प्रकाशचित्रण

खंड्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 March, 2016 - 03:47

आमच्या घराच्या परिसराभोवती असलेली झाडी व पावसाळी सुरू झालेला छोटा ओढा हिवाळ्यापर्यंत सजीव असल्याने आमच्या परिसरात अनेक पक्षी भक्ष्यांच्या, वसाहतीच्या आधारासाठी येतात. त्यातच वेगळे रूप, टोकदार लांब चोच आणि विशिष्ट निळा रंग ह्यामुळे खंड्या पक्षी लक्ष वेधून घेतो. त्याचा किर्रर्र असा गर्जना करणारा आवाज त्याच्या अस्तित्वाची दिशा क्षणात दाखवून देते.

शब्दखुणा: 

अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई

Submitted by मुरारी on 13 March, 2016 - 11:31

या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला. मग इतर लोकांच्या गाड्या निघाल्या

सकाळचे लातूर स्टेशन
॑wdeew

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती

Submitted by दिनेश. on 8 March, 2016 - 04:37

नेहमीचा शिरस्ता सोडून या वेळेस मी देशातच भटकंती करायचे ठरवले होते. दार्जीलिंगच का निवडले,
याला तसे नेमके कारण नाहि. पण तरीही सांगायचेच म्हंटले तर मी अजूनही हिमालय बघितला नव्हता, आणि दुसरे म्हणजे मर्यादीत काळात जाऊन येण्यासाठी तो सेफ पर्याय होता. ( सिमल्याला लँड स्लाईड झाली होती. )

तर या भागात काही प्राथमिक माहिती.

१) माहिती कुठून मिळवाल ?

http://www.darjeeling-tourism.com/ हि राज उपाध्याय यांची साइट खुप छान आहे. त्यांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून हे सगळे लिहिले आहे. प्रत्येक भागाचे सविस्तर वर्णन आहे.

हाडांचे प्रार्थना स्थान म्हणजेच ऑशुअरी- नवीन

Submitted by रेव्यु on 4 March, 2016 - 07:36

माझा हा लेख २ वर्षांपूर्वी अनुभव मध्ये छापून आला होता.

हाडांचे प्रार्थनास्थान- द बोन चॅपल – कुत्ना होरा

बाहेरून दिसणारे चॅपल

इस्राईलच्या पुण्यभूमीत

Submitted by निसर्गा on 1 March, 2016 - 08:47

इस्राईलला येऊन महिनाच झालेला. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.कसा साजरा करावा,यावर बर्र्च काथ्याकूट झाल्यावर ठरलं- 'जेरुसलेम'!!!

एक उनाड सकाळ

Submitted by गिरिश सावंत on 1 March, 2016 - 02:35

सहज म्हणून कुडाळ - वेंगुर्ले ची फेरी केली ,सकाळी ५.३० ला घर सोड्ले
इतर वेळी सायंकाळी पाहला जाणारा समुद्र सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहता यावा एवढ्यासाठी ...माझ्या घरापासून जवळपास तासा - डीड तासाच्या अंतरावर कुडाळ पाट पर्यंत सूर्योदयाच्या पूर्वी पोहचण्याचे उधिष्ट ..
सूर्याच्या पहिल्या किरणात पाट चा तलाव क्लिक झाला आणि मग कट लाईट मिळविण्यासाठी धडपड ,... निवती , कोचारे , खवणे , मोबारा , आणि मग वेंगुर्ले ..दुपारी जेवायला घरी ,

camera : canon 550d with 10 - 22 wide angle and 18 - 135mm lence: software : lightroom

प्रची १: कोचरे गाव , वेंगुर्ले

महादजी शिंदे छत्री - उत्कृष्ट स्मारक

Submitted by भागवत on 18 February, 2016 - 07:29

मी हडपसर येथे राहतो. हडपसर पासून शिंदे छत्री 7 किमी वर वानवडी पुणे येथे आहे. बऱ्याच दिवसा पासून शिंदे छत्री भेट देण्याची इच्छा होती. एवढ्या जवळ असून सुद्धा मुहूर्त काही लागत नव्हता. एका रविवारी पत्नीची तुळशीबाग येथील खरेदी लवकर आटोपली मग आम्ही आमचा मोर्चा शिंदे छत्री इकडे वळवला. आपल्यावर आपल्या भावंडांचा खूप प्रभाव असतो. माझी मोठी भगिनी (सौ. गीता) तिला ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर पूर्ण माहीती मिळवण्याची धडपड असते. माझा सुद्धा हाच प्रयत्न असतो.

जाता सातार्‍याला - "माणदेशी भटकंती"

Submitted by जिप्सी on 7 February, 2016 - 11:44

मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान

Submitted by अ'निरु'द्ध on 7 February, 2016 - 04:23

मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान...

( या मालिके मधील पुढचा भाग....

मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव

बाहा'य धर्ममंदिर - पनामा

Submitted by वर्षू. on 4 February, 2016 - 21:07

गेली बरीच वर्षे येथील एका उंचच उंच डोंगरवजा टेकडीवरून बाहाय मंदिरा चे पांढरेशुभ्र,अंडाकार छत खुणावत होते. या वेळी इथे भेट द्यायची असा निर्धारच केला होता. त्याप्रमाणे शहरा च्या वेशी जवळ , डावी कडे वळून वर वर डोंगरावर जाणार्‍या वळणावळणा च्या रस्त्यावर गाडी घेतलीच. लगेच दुतर्फा पसरलेले घनदाट रेन फॉरेस्ट साथ देऊ लागले. १५,२० मिनिटांनी टेकडी च्या समतल केलेल्या माथ्यावर पोचलो. सभोवार सुंदर बगीचा केलेला होता. बागेत उंच वृक्ष, सुंदर फुलझाडे इ. सोबत साठेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण