नेहमीचा शिरस्ता सोडून या वेळेस मी देशातच भटकंती करायचे ठरवले होते. दार्जीलिंगच का निवडले,
याला तसे नेमके कारण नाहि. पण तरीही सांगायचेच म्हंटले तर मी अजूनही हिमालय बघितला नव्हता, आणि दुसरे म्हणजे मर्यादीत काळात जाऊन येण्यासाठी तो सेफ पर्याय होता. ( सिमल्याला लँड स्लाईड झाली होती. )
तर या भागात काही प्राथमिक माहिती.
१) माहिती कुठून मिळवाल ?
http://www.darjeeling-tourism.com/ हि राज उपाध्याय यांची साइट खुप छान आहे. त्यांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून हे सगळे लिहिले आहे. प्रत्येक भागाचे सविस्तर वर्णन आहे.
हि साइट ओपन केल्यावर त्यांचे कार्ड विकत घ्यायची गळ घातली जाते. जर तूम्ही सर्व बूकिंग नंतर करणार असाल तर ते कार्ड उपयोगी पडेल ( मी आधीच केले होते ) या कार्डासोबत एक ई-बूक फ्री मिळते. या साइटवरचीच माहिती त्यात जरा विस्ताराने आहे.
पण काही बाबतीत मात्र त्यातली माहिती अपडेट केलेली नाही ( ते मी लिहिनच ) शिवाय त्यांच्या बिझिनेस पार्टनरशिवायही अनेक पर्याय तिथे उपलब्ध आहेत.
२) कसे जाल ?
दार्जीलिंग आहे पश्चिम बंगालच्या उत्तर भागात. जाण्यासाठी कोलकोत्याहून ट्रेनने जायचा पर्याय आहे. अर्थात त्यात दोन दिवस जातील. झटपट जायचे ( तरी त्यात दिवस जातोच ) तर विमानाने जायला हवे. दार्जीलिंगला
विमानतळ नाही. सर्वात जवळचा विमानतळ बागडोगरा. इथे व्हाया दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी असे जाता येते. एअर इंडीया, जेट एअरवेज, स्पाईसजेट, विस्तारा, इंडीगो, गो असे अनेक पर्याय आहेत मुंबईहून. पण
ही सर्व विमाने दुपारनंतरच बागडोगराला उतरतात. तिथून पुढे दार्जीलिंगला जायला जीपने जावे लागते.
या प्रवासाला तीन तास लागतात. लांबच्या रस्त्याने गेलात तर चार तास. त्यामूळे भल्या पहाटे मुंबईहून
निघालात तरी तिथे पोहोचायला रात्रच होते.
३) कधी जाल ?
मार्च ते मे हा उत्तम काळ. जूनपासून पुढे पाऊस सुरु होतो. तसा डिसेंबरही चांगला काळ कारण खुप थंडी असली
तरी आकाश निरभ्र असते. पण ते हिलस्टेशन असल्याने हवामान कधीही बदलू शकते. त्यामूळे मी निवडलेला
फेब्रुवारी महिना काही योग्य काळ नव्हता. पण सध्या सिझन्स बदलत आहेत त्यामूळे मी चान्स घेतला. काही
वेळा फायदाही झाला.
४) कुठे रहाल ?
दार्जीलिंगमधे रहायचे अनेक पर्याय आहेत. अगदी बजेट पर्यायही आहेत. पण सिझनमधे अर्थातच ते खुप आधी बूक करावे लागतील. मी बूकिंग डॉट कॉम वरून डेकेलिंग रिसॉर्ट अॅट हॉक्स नेस्ट ही प्रॉपर्टी बूक केली होती.
छान डील मिळाले होते. आणि प्रॉपर्टीचे म्हणाल तर माझ्या आजवरच्या भटकंतीतली ती सर्वोत्तम जागा होती. ( फोटो ओघात येतीलच ) सध्या प्रॉपर्टीचे रिव्हू, फोटो वगैरे बघून ती बूक करायची चांगली सोय आहे.
५) काय खाल / प्याल ?
त्यासाठी पण दार्जीलिंगमधे अनेक पर्याय आहेत. तिथे जाऊन पंजाबी / दाक्षिणात्य खाणे खाण्यापेक्षा, स्थानिक
नेपाळी, पहाडी जेवण जेवता आले तर बघा. बंगाली खाणेही मिळते. आम्ही अगदी रस्त्यावरची छोटी छोटी हॉटेल्स शोधली. खुप छान जेवण मिळाले आणि आनंदाची बाब म्हणजे ते अत्यंत माफक किमतीत होते.
६) काय पहाल ?
दार्जीलिंगच्या आसपासच बरीच ठिकाणे आहेत. रॉक गार्डन, गंगा मैया पार्क, टायगर हिल, मॉल रोड, झू,
बोटॅनिकल गार्डन आहेत. आम्ही तिच बघितली आणि त्यांची वर्णने आणि फोटो येतीलच. आम्ही तसे तिथे फक्त दोन दिवसच होतो. पण तूमच्याकडे जास्त दिवस असतील तर काही ट्रेक्सही करता येतील किंवा सिक्कीम, गंगटोक वगैरेलाही जाता येईल.
७) कसे फिराल ?
तूमच्या गरजेप्रमाणे टुअर अरेंज करून मिळतील. ( आम्ही पूर्णवेळ टॅक्सी केली होती ) स्थानिक टॅक्सी पण आहेत. दार्जीलिंग मधे रस्ते अगदीच अरुंद असल्याने मोठ्या बसेस नाहीत. तसेच मुख्य ठिकाणी ( मॉल रोड ) वाहनाना बंदी असल्याने पायी फिरण्याला पर्याय नाही. काही ठिकाणी तर पायीच जावे लागते. इथे एक लक्षात ठेवायला हवे कि दार्जीलिंग हे उभ्या डोंगरावर वसलेले असल्याने तिथे चालायची अंतरे थोडी असली तरी ती प्रचंड चढ उताराची आहेत. त्यामूळे तसा चालण्याचा सराव हवा.
८) काय खरेदी कराल ?
दार्जीलिंग हे नाव घेतले कि चहाच आठवणार ! पण आमचा चहाचा अनुभव चांगला नाही. प्रत्यक्ष चव दाखवतात तो आणि पॅक करुन विकायला ठेवतात तो, यात खुपच फरक असतो. बाकी मसाले ( वेलची, दालचिनी, कलौंजी वगैरे घेता येतील, पण त्यापैकी स्थानिक किती ते कळायला मार्ग नाही. ) तिबेटी हस्तकलेचे नमुने घेता येतील. त्यांचे एक केंद्रही तिथे आहे. कोलकोता साड्या वगैरेंचे एक शोरुम मॉल रोड वर आहे. वूलन शॉल्स, स्वेटर्स मात्र चांगले आणि माफक किमतीत मिळतात. ते अर्थात पंजाब ( लुधियाना ) मधून आलेले असतात पण बारमाही मार्केट असल्याने, ते अगदी माफक किमतीत मिळतात.
९) खर्चाचा अंदाज
विमानाने गेलात तर चांगले डिल मिळून माणशी दहा हजारात रिटर्न टिकिट मिळू शकते. इतर प्रवास खर्च जो पर्याय निवडाल त्यानुसार ठरेल. तरी माणशी ५०० रुपये सरासरी पडेल ( दर दिवशी ). हॉटेल्स ५०० रुपयांपासून पुढे ( पर डे ) मिळतील. खाण्यापिण्यासाठी माणशी ५०० रुपये खुप झाले, त्यापेक्षाही स्वस्त जेवण मिळू शकते. इतर ठिकाणची तिकिटे अगदीच माफक आहेत. टॉय ट्रेनचे तिकिट आधी बूक करावे लागते, ते जॉय राईडसाठी १,००० रुपये माणशी आहे.
१०) का जायचे ?
मला वाटते, माझी वैयक्तीक कारणे सर्वांना लागू पडणार नाहीत. त्यामूळे हि मालिका संपल्यावरच ठरवा.
आता, भटकंती मालिकेतील पुढच्या
आता,
भटकंती मालिकेतील पुढच्या लेखांची वाट पहाणे आले.
वाह, उत्तम माहिती ...
वाह, उत्तम माहिती ...
मस्तच माहिती
मस्तच माहिती
छान सुरुवात. पुलेशु.
छान सुरुवात. पुलेशु.
दा.. अत्यंत उ प यु क्त
दा.. अत्यंत उ प यु क्त माहिती..
दार्जिलिंग माझं आवडतं हिल
दार्जिलिंग माझं आवडतं हिल स्टेशन. दोन वेळा जाऊन आले आहे. जाताना मुद्दाम दोन्ही वेळा जलपैगुडीवरुन ट्रेनने गेलो. फार गोड प्रवास आहे. बतासिया लूप खूप एन्जॉय केलं. एकदा सिलिगुडीवरुन जंगल सफारी केली त्याच टॉय ट्रेनने त्याचाही मस्त अनुभव.
तुमचे दार्जिलिंगचे अनुभव वाचायला उत्सुक आहे. तिसर्यांदा सफर होईल ते वाचताना.
छान सुरुवात.
छान सुरुवात.
आत्ता वाचलं... मस्त सुरुवात
आत्ता वाचलं...
मस्त सुरुवात
<< हॉटेल्स ५०० रुपयांपासून
<< हॉटेल्स ५०० रुपयांपासून पुढे ( पर डे ) मिळतील. >> ईतके स्वस्त !!
हल्ली तर महाबळेश्वर मधे सुद्धा ३००० पर डे च्या खाली हॉटेल मिळत नाही.....
छान उपयुक्त
छान उपयुक्त माहिती.
वेगवेगळ्या ठिकाणी जाणार्या आणि लिहिणार्या सगळ्यांनी अशा प्रकारे माहिती लिहिली तर उपयुक्त ठरेल.
आभार सर्वांचे, शर्मिला,
आभार सर्वांचे,
शर्मिला, ट्रेनचा माझा जॉयराईडचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. त्यातला थोडा भाग हवामानाचा आणि बराचसा रेल्वे प्रशासनाचा !
धनवन्ती, ऑफ सिझनला मिळू शकते आणि तसेही दार्जीलिंग स्वस्त आहे.
साधारण २५ वर्षांपूर्वी जाऊन
साधारण २५ वर्षांपूर्वी जाऊन आलोय.. परत एकदा जायला पाहिजे.. आम्ही तर ऐन थंडीत गेलो होतो.. दिवाळीच्या सुट्टीत..
वाह, अजुन एका मस्तं सफरीची
वाह, अजुन एका मस्तं सफरीची सुरूवात. वाचतेय.
मस्त सुरुवात ....
मस्त सुरुवात ....:-)
अरे वा.. डीटेल्ड माहिती..
अरे वा.. डीटेल्ड माहिती.. उपयोगी आहे फार.
मस्त माहिती दिनेशदा.
मस्त माहिती दिनेशदा.
दार्जिलिंग ट्रिप आखताना मदत होईल
छानच माहिती. अगदी उपयुक्त.
छानच माहिती. अगदी उपयुक्त.
फारच छान माहिती .
फारच छान माहिती .
मला पण ऊटी आणि मुन्नार मध्ये
मला पण ऊटी आणि मुन्नार मध्ये चहाचा सारखाच अनुभव मिळाला.प्रत्येक्षात चहा मस्त लागल म्हणून मी ऊटी मध्ये 3 किलो चहा विकत घेतला!!! आणि त्याची चव काडी मात्र नव्हती...