पंख होते तो.....
Submitted by माधव on 29 June, 2016 - 00:56
सिंगापूरच्या सहलीत एक दिवस हातात रिकामा होता. काय करावे? या प्रश्नावर तिघा चौघांनी जुराँग बर्ड पार्क असे एकमुखी उत्तर दिले. झू हा प्रकार मला फारसा आवडत नाही. पण मित्राने 'तुला १००% आवडेल याची खात्री मी देतो' असे सांगितल्यावर आणि त्याचेही निसर्गप्रेम माहीत असल्यामुळे जायचा बेत आखला.
पक्षी निरीक्षण हा काही माझा छंद नाही - कारण बर्याच वेळा पक्षी मला दिसेपर्यंत तो तिथून उडून गेला असतो. मला बहूतेक वेळा हलणारी पानेच दिसतात. पण यावेळेस मात्र ते आकाशीय सौंदर्य भरपूर आणि अगदी जवळून बघता आले. त्याचीच ही झलक...
१. खुन्नस
विषय:
शब्दखुणा: