Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2019 - 03:25
विठ्ठल नामाचं चांदणं
त्याच्या अंगणी सांडलं
विठ्ठल नामाचं चांदणं
त्याच्या ह्रदयी गोंदण
विठूनामाचं स्मरण
त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण
तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान
विश्वात्मक तुका जाण
अवकाशी संकीर्तन
विठ्ठल नामाचं चांदणं
टाकी आकाश न्हाऊन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोचि होऊनी विठ्ठल
तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान.... खुप सुंदर!
तोचि होऊनी विठ्ठल
तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान +१११
कविता आवडली..
कविता आवडली..
माझ्या छोट्याश्या डोक्यात तुमची कविता वाचताना आलेल्या काही ओळी..
विठु नसे
तो कोणी जगावेगळा
भाव असे
तो मनी आगळा
विठुनामाचा तो
छंद सोहळा
देहु-आळंदी जमे
माझिया संतांचा मेळा
अप्रतिम
अप्रतिम
खूपच सुंदर कविता.
खूपच सुंदर कविता.
>>>>>>>>>>त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण>>>>>>> वाह!