ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला
१. गीताटीकेच्या प्रारंभी श्रीज्ञानदेवांनी केलेली वंदने आणि वर्णने-
ॐ या परब्रह्मवाचक शुभाक्षराने श्रीज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेच्या -भावार्थदीपिकेच्या- प्रारंभीच्या वंदनांना सुरुवात केली आहे. ॐ काराने कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करावयाचा या हेतूबरोबरच ज्याला वंदन करायचे तो आत्म्यातच सामावलेला परमेश्वर ही या मंगलाक्षरातच सामावला असल्याची जाणीवही ज्ञानदेवांनी श्रोत्यांना करून दिली आहे .
ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
आपण नित्य व्यावहारांत विज्ञान, शास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असे शब्द सहजपणे वापरतो. तर विज्ञान म्हणजे नक्की काय ? कशाला म्हणायचा वैज्ञानिक दृष्टिकोन ? हे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. प्रयत्नातील त्रुटी मनमोकळे पणाने समोर आणल्यास स्वागत आहे.
विज्ञान आणि वैज्ञानिक शाखा:
क्रमबद्ध आणि तर्कशुद्धरितीने, आपल्या आणि सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करुन, त्या ज्ञानाला (माहितीला) पडताळुन बघता येतील अशा नियम आणि सिद्धांतात बद्ध करण्याच्या प्रक्रियेला विज्ञान (Science) असे म्हणतात. Science हा शब्द मुळ लॅटिन scientia (म्हणजे ज्ञान, कौशल्य) पासुन तयार झालेला आहे. [१-२]
खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा!
आयुष्य़ातील दुःखावरील मात करण्यासाठी भगवंताने, सद्गुरुनी, संतांनी दिलेला हा महामंत्र आहे. सर्व वयातील सर्व अवस्थांतील मानवांना उपयोगी पडेल असा हा मंत्र आहे.
ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!
कुत्रा - "घरातली सगळी माणसे माझ्यावर फार फार प्रेम करतात. काका आणी काकु माझे खुप लाड करतात. बन्डु आणी चीन्गी माझ्याशी खेळतात. मला मऊ गादीवर झोपायला देतात, आवडेल ते खायला देतात. मला असे वाटते की हि माणसे म्हणजेच देव आहेत."
मान्जर - "घरातली सगळी माणसे माझ्यावर फार फार प्रेम करतात. काका आणी काकु माझे खुप लाड करतात. बन्डु आणी चीन्गी माझ्याशी खेळतात. मला मऊ गादीवर झोपायला देतात, आवडेल ते खायला देतात. मला असे वाटते की मीच देव आहे."
- माझ्या जपानी मित्राने सान्गीतलेली गोष्ट.
इंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते.
दैनिक तंटा हे एकेकाळचे अतिशय नावाजलेले अनियतकालिक आजच्या या अंकाने पुन्हा सुरू होत आहे.
![tanta1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39956/tanta1.jpg)