Submitted by अ. अ. जोशी on 16 February, 2011 - 12:18
वादात या कुणीही सहसा पडू नये
पडल्यावरी कुणीही नंतर रडू नये
वाटे असे मलाही 'मोठी जगात हो'
माझ्यामुळे तुझेही कोठे अडू नये
अडवून मार्ग माझा शिक्षा तुलाच की !
ध्यानात ठेव इतके कोणा नडू नये...
घ्यावे जवळ कधीही, कोठे, कुणासही
इतकीच काळजी घे, मस्ती जडू नये
येथे स्थिरावलेले होते असे किती?
कोणा उगाच वाटे काही घडू नये
शिशिरात पालवीची शोभा नुरे जशी
प्रतिभा कुण्या कवीची इतकी झडू नये
जातील चंद्र, तारे कोठे लपूनही
गुणवान कोणताही कोठे दडू नये
**** पहिली ओळ कैलासची आहे.
गुलमोहर:
शेअर करा
२५ मिनिटात जेवढी जमली तेवढी
२५ मिनिटात जेवढी जमली तेवढी आहे.
<< २५ मिनिटात जेवढी जमली
<< २५ मिनिटात जेवढी जमली तेवढी आहे. >>
नक्की कसली घाई होती ?
अशक्य आहात. ___/\___ खूप
अशक्य आहात. ___/\___
खूप सुंदर!!
>>माझ्यामुळे तुझेही कोठे अडू
>>माझ्यामुळे तुझेही कोठे अडू नये
इथे 'माझ्याविना' कसे वाटेल?
जातील चंद्र, तारे कोठे
जातील चंद्र, तारे कोठे लपूनही
गुणवान कोणताही कोठे दडू नये
सुंदर!!!
शिशिरात पालवीची शोभा नुरे
शिशिरात पालवीची शोभा नुरे जशी
प्रतिभा कुण्या कवीची इतकी झडू नये
फार्फार आवडला. छान गझल अजयजी.:)... खरं तर शीघ्रगझल.
शिशिरात पालवीची शोभा नुरे
शिशिरात पालवीची शोभा नुरे जशी
प्रतिभा कुण्या कवीची इतकी झडू नये
हाच आवडला...
सुरेखच
सुरेखच
जातील चंद्र, तारे कोठे
जातील चंद्र, तारे कोठे लपूनही
गुणवान कोणताही कोठे दडू नये
व्वा... छान
आवडली.....
आवडली.....
धन्यवाद! चला, मी आत्ता
धन्यवाद!
चला, मी आत्ता बंगळुरुला जात आहे आठवडाभर. तिथे इंटरनेट मिळाल्यास बघेनच!
प्रतिभा आणि गुणवान अतिशय
प्रतिभा आणि गुणवान अतिशय सुरेख!
शिशिरात पालवीची शोभा नुरे
शिशिरात पालवीची शोभा नुरे जशी
प्रतिभा कुण्या कवीची इतकी झडू नये
हाच आवडला...
रामकुमार