इस्राईलला येऊन महिनाच झालेला. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.कसा साजरा करावा,यावर बर्र्च काथ्याकूट झाल्यावर ठरलं- 'जेरुसलेम'!!!
वास्तविक धार्मिक स्थळ आणि लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण हा विरोधाभास इंडियाबाहेर असल्यामुळे सुटला. (युद्ध सुरु झालं होतं. युद्धजन्य परीस्थितीत तिथे जावं की नको यावरही परत ‘समित्या’ नेमल्या). फारसं डिबेटींग न होता,सहकार्यांनी चांगली कल्पना म्हणून ग्रीन सिग्नल दिला. खूपशी माहिती पण दिली. बस, ट्राम अशी सगळी माहिती काढली. अगदीच तत-पप होउ नये म्हणून थोडे हिब्र्यु शब्द आणि तिकीट वगैरे काढताना लागतील म्हणून अंक पण शिकून घेतले. जेरुसलेम हे मोठे शहर एका दिवसात फिरुन होणार नाही म्हणून जुने शहर फक्त निवडले. धार्मिक स्थळांना प्रॉपर पर्यटन केंद्र कसं बनवावं हे बाहेरच्या देशांकडून शिकावं.
जेरुसलेमला सिटीमध्ये फिरायला ट्राम आहेत. त्या ट्राममधून आखिवरेखिव शहर भारी दिसतं. उंच भिंतींच्या आत वसलेलं हे जुनं शहर, सुंदर बांधिव रस्ते आणि अधुनमधून दिसणारी हिरवळ. सारंच न्यारं रुप येशू च्या गावाचं.
मेन गेट (जाफा गेट)कडे जायचा रस्ता...
या मोठठ्या भिंतीच्या मागे एवढी रंगीबेरंगी दुनिया असेल असं वाटल सुद्धा नव्हतं…इथे एकूण चार भाग आहेत- मुस्लिम क्वार्टर, ख्रिश्चन क्वार्टर, अर्मेनियन क्वार्टर आणि ज्युविश क्वार्टर. या प्रत्येक भागात, घरे, दुकाने, इमारती यांच्या बांधणीतून त्या त्या संस्कृतीचे दर्शन होते.
आत गेल्या गेल्या एक information centre लागले. तिथे आम्हाला असा एक नकाशा मिळाला आणि आम्हाला हवी ती बेसिक माहिती मिळाली.
हा जुन्या जेरुसलेमचा नकाशा
इथे जे मेन गेट आहे त्याला जाफा गेट म्हणतात. त्या भल्या मोठया दरवाजातून आत गेल्यावर पहिल्यांदा अर्मेनियन क्वार्टर लागते तिथे दाराशीच एक टॉवर आहे ज्याला david's tower म्हणतात. या टॉवरवरून जुन्या सिटीचा मस्त व्ह्यु दिसतो. इथून आत गेल्यावर छोट्या गल्ल्या लागतात.
David's tower
इन भुलभुल्लैया गलियों मे अपना भी कोई एक घर होगा,
अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा...
तिथून आम्ही ज्युविश क्वर्टर कडे गेलो. इथे आहे जेरुसलेमचं सगळ्यात मोठठं आकर्षण- western wall, इच्छापूर्ती भिंत! इथे जे मागितलं जात ते मिळतं असं म्हणतात, इतकचं नाही तर लोक आपली दु:खं या वेलिंग वॉल जवळ मांडतात.
इच्छापूर्ती भिंत
हा त्याच्या समोरचा भाग…इथे खूप वेगवेगळी म्युझियम्स आहेत.
टेंपल माउंट
हे ज्युंचे पवित्र स्थान मानले जाते. याला हाराम असं म्हणतात. हे ४ धर्मांनी बनले आहे- ज्युडाइसम, ग्रेकोरोमन पॅगानिसम, इस्लाम आणि ख्रिश्चन.
Dome of the rock
हे मुस्लिम पवित्र ठीकाण असून हे टेंपल मॉउंटमध्ये वसवले आहे. ही इस्राइलची एक ओळख मानली जाते.
सगळ्या मोठ्या इमारतींमध्ये ही सोनेरी मुकुट घातलेली निळ्या पांढर्या रंगाची सुंदर इमारत अगदी उठून दिसते.
अल-अक्सा
ही अल-अक्सा, एक खूप जुनी प्रसिद्ध मस्जिद आहे. इथे आजूबाजूला अनेक इस्लामीक गट प्रार्थना करत बसलेले असतात.
Austrian hospice
मग आम्ही जेरुसलेमच्या सगळ्यात जुन्या गेस्ट हाउस वर गेलो. Austrian hospice- हे जुन्या सिटीच्या बरोबर मध्यभागी आहे. ही पर्यटकांना राहण्यासाठी केलेली सोय आहे पण इथे बरेच लोक फोटो काढण्यासाठी येतात. जुन्या शहराचा टॉप व्ह्यु खासच दिसतो
इथे आम्ही काढलेली काही प्रचि.
मग आम्ही ख्रिश्चन क्वार्टर्स मधे आलो. भारतातून येताना आमच्या ख्रिश्चन शेजार्यानी इथे एकदा जाउन येच असे सांगितले होते. ही ती जागा जिथे येशू ख्रिस्ताना क्रूसावर चढवलं गेलं.
व्हाया डोलोरोसा मार्ग (via dolorosa street)
या रस्त्यावरून येशूंना चालवत नेलं, ते जिथे थांबले तिथे एक थांबा(station) बनवला, असे एकूण १४ थांबे आहेत. हे सगळे थांबे मिळून व्हाया डोलोरोसा (via dolorosa street) रस्ता तयार झाला.
सेंट वेरोनिका चर्च
हे सेंट वेरोनिका चर्च
ही तीच वेरोनिका, जीने डोलोरोसा वरून मार्च सुरु असताना येशूंचा चेहरा रूमालाने पुसला. तिचा तो रूमालही veil of veronica म्हणून प्रसिद्ध आहे.
होली सेपल्चर चर्च (Church of the Holy Sepulchre)
इथे ख्रिस्तांना क्रूसावर दिलं गेलं. हे दोन जागांसाठी प्रसिद्ध आहे-
काल्व्हेरी (calvary/Golgotha)- येशूना क्रूसावर दिलं ती जागा
आणि येशूचे रिकामे थडगे ( Jesus's empty tomb)- जिथे त्यांना पुरले गेले ,पण येशूंचा जन्म पुन्हा झाला असे मानले जाते म्हणून याला रिकामे थडगे म्हणतात.
हे भव्यदिव्य चर्च पाहाताना डोळे दिपून जातात. भिंतींवर बरीच रंगीत चित्रे रेखटली आहेत आणि त्यावर लावलेले जुन्या पद्धतीचे दिवे अजुनच सुंदर दिसतात.
इस्राईल मध्ये खूप कमी जागा पाहण्यासारख्या आहेत. पण त्या प्रत्येक जागेची एक वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट आहे. ती गोष्ट समजल्यावर तिथे जाउन आल्याचे अधिक समाधान वाटते.
मस्त फोटो आहेत. जेरुसालेम आता
मस्त फोटो आहेत. जेरुसालेम आता विश लिस्टमध्ये
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती.
वाह!! खूप आवडलं जेरूसलेम..
वाह!! खूप आवडलं जेरूसलेम.. भारीच उत्सुकता आहे या शहराला भेटायची..
पर्यटकांकरता किती सुरक्षित आहे ?
मस्त फोटो. भेट द्यायची
मस्त फोटो. भेट द्यायची (कधीतरी) इच्छा आहे.
छान.
छान.
सुंदर प्रवासवर्णन... उपयुक्त
सुंदर प्रवासवर्णन...
उपयुक्त माहिती...
पर्यटकांकरता किती सुरक्षित
पर्यटकांकरता किती सुरक्षित आहे ?>>अगदी सुरक्षित आहे... फक्त मुस्लिम क्वार्टर्स मध्ये थोडे रेग्युलेशन्स जास्त आहेत...
बाकी इस्राईलमध्ये भारतीय लोकांना खूप मानतात कारण त्यांच्या संकटाच्या वेळी भारतीय लोकांनी त्यांची खूप मदत केली होती,असे त्यांच्या इतिहासात लिहून ठेवले आहे...
आणि जेरुसलेम मध्ये तर भारतीय म्हनल्यावर लगेच कुठेही एन्ट्री मिळते, वर छान पैकी हसून "नमस्ते" असं त्यांच्या टोन मध्ये म्हणतात ...
फोटो आवडले. वर्णन फारच धावतं
फोटो आवडले. वर्णन फारच धावतं झालं.
खूप छान फोटो आणि वर्णन.
खूप छान फोटो आणि वर्णन.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
मस्त फोटो आणि वर्णन ही.
वाह, मस्तं.
वाह, मस्तं.
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती. इस्त्रायलबद्द्ल अजून वाचायला आवडेल.
जास्ती वर्णन हे कदाचित फ़ोटो
जास्ती वर्णन हे कदाचित फ़ोटो ला मारक ठरल असत म्हणून त्यांनी मोजकेच लिहिल आहे.
...मस्त फ़ोटो..।
माहिती साठी धन्यवाद...!
खुप सुंदर ... मलाही इथे जायची
खुप सुंदर ... मलाही इथे जायची खुप इच्छा आहे.
खूपच मस्त वर्णन आणि
खूपच मस्त वर्णन आणि फोटो.
अशाच भेटी घडवत रहा.
इन भुलभुल्लैया गलियों मे अपना भी कोई एक घर होगा,
अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा... हे खूपच आवडलं
हे ठिकाण आता माझ्याही विशलिस्टमधे
मस्त फोटो आणि
मस्त फोटो आणि माहिती.
रच्याकने, यार्देना ससोन्कर भेटली का कुठे ?
मस्त लेख.. रच्याकने,
मस्त लेख..
रच्याकने, यार्देना ससोन्कर भेटली का कुठे ? >> हा हा. ससोन्कर नाही रे सासोनकर. हल्ली नसते मात्र 'तिकडे' सुद्धा
काळाचे अन विविध संस्कृत्यांचे
काळाचे अन विविध संस्कृत्यांचे फार प्रेक्षणिय ठसे अस्णार इथे.
हे अन इस्तांबूल मला ट्रेझर हंट सारखे ह्या खुणा शोधत शोधत बघायचेत.
निसर्गा , मस्त लेख. पण दिल अभी भरा नही. अजून येउद्या!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
सगळेच फोटो छान
सगळेच फोटो छान
सुंदर फोटो आणि मस्त माहिती.
सुंदर फोटो आणि मस्त माहिती.
मस्त लेख आणि फोटो
मस्त लेख आणि फोटो
मस्त लेख.
मस्त लेख.
khup chan ya adhi mi na
khup chan ya adhi mi na prabhu yanche egiptayan madhe he vachlele athavte
तीन हजार वर्षांचा इतिहास
तीन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या जेरुसलेम बद्दल लिहिलेले सायमन सीबग मांटफ़िऑरी या लिहिलेले (अनुवाद : सविता दामले....जवळपास हजार पानांचे पुस्तक आहे, त्यावरून जेरुसलमेच्या इतिहासाची कल्पना यावी) हे पुस्तक मी वाचताना अगदी हरवून गेलो होतो या शहराच्या नावाभोवती सार्या जगात असलेल्या अदभुत अशा आकर्षणामुळे. जेरुसलमेची चरित्रकथा असे म्हटलेले आहे त्या अनुषंगाने सुरुवातीलाच उल्लेख आहे की हा सार्या जगाचा इतिहास आहे. आज "इस्त्रायलच्या पुण्यभूमीत" हे शीर्षक वाचताच खात्री पटली की निसर्गा यानी जेरुसलेम संदर्भातीलच लेखन केले असणार.
फोटो पाहून तर वेडावल्यासारखे झाले. "जेरुसलेम" पुस्तकातील मजकुरासोबतीने या फोटोकडे पाहणे आनंददायी आणि अभ्यासाच्या दृष्टीनेही फार उपयुक्त ठरणार याची मला खात्री आहे.
विशेषतः "....येशूचे रिकामे थडगे...." याच्या उल्लेखाने तर मला भारावल्यासारखे होऊन गेले. कारण हे स्थळ धर्मावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. येशूचा पुनर्जन्म झालेला आहे यावर त्यांचा नितांत विश्वास असूनही भक्तांनी येशूला जिथे पुरले होते ती जागा नष्ट न करता थडगे मुद्दाम रिकामे का आहे याची चर्चा व्हावी या उद्देशाने तशीच ठेवली आहे. त्याला ते लोक भेटही विनम्रतेनेच देत असतात. आपल्याकडे ही संकल्पना शक्य नाही. देऊळ आहे पण तिथे मूर्ती नाही, हे चित्र नजरेसमोर येणार नाही. अर्थात प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी असल्याने "रिकामे थडगे" हे त्यांच्या नजरेने पवित्र आहे हे मान्यच.
धन्यवाद निसर्गा याना...फोटो सोबतीने आवश्यक ती माहितीही अतिशय पूरक अशीच दिल्याबद्दल.
तुम्ही भेट दिलेले स्थळ जगातील
तुम्ही भेट दिलेले स्थळ जगातील उच्च कोटिचे धार्मिक आहे.तिथे होली वॉटर्,क्रूसेस,धार्मिक साहित्य वगैरे विकणारी व इतर दुकाने आहेत का आपल्याकडच्या हिंदू देवळांसारखी.असे असेल तर काही वेगळे नियोजन अशा विक्रेत्यांसाठी तिथल्या सरकारने केले आहे काय? त्यावर निर्बंध,नियम कसे आहेत? वॅटिकन चर्चेस आणि ज्युईश चर्चेस यात धार्मिकता आणि कर्मठपणा याचा तुलनात्मक प्रभाव कसा आहे?
छान माहीती आणि फोटोज . मला पण
छान माहीती आणि फोटोज .
मला पण यार्देना सासोनकर , इस्राइल, यांची आठवण झाली.
मस्त फोटो. वर्णन आणखी
मस्त फोटो.
वर्णन आणखी सविस्तर वाचायला आवडलं असतं.
इजिप्त-इस्त्रायल-जॉर्डन अशी भटकंती माझ्या विशलिस्टमध्ये पहिल्या तीनांत आहे!
यार्देना सासोनकर कोण आहेत?
यार्देना सासोनकर कोण आहेत? कृपया बॅटरी मारा...
छान फोटो व माहिती. इथे
छान फोटो व माहिती. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
Pages