जिज्ञासा

विज्ञानं जनहिताय

Submitted by निवांत पाटील on 24 November, 2024 - 09:39

मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानं जनहिताय हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होत आहे. लहान मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टोकोन तयार करणे, यादृष्टीने खूप चांगले प्रयत्न केले आहेत. त्याच्या युट्युब लिंक शेअर करण्यासाठी हा धागा काढला आहे, नियमात बसेल कि नाही माहित नाही. बसत नसेल तर कश्या पद्धतीने माहिती टाकावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.

यातील भागावर चर्चा सुरु झाली किंवा मुलांनी काही शंका विचारल्या त्यावर चर्चा करायला सुद्धा हा धागा उपयोगी पडेल.

विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा!

Subscribe to RSS - जिज्ञासा