचला
नको असतानासुद्धा
गारवा निर्माण झाला

हे तर अप्रतिम्............खूप खूप आवडली......... Happy

भुरुभुरु पडणार्‍या पावसाबरोबर
आठवणींचे शिंतोडे उडत होते
हातावर पडणारे थेंब मी पुसले खरे...
पण.. पावसाचे कुठले ? डोळ्यातले कुठले ?<<< एकदम खास

<<भुरुभुरु पडणार्‍या पावसाबरोबर
आठवणींचे शिंतोडे उडत होते
हातावर पडणारे थेंब मी पुसले खरे...
पण.. पावसाचे कुठले ? डोळ्यातले कुठले ?>>

सुरेख.