सूर तुझा कसा?

Submitted by @गौरी on 9 March, 2021 - 09:20

सूर तुझा कसा?
मोरपंखी स्पर्श जसा,
वाऱ्यावरील अलवार झोका,
पाव्यातला नाद जसा,
कि उमललेला सोनचाफा?

सूर तुझा कसा?
ओला पहिला मृदगंध जसा,
मंद धुंद निशिगंध जसा,
फुलातला मकरंद जसा,
कि अळुपर्णावरील मोती जसा ?

खरंच..
मला गवसला जो,
तो तुझा सूर कसा?
सागराची गाज तसा?
शांत पुनवेचं चांदणं तसा?
सांजवेळीची कातर हुरहुर तसा?
कि निसर्गाचा राग नवा?

मला गवसलेला तव सूर असा,
माझ्या स्वरात मिसळावा तसा!
अगदीच तसा!!

---------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अस्मिता, धन्यवाद! तुझं लेखन इतकं खोल आणि छान असतं, तुझ्याकडून कौतुक निश्चितच आनंददायी.
अज्ञात, धन्यवाद.. ! तुमच्या कथा वाचूनच माबोकर झाले. त्यामुळे तुमचा प्रतिसाद सुखावून गेला.
धन्यवाद रूपाली!
धन्यवाद सामो!
धन्यवाद तेजो!
खूप आभार...

Chan

धन्यवाद विरू!
तुमच्या कथा मलाही आवडतात त्यामुळे छान वाटलं प्रतिसाद पाहून ..