मातोश्री वारंवार हिंट द्यायला लागल्या तेव्हा म्हटलं, आता ते जुनं कपाट आवरुनच टाकावं. ( हिमालयाच्या थंड कुशीतला निद्रिस्त ज्वालामुखी जागा होवून ऊसळण्याआधी आवश्यक कारवाई केलेली बरी असा सुज्ञ विचार त्यापाठी होताच.)
तशी 'मी फार हुशार आणि गुणी मुलगी आहे' हे माझं स्वतचं असं मत आहे.आणि ही पोस्ट वाचणारे वाचक माझ्या मित्रयादीच्या कक्षेत येत असल्याने त्यांनाही हे मत पटलेलं असल्याची शक्यता अगदी दोनशे टक्के आहेच.
( )
तर ते असो !
खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा!