"ध्येयवेडे प्राक्तन"
अवघ्या प्राक्तनाला स्वीकारून मी कणखर उभा आहे
चौफेर कलंकित डौल झुगारून मी हे स्वाभिमान साकारला आहे
भूतकाळाचे ग्रहण, आणि वर्तमानाचे गोंदण घेऊन
मी भविष्याचे कोंदण कसे साकारावे?
अविश्वासाची पाळेमुळे घट्ट गिळलेल्याना
मी कोणते बरे बाळकडू पाजावे?
"छत्रछायेत वाढवलेल्या वेलिनी जरी छताचीच उंची झाकु पाहिली
आपलेच म्हणून पुन्हा पुन्हा मात्र त्यांची रक्षाच केली"
खडतर नशिबाच्या छाताडावर स्वतःला भरभक्कम उंचावलय
तरी आभाळभर उंची मात्र अजून आकाशा एवढी दूर आहे