आफ्रिका असा सरसकट शब्द आपण वापरत असलो तरी हा फार मोठा खंड आहे आणि त्यात तितकीच विविधताही आहे. त्यातही पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका ( हे दोन्ही सब सहारन भाग असले तरी ) मधेही खुप फरक आहे.
पूर्व आफ्रिकेत म्हणजे केनया, टांझानिया आणि युगांडा मधे पूर्वापार पर्यटक जात आहे, त्यामूळे त्यांना मिळणार्या
सोयी तर उत्तम आहेतच शिवाय स्थानिक लोकांना पण पर्यटकांची सवय आहे. त्या मानाने पश्चिम आफ्रिकेत
या सोयी तितक्याश्या उपलब्ध नाहीत.
आता आता कुठे या देशात पर्यटक यायला लागले आहेत.
केनयात असताना, या सुखसोयी असल्याने माझे भरपूर भटकणे झाले. शिवाय तिथला भारतीय प्रभाव हा एक
मित्रहो,
अनेकांना फोटो काढायची हौस असते मात्र महागडे कॅमेरे घेता येतातच असे नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या उत्कर्षासोबत नवनवीन स्मार्ट्फोन बाजारात आले/येत आहेत ज्याकरवी आपण आपली ही हौस भागवून घेऊ शकतो.
तर सांगायचा(रादर विचारायचा ) मुद्दा हा की, आयफोन्/अँड्राईड फोनवरून उत्कृष्ट फोटो काढणारे अनेकजण इथे असतील त्यांनी नवशिक्यांना स्वानुभवाच्या काही टिप्स दिल्या तर किती चांगले. आपल्यापैकी चांगले फोटो काढणारे जे असतील त्यांना त्यांचे ज्ञान इथे शेअर करायला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा.
खूप वर्षानंतर राजगडाला चोर दरवाजाने जाण्याचा योग आला तो ही ह्या वर्षातला पहिला मान्सून ट्रेक.
बुधवारी सकाळी सकाळी आम्ही आठ शिलेदार राजगडाकडे पुण्यावरून मार्गस्थ झालो.पुण्यावरून नसरापूर मार्गे आम्ही राजगड पायथ्याचे गुंजवणे गाव गाठले. वाटेत चहा साठी फक्त एक छोटा थांबा झाला.
सकाळी वातावरण खूपच सुंदर होते पावसाला अजून सुरवात झाली नव्हती पण सगळीकडे धुके होते.चोरदरवाज्याच्या रस्त्याने दिसणारी सुवेळा माची अजून पूर्ण धुक्यातच होती. आम्ही पहिल्या टप्यावर पोहचेपर्यंत पाऊसाने सुरवात केली आणि आजचा दिवस मस्त भिजण्याचा आनंद मिळणार ह्यावर शिक्कामोर्तब झाले.
/>०३/०७/२०१६
पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल...
चॅप्टर तिसरा
"आश्रमाची ओळख "
सिंगापूरच्या सहलीत एक दिवस हातात रिकामा होता. काय करावे? या प्रश्नावर तिघा चौघांनी जुराँग बर्ड पार्क असे एकमुखी उत्तर दिले. झू हा प्रकार मला फारसा आवडत नाही. पण मित्राने 'तुला १००% आवडेल याची खात्री मी देतो' असे सांगितल्यावर आणि त्याचेही निसर्गप्रेम माहीत असल्यामुळे जायचा बेत आखला.
पक्षी निरीक्षण हा काही माझा छंद नाही - कारण बर्याच वेळा पक्षी मला दिसेपर्यंत तो तिथून उडून गेला असतो. मला बहूतेक वेळा हलणारी पानेच दिसतात. पण यावेळेस मात्र ते आकाशीय सौंदर्य भरपूर आणि अगदी जवळून बघता आले. त्याचीच ही झलक...
१. खुन्नस
काया बेशुद्ध पडुन अजुनही शुद्धीवर आलेली नसते. चैतन्य वल्हव मारत होडीला पुढे नेत होता. आता रात्रीचे दोन वाजले होते. थोड्याच तासांनी सकाळ होणार होती. चैतन्यला त्याच मन खात होत की; त्याने जर विश्रांतीसाठी होडी काठावर नेली नसती तर कायाला ही दुखापत झालीच नसती. पण त्याच प्रसंगामुळे सुयुध्दला त्याची शक्ती जागृत करता आली. त्याने एवढ्या मोठ्या दानवाला सहज मारुन टाकले होते. आज पर्यंत त्याच्या वयाच्या कोणत्याही मुलाला हे अशक्यच होते. जी उडण्याची शक्ती अजुन मला प्राप्त नाही हे त्याने सहज करुन दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टीला चमत्कारच म्हणावं लागेल. एवढा विचार करुन तो वल्हव मारत राहिला.
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
ट्रेक दरवेळी प्रायवेट गाडी घेउनच का करावा.. कधीतरी एसटी,ट्रेन अश्या पब्लिक ट्रांसपोर्टची मदत घेत ट्रेक करण्याची मजा काही औरच असते.. मग त्यासाठी वेळेच गणित मांडा आणि जरा इकडे तिकडे झालं किंवा होउन नये म्हणून होत असणारी धावपळ चांगलीच लक्षात राहते... आम्हाला या पारंपारिक पद्धतीचा शिरस्ता मोडायचा नसल्यामुळे अधुन- मधून असे ट्रेक करतच असतो... अशीच खुमखुमी मित्र रोमाला आली.. या मागचं खर कारण तर नेमका शनिवारी त्याला कामावर मिळालेला ऑफ नि थंडीचा ऑन सिझन... माझं म्हणाल तर मी बर्यापैंकी ट्रेक फ्लो मध्ये होतो.. आधी अंजनेरी मग पद्मदुर्ग नि आता रोमाचा संदेश.. चलो हरिहर.. !! सलग तीन आठवडे ट्रेक..!
गेल्या वर्षी जुलै महिन्यात मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, नविन आणि यो रॉक्स सोबत रोहा परीसरातील तळगड, घोसाळगड, कुडा लेणी आणि बिरवाडीचा किल्ला अशी दुर्गभ्रमंती केली त्याची हि चित्रझलक.
तळगड