Submitted by सिद्धेश्वर विला... on 8 July, 2019 - 10:26
पुन्हा तेच अगम्य कोडे
प्रेम कोडगे घेऊन फिरलो
कुठे कुठे शोधले तुला सखे ?
वैतागून हळूच पिवळा झालो
तू नाही भेटली तरीही
शोधली तुला अर्धांगिनीत
भेट अधुरीच राहिली आपुली ,
शोधून पुरता अर्धा झालो
अर्थ अनर्थ घेऊनि सारे
गहिवर आला स्वप्नाचा
माळ फुलांची सुकून गेली तरीही
सुवास दरवळे प्रेमाचा
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा