कविता मी तसा शाळा कॉलेजच्या दिवसांपासून लिहतोय. त्या त्या वेळी शाळा कॉलेजच्या नियतकालिकांतून वगैरे छापूनही आल्या पण त्यापलीकडे जाऊन त्याचे काही करावे किंवा कुठे सादर कराव्यात वगैरे फारसा अट्टहास नव्हता. कालांतराने मायबोलीवर आलो. गुलमोहरावर, झुळकेवर रमलो. इथे दर्जेदार लिहणाऱ्यांकडून त्या काळात दादही मिळत गेली आणि कविता लिहित राहिलो.
मध्ये बरीच वर्षे कामामुळे आणि इतर प्रायोरिटीजमुळे कवितालेखन खुप कमी झाले..... जवळजवळ नाहीच!!
चांगले चांगले वाचत होतो; youtube, podcasts वगैरेच्या माध्यमातून खुप चांगले ऐकत होतो.... पण बसून परत कविता लिहिणे वगैरे होत नव्हते.
मस्त पाऊस पडतोय का भारतात अत्ता ?
एक पावसावर चारोळी लिहू घेतली पण तिसरी अन चौथी ओळ सुचतच नाहीय.
कुणाला जमते तर लिहा ...
त्या रिमझिमत्या धारांच्या ओठी
गीत हिरवे गातो श्रावण
???
या ओळी वर खाली करता येतील.
विश्वाचा अंश वसे
तुझिया अंतरात
परी ध्यानी असू दे
तू फक्त अंशमात्र
आंतरजाली भेट झाली
छायाचित्रे किती पाठवली
कधी होशील समोर प्रकट
का प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
© चुन्नाड
आई
आई जणू असे
पंच महाभूत ।
भुमिका अद्भुत
आई होणे ।
आई जणू पाणी
मायेचा सागर ।
प्रेमाची घागर
सरली ना ।
आई जणू हवा
सजीवांना श्वास ।
अंतालाच कास
सुटतसे ।
आई जणू अग्नी
परीक्षेचा काळ ।
पती मुलं बाळ
सांभाळणे ।
आई जणू पृथ्वी
सृष्टीला आधार ।
कधी ना माघार
पोषणात ।
आई ती आकाश
खग घेती झेप ।
अन्नाची या खेप
पिलांसाठी ।
पावसानं सारं रान भिजून जावं
असच काहीतरी तुझं नि माझं व्हावं
थेंब मिसळतो जसा मातीत
तस तू ही माझ्यात मिसळून एकजीव व्हावं...
लाल सडा फुलांचा पदरावर माझ्या
हा अट्टाहास कोणाचा आयुष्य रंगवण्याचा?
मी अस्ताव्यस्त आहे
हा अट्टाहास कोणाचा मज पुन्हा मांडण्याचा?
चंदन परिमळे,
हृदय स्पंदनांत जाऊनी दरवळे,
काळजास करीती बावळे,
मधु शर्करेचे सखे तव स्मित खळे !
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !
आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे
आणि हे
तू कितीही तोडून फेकलेस मला,
तरीही मी तुझाच होणार आहे,
पारिजातक आहे मी,
पायाखाली चुरगाळले तरी सुगंधच देणार आहे...।