वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर हाच विषय घेऊन जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये एक सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येते. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. त्या सदरातला हा एक लेख. यातला मुद्दा सतत रिलेव्हंटच असतो म्हणून इथे टाकतेय.
--------------------------
महाभारताचा पुरावा? आढळले पाच हजार वर्षापूर्वींच्या महाभारत युद्धा चे अवशेष
भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजे ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.
काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
महाराष्ट्रदेशा
भाषा मराठीचा डौल
विलक्षण गहिरासा
ओवी अभंग ओठात
अंतरात भक्तिठसा
डफ पोवाड्यांनी गर्जे
इतिहास मराठ्यांचा
तलवारीसंगे साजे
दिमाख तो भगव्याचा
शब्द रांगडे कोमल
दिले माय मराठीने
भान जगण्याचे उरी
महाराष्ट्राच्या मातीने
भाषा मराठी वसते
नित्य मुखी अंतरात
नाही लाभणार माय
शोधू जाता दुनियेत
किती जन्म झाले इथे
पांग फिटेना कधीच
लेकराची ताटातूट
माय करीना मुळीच...
जय महाराष्ट्र
जय मराठी
पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे.
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.
आपल्या मातीचा रंग हा दिसत नसला तरी खोलवर माणसाच्या मनात रुतून बसलेला असतो तो तुम्हाला ठरवलं तरी पुसता येत नाही . अशीच काहीशी माझ्या शहरातली होळी आणि रंगपंचमीचे रंग इतके गडद आहेत की ते दरवर्षी अजून गहिरे होत गेले आहेत . नाशिक हे माझं महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडचं गोदावरी नदीच्या तीरावरचं भारतीय संस्कृती आणि पौराणिक माहात्य्म जपलेलं शहर. आजही इथे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथेप्रमाणे रंगपंचमीलाच फक्त रंग खेळले जातात.इतर शहरांसारखा स्वतःच्या सोयीने आटोपशीर पद्धतीने कुठलीही गोष्ट केली जात नाही.कर्मठ किंवा शास्त्रावादी म्हणून नाही, तर प्रत्येक दिवसाच्या अर्थाला अनुसरून गोष्टी केल्या जातात.
हरी किर्ती गुढी
हरीनाम सार । हरी संकीर्तन । हरी गुणगान । संत गाती ।।
हरी महिमान । संतांसी प्रमाण । हरी हे निधान । संतजना ।।
गुढी उभारोनी । हरी महात्म्याची । मिरविती साची । हरीभक्ती ।।
हरिविणे जिणे । व्यर्थ वाटे संती । नित्य रमताती । हरीनामी ।।
प्रेमे जाऊ आम्ही । संतांसी शरण । तेणे हरी जाण । संतुष्टेल ।।
प्रेम भक्तीभाव । सुख समाधान । लाभे कृपादान । अनायासे ।।
हरी किर्ती गुढी । उभारू आनंदे । तेणे विश्व कोंदे । निजानंदी ।।
आपल्या मातीचा रंग हा दिसत नसला तरी खोलवर माणसाच्या मनात रुतून बसलेला असतो तो तुम्हाला ठरवलं तरी पुसता येत नाही . अशीच काहीशी माझ्या शहरातली होळी आणि रंगपंचमीचे रंग इतके गडद आहेत की ते दरवर्षी अजून गहिरे होत गेले आहेत . नाशिक हे माझं महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडचं गोदावरी नदीच्या तीरावरचं भारतीय संस्कृती आणि पौराणिक माहात्य्म जपलेलं शहर. आजही इथे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथेप्रमाणे रंगपंचमीलाच फक्त रंग खेळले जातात.इतर शहरांसारखा स्वतःच्या सोयीने आटोपशीर पद्धतीने कुठलीही गोष्ट केली जात नाही.कर्मठ किंवा शास्त्रावादी म्हणून नाही, तर प्रत्येक दिवसाच्या अर्थाला अनुसरून गोष्टी केल्या जातात.