पाऊस
पावसाळे
पावसाळे
कधी आला नदीला पूर...
वाहून गेले घरदारं.
गेले पाण्याखाली शेतातले उभे पीकं!
कधी खचली जमीन...
गाडले गेले गाव.
झाले अवघे जीवन भुईसपाट!
कधी झाली अतिवृष्टी...
कोसळल्या इमारती.
गेले पाण्याखाली वाहते रस्ते!
कधी पडला दुष्काळ...
तहानभूकेने झाला जीव व्याकूळ.
थांबता थांबेना डोळ्यांतला महापूर!
परवाचीच गोष्ट...
कोरोनाच्या संकटात म्हणती,
पडू नका घराबाहेर.
अन् वादळपावसात उडाले घराचे छप्पर!
चारोळी
एक ओंजळ तुझी माझी
एक ओंजळ तुझी माझी
यायचास मोठ्या दिमाखात शाळा सुरु होताना
गडगडाट कडकडाट धडाडधूम होताना
किती मज्जा वाटायची तुझ्या सोबत नाचताना
थेंब मस्त मजेत झेलत होड्या हळूच सोडताना
छत्री, रेनकोट द्यायची आई, विसरुन घरी जाताना
पाणी उडवित भिरभिरत परत घरी येताना
डोकं पुसत ओरडे आई किती भिजलास पहाना
चहा गरम आल्याचा भज्यां सोबत खाताना
वय वाढले, गंमत सरली, छत्री घेऊन शहाणा
जाता येता नावे ठेवली आॅफिसला जाताना
परत आता नातवासोबत मजा येई भिजताना
एक ओंजळ तुझी माझी गट्टी पुन्हा जमताना
पाऊस
कालचा पाऊस खिडकीशी थडकला, गालावर ओघळला
तसे त्याचे येणे जाणे नित्याचे, कधी भरतीचे, कधी सरतीचे
वीज कडाडली, काच तडकली,आवाजही झाला
ढगांचा गडगडाट, तुटण्याचा आवाज मीच ऐकला
त्याला पर्वा नव्हती कशाची,कोसळत होता
आडवा तिडवा, बेभरवशी अन सैरावैरा
मेघ आटले, तोही थकला अन मग थांबला
आता मला कळले तो मला आरपार भिडला
तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले
ती अन् पाऊस..
ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजुन
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती
भिजावं का थोडंतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे
आठवतय मला
आकाशात साचलेले काळे ढग,
दुरून कुठूनतरी येणारा भिजलेल्या मातीचा वास,
येऊ घातलेल्या पावसाला जणू पिटाळून लावणारा वारा,
वारा अंगावर झेलत खिडकीत उभा मी,
चेहऱ्यावर आदळलेलं ते वाळकं पान
आठवतात मला ते चिखलाने भरलेले इवले इवले पाय,
माझं भिजलेलं डोकं पुसण्यासाठी हातात टॉवेल घेऊन दारात उभी आई,
पावसात भिजलेलं अंग घुसळून पाणी उडवणारा तो कुत्रा, समोरच्या मैदानावर चिखलात खेळणारी ती मुले
दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..
मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
मेघझर
पाऊस दारी येता
मी कवाडं तिरपी करते
तो टपटप वाजत रहातो
मी पाठमोरीशी होते
तो घेऊन येतो सा-या
हरविल्या सप्त सूरांना
मी विसरु पाहते सारे
तो जगवितो पुन्हा क्षणांना
तो बधत नाही मजला
अन कवाड वाजवित बसतो
मी हिरमुसली होत्साती
तो ओल्या नजरेनं पहातो
मी टाळून जेव्हा त्याला
ती बंद कवाडे करते
खिडकीवर पागोळ्यांची
सर ओघळून बरसते
वाटते मलाही तेव्हा
कवेत त्याला घ्यावे
उघडावे दार मनाचे
अन चिंब सरींत भिजावे
पहिला पाऊस
पहिला पाऊस
घनदाट मेघ हे आज दाटले,
नभी जमला रम्य देखावा.
अलगद चमके विद्युल्लता,
वाऱ्यासही का सुटला हेवा.
धरतीलाही ओढ सरींची,
आसमंत का अजाण सारा.
कुठे उडाली फुलपाखरे,
थुईथुई नाचे मोरपिसारा.
शीतल वारा मनी शहारा,
मातीलाही सुवास न्यारा.
मी मग मजला कसा सावरू,
का मी दवडू एक नजारा.
नव तरुणीसम सजली धरती ,
नेसून शालू गर्द हिरवा.
उठ उठ ते बळीराजा तू ,
गात आहे गोड पारवा.
गजानन बाठे