कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत
कधीकधी मी हळवा होतो
बघुनी देव दानवांत
का उगविली हि बीजे तू ?
अर्धपोटी मानवात
कधीकधी मी कठोर होतो
बघून साऱ्या वेदनांना
भळभळ त्या वाहत असतात
पण पुन्हा करतो सुरुवात
कधीकधी मी हळहळतो
कोमेजल्या कळ्या बघुनी
नव्या उमलताना बघून
त्याला करतो कुर्निसात
कधीकधी मी बिथरतो
भविष्यकाळ चिंतूनि
कल्पनांच्या माध्यमातून
पेटवतो नवी वात
कधीकधी मी शोधतो
हरवलेली जुनी वाट
मिट्ट काळोख दूरदूर
आता हीच माझी वहिवाट
हीच माझी वहिवाट ....