पहिल्यासारखं मन आता कशातच रमत नाही
मनात खूप इच्छा असते पण काही जमत नाही.
हातांना आता पूर्वीसारखा पेलत नाही भार,
पेला जरी हातात घेतला तरी थरथरतात फार.
पायऱ्या-जिने फारसे आता चढवत नाहीत भराभर
अहो करणार काय, गुढग्यांनी कधीच केलेत हात वर.
हिरड्यांनी दातांना आता दिला नाही थारा,
त्या कवळीचाच असतो आता तोंडावर पहारा.
विस्मरण इतकं होतं की कधी कधी काही आठवत नाही,
ह्याच भीतीने आमची ही मला कुठे कुठे पाठवत नाही.
जप-तप अन राम-नाम हेच आता चालतं,
देहाचं पिकलं पान आता वाऱ्यानेही हालतं.
सूर तुझा कसा?
मोरपंखी स्पर्श जसा,
वाऱ्यावरील अलवार झोका,
पाव्यातला नाद जसा,
कि उमललेला सोनचाफा?
सूर तुझा कसा?
ओला पहिला मृदगंध जसा,
मंद धुंद निशिगंध जसा,
फुलातला मकरंद जसा,
कि अळुपर्णावरील मोती जसा ?
खरंच..
मला गवसला जो,
तो तुझा सूर कसा?
सागराची गाज तसा?
शांत पुनवेचं चांदणं तसा?
सांजवेळीची कातर हुरहुर तसा?
कि निसर्गाचा राग नवा?
मला गवसलेला तव सूर असा,
माझ्या स्वरात मिसळावा तसा!
अगदीच तसा!!
---------------------------------
सांगावयाचे होते काही
परि शब्द आठवेना
कुंचल्याने यत्न केला
तरि रंग सापडेना
गाण्यात भाव बांधू
ताल-सूर ही जूळेना
हा प्रांत नाही माझा
विसरावे कसे कळेना
------------------------
http://anujit.wordpress.com/
जुनीच
-----------------------
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला
- नी
त्यांच्याकडे व्हायोलिन होती. ती व्हायोलिन ते वाजवतही असत. कसलेतरी प्रच्छन्न उदास सूर काढत असल्याप्रमाणे त्या तारांवरून सावकाश बो फिरवत बसत. थरथरणार्या हातात बो आणि झंकारणार्या तारा. त्यांनी कुठूनतरी ही व्हायोलिन पैदा केल्यावर, जुडो कराटेसारखंच व्हायोलिन शिकायलाही पुस्तक आणलं. पण ते त्यांना बहुतेक जमलं नसावं.
सोसण्याचा सूर होतो
आणि थकवा दूर होतो...
सूख सारे वाटले की
मग सुखाला पूर येतो...
रे तमाच्या तावडीतुन
मुक्त हा बघ नूर होतो...
धरण हे भरता मनाचे
भावनेला पूर येतो...
पेटण्या आधीच मित्रा
बघ असा हा धूर होतो...
निश्चयाच्या रे बळाला
"तोच" फळ भरपूर देतो...