इस्राईलला येऊन महिनाच झालेला. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.कसा साजरा करावा,यावर बर्र्च काथ्याकूट झाल्यावर ठरलं- 'जेरुसलेम'!!!
वास्तविक धार्मिक स्थळ आणि लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण हा विरोधाभास इंडियाबाहेर असल्यामुळे सुटला. (युद्ध सुरु झालं होतं. युद्धजन्य परीस्थितीत तिथे जावं की नको यावरही परत ‘समित्या’ नेमल्या). फारसं डिबेटींग न होता,सहकार्यांनी चांगली कल्पना म्हणून ग्रीन सिग्नल दिला. खूपशी माहिती पण दिली. बस, ट्राम अशी सगळी माहिती काढली. अगदीच तत-पप होउ नये म्हणून थोडे हिब्र्यु शब्द आणि तिकीट वगैरे काढताना लागतील म्हणून अंक पण शिकून घेतले. जेरुसलेम हे मोठे शहर एका दिवसात फिरुन होणार नाही म्हणून जुने शहर फक्त निवडले. धार्मिक स्थळांना प्रॉपर पर्यटन केंद्र कसं बनवावं हे बाहेरच्या देशांकडून शिकावं.
जेरुसलेमला सिटीमध्ये फिरायला ट्राम आहेत. त्या ट्राममधून आखिवरेखिव शहर भारी दिसतं. उंच भिंतींच्या आत वसलेलं हे जुनं शहर, सुंदर बांधिव रस्ते आणि अधुनमधून दिसणारी हिरवळ. सारंच न्यारं रुप येशू च्या गावाचं.
मेन गेट (जाफा गेट)कडे जायचा रस्ता...
या मोठठ्या भिंतीच्या मागे एवढी रंगीबेरंगी दुनिया असेल असं वाटल सुद्धा नव्हतं…इथे एकूण चार भाग आहेत- मुस्लिम क्वार्टर, ख्रिश्चन क्वार्टर, अर्मेनियन क्वार्टर आणि ज्युविश क्वार्टर. या प्रत्येक भागात, घरे, दुकाने, इमारती यांच्या बांधणीतून त्या त्या संस्कृतीचे दर्शन होते.
आत गेल्या गेल्या एक information centre लागले. तिथे आम्हाला असा एक नकाशा मिळाला आणि आम्हाला हवी ती बेसिक माहिती मिळाली.
हा जुन्या जेरुसलेमचा नकाशा
इथे जे मेन गेट आहे त्याला जाफा गेट म्हणतात. त्या भल्या मोठया दरवाजातून आत गेल्यावर पहिल्यांदा अर्मेनियन क्वार्टर लागते तिथे दाराशीच एक टॉवर आहे ज्याला david's tower म्हणतात. या टॉवरवरून जुन्या सिटीचा मस्त व्ह्यु दिसतो. इथून आत गेल्यावर छोट्या गल्ल्या लागतात.
David's tower
इन भुलभुल्लैया गलियों मे अपना भी कोई एक घर होगा,
अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा...
तिथून आम्ही ज्युविश क्वर्टर कडे गेलो. इथे आहे जेरुसलेमचं सगळ्यात मोठठं आकर्षण- western wall, इच्छापूर्ती भिंत! इथे जे मागितलं जात ते मिळतं असं म्हणतात, इतकचं नाही तर लोक आपली दु:खं या वेलिंग वॉल जवळ मांडतात.
इच्छापूर्ती भिंत
हा त्याच्या समोरचा भाग…इथे खूप वेगवेगळी म्युझियम्स आहेत.
टेंपल माउंट
हे ज्युंचे पवित्र स्थान मानले जाते. याला हाराम असं म्हणतात. हे ४ धर्मांनी बनले आहे- ज्युडाइसम, ग्रेकोरोमन पॅगानिसम, इस्लाम आणि ख्रिश्चन.
Dome of the rock
हे मुस्लिम पवित्र ठीकाण असून हे टेंपल मॉउंटमध्ये वसवले आहे. ही इस्राइलची एक ओळख मानली जाते.
सगळ्या मोठ्या इमारतींमध्ये ही सोनेरी मुकुट घातलेली निळ्या पांढर्या रंगाची सुंदर इमारत अगदी उठून दिसते.
अल-अक्सा
ही अल-अक्सा, एक खूप जुनी प्रसिद्ध मस्जिद आहे. इथे आजूबाजूला अनेक इस्लामीक गट प्रार्थना करत बसलेले असतात.
Austrian hospice
मग आम्ही जेरुसलेमच्या सगळ्यात जुन्या गेस्ट हाउस वर गेलो. Austrian hospice- हे जुन्या सिटीच्या बरोबर मध्यभागी आहे. ही पर्यटकांना राहण्यासाठी केलेली सोय आहे पण इथे बरेच लोक फोटो काढण्यासाठी येतात. जुन्या शहराचा टॉप व्ह्यु खासच दिसतो
इथे आम्ही काढलेली काही प्रचि.
मग आम्ही ख्रिश्चन क्वार्टर्स मधे आलो. भारतातून येताना आमच्या ख्रिश्चन शेजार्यानी इथे एकदा जाउन येच असे सांगितले होते. ही ती जागा जिथे येशू ख्रिस्ताना क्रूसावर चढवलं गेलं.
व्हाया डोलोरोसा मार्ग (via dolorosa street)
या रस्त्यावरून येशूंना चालवत नेलं, ते जिथे थांबले तिथे एक थांबा(station) बनवला, असे एकूण १४ थांबे आहेत. हे सगळे थांबे मिळून व्हाया डोलोरोसा (via dolorosa street) रस्ता तयार झाला.
सेंट वेरोनिका चर्च
हे सेंट वेरोनिका चर्च
ही तीच वेरोनिका, जीने डोलोरोसा वरून मार्च सुरु असताना येशूंचा चेहरा रूमालाने पुसला. तिचा तो रूमालही veil of veronica म्हणून प्रसिद्ध आहे.
होली सेपल्चर चर्च (Church of the Holy Sepulchre)
इथे ख्रिस्तांना क्रूसावर दिलं गेलं. हे दोन जागांसाठी प्रसिद्ध आहे-
काल्व्हेरी (calvary/Golgotha)- येशूना क्रूसावर दिलं ती जागा
आणि येशूचे रिकामे थडगे ( Jesus's empty tomb)- जिथे त्यांना पुरले गेले ,पण येशूंचा जन्म पुन्हा झाला असे मानले जाते म्हणून याला रिकामे थडगे म्हणतात.
हे भव्यदिव्य चर्च पाहाताना डोळे दिपून जातात. भिंतींवर बरीच रंगीत चित्रे रेखटली आहेत आणि त्यावर लावलेले जुन्या पद्धतीचे दिवे अजुनच सुंदर दिसतात.
इस्राईल मध्ये खूप कमी जागा पाहण्यासारख्या आहेत. पण त्या प्रत्येक जागेची एक वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट आहे. ती गोष्ट समजल्यावर तिथे जाउन आल्याचे अधिक समाधान वाटते.
>>> येशूचा पुनर्जन्म झालेला
>>> येशूचा पुनर्जन्म झालेला आहे यावर त्यांचा नितांत विश्वास असूनही भक्तांनी <<<<
हे वाक्य लक्षात ठेवतो आहे. संदर्भही शोधेन.
पुनर्जन्म न मानणे असे असुनही हे कसे काय मानले जाते या बद्दल माहिति हवीये.
धन्यवाद ... इस्राईलबद्दल
धन्यवाद ... इस्राईलबद्दल नक्की अजुन नवीन गोष्टी लिहायच्या विचारत आहे...
यार्देना सासोनकर बाईंना शोधून काढायलाच हवं आता... तुम्ही सर्वजन एवढी आठवण काढत आहात तर...
यार्देना काकू , सकाळाच्या
यार्देना काकू , सकाळाच्या मुपिच्या अॅक्टीव्ह कार्यकर्त्या आहेत.
कृपया बॅटरी मारा...>>
कृपया बॅटरी मारा...>> नन्दकुमार साहेब, यार्देना सासोनकर या मुक्तपीठ मधल्या ढांसु प्रतिकिया देणार्या नेहमीच्या (बाकीचे लुनावाले ब्रह्मे, संजय कॅनडा वगैरे वगैरे) यशस्वी कलाकारांपैकी एक आहेत !
मस्त प्रचि व वर्णन! सविस्तर
मस्त प्रचि व वर्णन! सविस्तर लेखमाला येऊ देत....
पुनर्जन्म न मानणे असे असुनही
पुनर्जन्म न मानणे असे असुनही हे कसे काय मानले जाते या बद्दल माहिति हवीये.<<<
लिं.टिं. जी मानणे आणि असणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.मानणे हे हायपोथेटीकल आहे तर असणे प्रूव्ह झालेले. येशूचा पुनर्जन्म 'मानला' जातो. तुम्ही आता पुनर्जन्म असतो असे 'म्हणत' असाल तर हायपोथेसीस खरा आहे सिद्ध करु शकता.
बाकी हे पर्यटन-प्रवास वर्णन आहे.त्यांना कशाला असलं विचारता.
>>>> बाकी हे पर्यटन-प्रवास
>>>> बाकी हे पर्यटन-प्रवास वर्णन आहे.त्यांना कशाला असलं विचारता. <<<<
हे जगातील प्रमुख तिन (चार?) धर्मांच्या उगमस्थळाचे वर्णन आहे, तर असले प्रश्न येणारच.
का फक्त तिथली हॉटॅल्/रुमचे रेट /टांगा घोड्याच्या सोई इतकेच विचारणे तुम्हाला अपेक्षित आहे? एक पर्यटक म्हणून?
मस्त फोटो. सेफ नाही सेफ नाही
मस्त फोटो.
सेफ नाही सेफ नाही म्हणतात लोक .
टर्की, इजिप्त, आणि ईस्त्रायल फार हाका मारत राहतात. जाउन यायला हवय खरतर.
लिं.टिं. जी बरोबर ठिकाणी विषय
लिं.टिं. जी
बरोबर ठिकाणी विषय सोडून (चुकीची) प्रतिक्रीया देणार का आपण?
आर्थिक गुंतवणुकीच्या बाफ वर लग्नासाठी योग्य स्थळ कसे शोधावे असं विचारणार काय तुम्ही?
का फक्त तिथली हॉटॅल्/रुमचे रेट /टांगा घोड्याच्या सोई इतकेच विचारणे तुम्हाला अपेक्षित आहे? एक पर्यटक म्हणून?<< पर्यटक म्हणून 'हो' बाकी पुनर्जन्म तिथे जाऊन तिथल्या त्यातल्या जाणकाराला विचारेण...गरज वाटलीच तर.
>>>> पर्यटक म्हणून 'हो' बाकी
>>>> पर्यटक म्हणून 'हो' बाकी पुनर्जन्म तिथे जाऊन तिथल्या त्यातल्या जाणकाराला विचारेण...गरज वाटलीच तर <<<<<
तुम्हाला आर्थिक दृष्ट्या ते शक्य असेल हो तिकडे(च) जाऊन विचारणे, मला नाही ना शक्य, म्हणून तर इथेच विचारले, इथल्या माबोवरच्या जाणकारांना....
त्यातुन धागालेखकाने स्वतःच येशूच्या अंतिम मार्गावरील १४ ठिकाणे (स्पॉट) व तेथील घटना तपशीलवार एका फ्रेम मधे दिल्याच आहेत, त्या ही वाचल्य (नुस्त्य बघितल्या नाहीत), तर इथे तत्संबंधीच धार्मिक प्रश्न शंकानिरसनासाठी विचारणे असंयुक्तिक कसे काय बरे?
धागाकर्त्यास माहित असेल तर उत्तर देतिल, वा इतर जण देतील, वा देणारही नाहीत.... पण लगेच माझा असला प्रश्न अस्थानी(च) [>>>> बरोबर ठिकाणी विषय सोडून (चुकीची) प्रतिक्रीया देणार का आपण <<<<] असे खोडसाळपणे ठरवुन टाकून तसे तुम्ही म्हणावयाचे कारणच काय?
इथुन पुढे विषयांतर नको म्हणून तुमच्या पोस्टीला (इथे) उत्तर देणे नाही.
याच धाग्यावर प्रदर्शित केलेल्या फोटो व मजकुरास अनुसरुनचा माझा शंकात्मक प्रश्न कायम आहे.....
लेखातील वाक्य (फोटोसहित) >>>>> आणि येशूचे रिकामे थडगे ( Jesus's empty tomb)- जिथे त्यांना पुरले गेले ,पण येशूंचा जन्म पुन्हा झाला असे मानले जाते म्हणून याला रिकामे थडगे म्हणतात. <<<<
प्रतिसादातील वाक्य >>> येशूचा पुनर्जन्म झालेला आहे यावर त्यांचा नितांत विश्वास असूनही भक्तांनी <<<<
माझा प्रतिसाद >>>> हे वाक्य लक्षात ठेवतो आहे. संदर्भही शोधेन.
माझी शंका >>>>> पुनर्जन्म न मानणे असे असुनही हे कसे काय मानले जाते या बद्दल माहिति हवीये.
लिं.टिं. जी मला एवढं detail
लिं.टिं. जी मला एवढं detail माहित नाही खरचं तुम्ही एखाद्या जाणकाराला विचारा...
इस्टर डे दिवशी येशूचा पुनर्जन्म झाला असे मानतात एवढेच मला माहितीये... पण खरचं जन्म झाला का यासाठी बायबलचे संदर्भ शोधावे लागतील
निसर्गा, सुयोग्य /संयुक्तिक
निसर्गा, सुयोग्य /संयुक्तिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ओके बॉस...तुमचा अपेक्षित
ओके बॉस...तुमचा अपेक्षित प्रतिसाद मान्य
एल्टी, पुनर्जन्म नाही. येशू
एल्टी, पुनर्जन्म नाही. येशू थडग्यामधून रीसरेक्ट झाला असे मानले जाते. पुनरूज्जीवित. अथवा पुनरूत्थान.
ओके नंदिनी, गॉट इट... बरे
ओके नंदिनी, गॉट इट... बरे झाले, तू नेमके सांगितलेस.
पण मग नंतर तो कुठे गेला/आहे याबद्दलही माहीती समजुन घ्यायला आवडेल.
तो थडग्यामधून पुनरूज्जीवित
तो थडग्यामधून पुनरूज्जीवित झाल्यानंतर चाळीस दिवस त्याच्या शिष्यांना आणि भक्तांना दर्शन देतो नंतर तो स्वर्गामध्ये जाऊन गॉड द फादरच्या उजव्या हाताला बसतो.
या प्रतिक्रियेच्या भानगडीत हे लिहायचं राहूनच गेलं. निसर्गा, मस्त फोटो आणि वर्णन.
तुम्ही डायबेटीसवरचं सत्तर रूपयांचं औषध आणणार होता का?
येस्स नंदिनी, आठवले आता तू
येस्स नंदिनी, आठवले आता तू सांगितल्यावर.. धन्यवाद.
I read very interesting novel
I read very interesting novel about creation of christ. How it was all political move to keep people from rebelling against rulers. I forgot the name now. It was very nice almost thriller reading. Obviously after writing plausible explanation to entire lifetime of him, the writer has to put retraction at the end of the book. How his writing is all false and whatever popular knowledge about life of the christ is the truth.
हेही कसं काय मिसलं? खूप छान
हेही कसं काय मिसलं?
खूप छान माहिती. अजून डीटेलवार वाचायला आवडेल
Are me paN kasa Kay miss kela
Are me paN kasa Kay miss kela he!
Chaan mahitee aani photos.
Israel mhantala kee malahee Yardena Kaku aathavatat aadhee.
Tyana nakkee shodha
Israel mhantala kee malahee
Israel mhantala kee malahee Yardena Kaku aathavatat aadhee.>>>>>>>>>>
वत्सला....:खोखो:
छान फोटो आणि वर्णन!
छान फोटो आणि वर्णन!
Pages