ट्रेक म्हणजे काय रे भाऊ...?
काय अस खास ठेवलय त्या डोंगरात...
कशाला उगाचच तंगडतोड करायची..
खर म्हणजे आपल्याला झेपेल का ?
अशा नाना विविध प्रश्नांनी माझ्या मनाला भंडावुन सोडल होत. पण तरीही मी गोपिला होकार कळविला. डोंगर चढण हे तस माझ्यासाठी नवीन नव्हत.लहाणपणी उन्हाळ्याच्या सुट्टित गावाला गेलो की आम्ही जरंडा गाठायचो.
खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट
मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा एक सोहळा असतो खरच. मागच्या वर्षअखेरीस खास पक्षीनिरीक्षणाकरता गोव्यात गेलो होतो व तिथुनच कर्नाटकात भटकंती करुन परत यायचे असे ठरले होते. जाताना विचार केला होता की रात्री निघायचे व जातानास सकाळी झुआरी नदीतील पक्षीनिरीक्षण उरकुन बोंडलाला प्रस्थान ठोकायचे. निघण्यापूर्वीच कामतांचा निरोप आला की सध्या भरती असल्याने सकाळी येऊ नका दुपारी २ नंतर या. त्यामुळे आधी बोंडलाला पोचुन सकाळच्या सत्रामधे थोडे पक्षीनिरीक्षण करुन मग झुआरीला गेलो.
Bronzed Winged Drongo कोतवाल
आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..
पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.
१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.
सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
सात वर्षापुर्वी माझ्या ट्रेकची सुरवात ज्या गडाने झाली.. ज्या गडाने सह्याद्रीचे वेड लावले.. त्या 'रायगड'शी या दिर्घ कालावधीनंतर भेटीस जात होतो.. बायकोला घेउन तसे ट्रेक केले होते पण यावेळी माझी चिऊ (पुतणी) होती.. तिला रायगड दाखवायचे वचन जे दिले होते.. रज्जुमार्गेच जाणार होतो त्यामुळे ट्रेक कम सहलच होती.. पण मुख्य आकर्षण रायगडच होते..
ह्या वर्षी घरीच गुढी बनवायच अस ठरवल.
मग हे असं काहितरी करायच सुचलं.....
आवडेल अशी आशा आहे
१.
२.
३. पाया पडावं ही अपेक्षा नाहि....मला स्वत: ला डिटेलिंग खुप आवडल म्हणून इथे फोटो टाकत आहे
४. कशी वाटली रांगोळी??
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून गाडगीळ काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते.