तत्त्वज्ञान

विठ्ठल नामाचं चांदणं

Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2019 - 03:25

विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या अंगणी सांडलं
विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या ह्रदयी गोंदण
विठूनामाचं स्मरण

त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण

तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान

विश्वात्मक तुका जाण
अवकाशी संकीर्तन
विठ्ठल नामाचं चांदणं
टाकी आकाश न्हाऊन

हक्क

Submitted by पुरंदरे शशांक on 11 October, 2019 - 07:44

हक्क

इतकेही धन नको देऊस की तू सोडून मला धनातच गुंतावसं वाटेल...

इतकेही कला गुण नको देऊस की त्यात रंगून गेल्यावर तुझाही विसर पडेल...

इतकेही सुख नको की त्यातच सुखावून तुलाच विसरेन..
इतकेही दुःख नको त्यात बुडून गेल्यावर तुझे पूर्ण विस्मरण होईल...

इतकाही मान नको की तुझ्या चरणांशी शरणागत व्हायच्या ऐवजी गर्वाने फुगून जाईन मी...

काय द्यावं, किती द्यावं हे तर सारं तुला ठाऊक असताना मी का सांगतोय हे तुला उगीचच ??
खरं तर तुझ्याकरता नाहीच्चे हे काही.., मी माझ्याच मनाला, माझ्याच बुद्धीला, अहंकाराला सांगतोय खरं तर...

देव

Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 13:10

मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तु कोंबड्या बकऱ्यांचे नैवद्य देवून मला आपलेसे करू पाहत होता.
मला तर फक्त तुझ्या मनातील भोळा भाव हवा होता.
पण तू अंधश्रद्धेच्या इतका आहारी गेलास .
की स्वतःलाच संपवून बसलास..
तु इतका क्रूर झालास.
की स्वतः मधील देवत्व च विसरून बसलास.
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तू मला अर्पण करण्या मुक्या प्राण्याला कापत होतास..
कसं सांगू तुला माझा जीव किती तुटत होता.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

देव..

Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 13:08

मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तु कोंबड्या बकऱ्यांचे नैवद्य देवून मला आपलेसे करू पाहत होता.
मला तर फक्त तुझ्या मनातील भोळा भाव हवा होता.
पण तू अंधश्रद्धेच्या इतका आहारी गेलास .
की स्वतःलाच संपवून बसलास..
तु इतका क्रूर झालास.
की स्वतः मधील देवत्व च विसरून बसलास.
मी मनात होतो तुझ्या तु दगडात शोधत राहिलास.
मी तर मित्र होतो तुझा तु उगाच घाबरलास....
तू मला अर्पण करण्या मुक्या प्राण्याला कापत होतास..
कसं सांगू तुला माझा जीव किती तुटत होता.

शब्दखुणा: 

निःशब्द प्रार्थना

Submitted by पुरंदरे शशांक on 21 September, 2019 - 14:06

निःशब्द प्रार्थना

हात जोडले नसे का
मूर्ति नसे का गोमटी
अंतरात वसे उर्मी
हरि आहेच सांगाती

मागायाचे सर्वज्ञाला
हे तो उफराटी गोठी
शब्दी मावेना प्रार्थना
नको गीत हरी साठी

देखे नयनामधून
बोले वाणी चालवून
कसे स्तवन करावे
मौन हेचि तेथ खूण

तोचि आधार एकला
श्वास चालवी सकळ
जाणवता क्षणभरी
होय प्रार्थना सफळ...

पुनरागमनायच

Submitted by पुरंदरे शशांक on 11 September, 2019 - 23:54

पुनरागमनायच

चरणांशी बहु । लावोनिया लळा ।
काय जी कृपाळा । जाता गृही ।।

वेड्या वाकुड्या त्या । पूजादी सेवा ह्या ।
गोड मानूनिया । घ्याव्या देवा ।।

नाही मनी भाव । अज्ञानी पतित ।
चित्ती सदा खंत । लौकिकाची ।।

धरावे पोटाशी । मज बालकासी ।
विनंती पायाशी । गजानना ।।

वाट पाहेन मी । अंतरी संतत ।
ठेवा जी जागृत । सर्वकाळ ।।

ऐहिकाच्या पाशा । सोडवावे देवा ।
पायापाशी ठेवा । अखंडित ।।

सोळा आण्याच्या गोष्टी- बाहुली -कटप्पा

Submitted by कटप्पा on 10 September, 2019 - 12:37

आज चिंगी चा पाचवा वाढ़दिवस. सर्व मित्र मैत्रिनी नातलग जमलेले.
केक कापणे वगैरे प्रकार झाल्यानांतर चिंगी ने घोषणा केली.
मी आज सर्वाना रिटर्न गिफ्ट देनार आहे.माझ्याकडे असणारी खेळणी मी शेयर करणार.

बाबा तुम्हाला हि माझी कार . तुम्ही मला खर्या कार मधे फिरवता.
आई तुला हा छोटासा फ्रिज. तु मस्त मस्त खाऊ बनवते.
काकु तुम्हाला हि छोटी पर्स. शोपींग करायला.
काका तुमच्यासाठी ही बाहुली. तुम्ही आता हिच्याबरोबर खेळत जा, माझ्याशी नको. बघा ना मी तिचे कपडे काढुनच देतेय तुम्हाला.

शब्दखुणा: 

भावभक्ती लोणी

Submitted by पुरंदरे शशांक on 28 August, 2019 - 01:16

भावभक्ती लोणी

घर शोधूनी पहाती
कृष्ण गोप सखे सारे
नाही कुणीच घरात
शिरताती चोर सारे

शिंकाळ्यात ठेवलेले
लोणी नेमके शोधले
हात पुरेना कोणाचे
उंच होते टांगलेले

कान्हा सांगतसे युक्ती
करा कोंडाळे छोटेसे
चढूनिया त्यावरी मी
लोणी काढेन जरासे

सवंगडी लगोलग
धरताती एकमेका
कान्हा खांद्यावरी त्यांच्या
चढे अलगद देखा

हात घालिता मटकी
कडी वाजली दाराची
सवंगडी कान्हयाचे
पळ काढती त्वरेची

कान्हा उभा थारोळ्यात
तक्र लोणी भुईवरी
तुकडे ते खपरेली
विखुरले दूरवरी

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 02:47

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

आनंद ओसंडून चाललाय पहा

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

सासू लाटतेय चपाती

अन भाजतेय सून मोठी

धाकटीने घातलाय कपड्याना पीळ

मधलीने बसवलीय द्वाड पोरांना खीळ

छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं

इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?

महालाला लाजवेल अशी घराची शोभा

महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा

घराला घरपण माणसांनीच येते

भुई चालेल कमी , पण लागते घट्ट नाते

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान