महाभारताचा पुरावा? आढळले पाच हजार वर्षापूर्वींच्या महाभारत युद्धा चे अवशेष
भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजे ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.
उत्तर प्रदेशातील बाघपतमधल्या सिनौली येथे पुरातत्व खात्याला कास्ययुगातील म्हणजे तब्बल 4000 वर्षांपूर्वीच्या या वस्तू सापडल्या आहेत.
गेले तीन महिने या जागी उत्खनन सुरू असून नुकतीच याबद्दलची माहिती पुरातत्व खात्यानं दिली आहे. तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून त्या काळात या भागातील समाज योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत. कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी उत्खननात आढळल्या आहेत. शव पुरलेल्या जागी तीन रथ आढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“विशेषत: रथाच्या सापडण्यामुळे प्राचीन अशा अन्य संस्कृतींशी, नागरीकरणाशी नाळ जोडली जाते. मेसापोटेमिया, ग्रीस आदी देशांमध्येही रथांचा वापर याच सुमारास मोठ्या प्रमाणावर होत होता. या प्रदेशांमध्ये योद्धा समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता असे मानण्यास जागा आहे,” पुरातत्व खात्याच्या उत्खनन विभागाचे सहसंचालक एस चे मंजूल यांनी सांगितले.
सदर उत्खनन हे अत्यंत उत्साहवर्धक असून शवपेटिंकावर तांब्याची पिंपळाचं पान असलेली कलाकुसर आहे, जे राजघराण्यातील दफन दर्शवतं असं मंजूल म्हणाले. पानाफुलांची नक्षी असलेली या प्रकारची शवपेटिका भारतीय उपखंडात प्रथमच मिळाली आहे. हडप्पा, मोहेंजोदरो, ढोलाविरा इथेही शवपेटिका आढळल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कलाकुसर नव्हती, असे निरीक्षण मंजूल सांगतात.
या पुराव्यांमुळे भारतीय समाज चार हजार वर्षांपूर्वी किती प्रगत होता हे दिसत असल्याचं मंजूल म्हणाले. ज्यावेळी मेसापोटेमियामध्ये रथ, तलवारी, ढाली व शिरस्त्राण होती, त्याच सुमारास भारतातही या सगळ्या गोष्टी होत्या हे आता निश्चितपणे सांगता येईल. याखेरीज, मातीची व तांब्याची भांडी, कंगवे, तांब्याचे आरसे आदी गोष्टी आढळल्या असून या तत्कालिन समाजाचं राहणीमान दर्शवतात. या भागातल्या गोष्टी व हडप्पा येथे आढळलेल्या गोष्टींमध्ये साम्य नसल्याचे सांगताना दोन्ही संस्कृती व वंश वेगळे असल्याचे मत मंजूल यांनी व्यक्त केले आहे.
स्रोत : संन्यस्त खड्ग
लेट्सप अपडेट
https://goo.gl/knPvAQ
कुठली तरी बातमीची/ पुरातत्त्व
कुठली तरी बातमीची/ पुरातत्त्व खात्याची लिंक प्लीज.
कुठल्या नव्या माहित नसलेल्या लेटसअॅप वर नको.
महाभारतात १८ दिवसाचे युद्ध झाल्यावर धर्म, अर्जुन कृष्णाने भलीमोठी चिता रचून सर्व योद्ध्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार केले असं वाचलेलं आहे. शवपेटिका म्हणजे भारतात ख्रिश्चन रहात होते? का पुर्वी हिंदू दफन करीत?
हा महाभारताचा पुरावा आहे हे अनुमान काढण्यासाठी काय तर्क वापरले हे ही जाणून घ्यायला आवडेल.
अमित, सध्या या बातमीला इकडे
अमित, सध्या या बातमीला इकडे मोठे कव्हरेज आहे,
वर लिहिलेली बातमी पण बहुदा लोकसत्तेतील आहे.
बातमीचा युफोरिया थोडा कमी झाला की जास्तीची सेन माहिती बाहेर येईल.त्यानंतर यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ आहे असे मला वाटते.
स्वामीजी,
>>>>>स्रोत : संन्यस्त खड्ग>>> हे काय कळले नाही.
https://www.news18.com/news
https://www.news18.com/news/india/in-a-first-chariot-from-pre-iron-age-f...
http://www.dnaindia.com/india/report-chariots-in-eight-burial-spots-hark...
>>>स्रोत : संन्यस्त खड्ग>>> हे काय कळले नाही.>>>: संन्यस्त खड्ग या आयडी ने लिखाण क्ऱणार्या मित्राने ही बातमी मला पाठवली होती .
धन्यवाद या माहितीबद्दल.
धन्यवाद या माहितीबद्दल.
गुगळुन बघा, बहुतेक सगळ्या msm
गुगळुन बघा, बहुतेक सगळ्या msm मध्ये बातमी आहे.