महाराष्ट्र दिन विशेष - "घाटवाटा- सह्याद्रीतील दुर्गम वहिवाटा"
सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
"माझ्या एका मित्राच्या गावी; शिरकोलीला यात्रेचे आमंत्रण आले आहे. शनिवारी निघून रविवारी परत..!!"
असा संदेश किरणने ग्रूपवर टाकला आणि पटापट "हो येणार", "चुकवणार नाही", "फायनल रे" असे रिप्लाय आले.
यात्रा, बगाड, गांवरान चिकन-मटण आणि कँपिंग वगैरे गोष्टी असल्याने या राईडचे फारसे प्लॅनींग झालेच नाही. सगळे जण लगेचच तयार झाले.
माझ्यासह कांही मित्रांची सायकल अनेक दिवसांपासून (की महिन्यांपासून) घरातच विसावली असल्याने सायकल राईडचे निमीत्त हवेच होते. त्यामुळे गाडीने जायचे की सायकलने हा मुद्दाही लगेचच निकाली निघाला.
सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!