मी कॉलेजमध्ये असताना मावशीचं घरंही जवळच होतं. महिना-पंधरा दिवसांतून मावशीकडे जायचे. एकतर एरवी मेसमधलं जेवण असायचं आणि मावशीचं जेवण असंही खासच. त्यामुळे तिथे गेलं की मेजवानीच व्हायची. खरं सांगायचं तर अनेकवेळा असंही व्हायचं की मी दुपार मावशीकडे पोचले आहे. तोवर त्यांचं सर्व जेवण उरकून, भांडी आवरून झालीत आणि आता वामकुक्षीची वेळ झालीय. मी पोचले की मावशी दुपारच्या जेवणातलं छोट्या छोट्या वाट्यात काढून ठेवलेलं वाढून द्यायची. नेहमी वाटायचं, इतकंसं कसं पुरेल मला, पोट भरेल का? पण असं कधीच झालं नाही की मी गेलेय आणि अर्धवट पोट भरलंय. उलट चार घास जास्तच जायचे.
दोन महिन्यांपासून चाललेलं आजारपण, त्यातून ठरलेली सर्जरी, ती झाल्यावर औषधांच्या अंमलात असलेली गुंगी, मधूनच येणारं डिप्रेशन आणि इतक्या सर्वातून जाऊनही 'पुढे सर्व ठीक होईल की नाही' हा मोठा प्रश्न!!सर्जरीच्या आधी धुतलेले केस आणि त्यानंतर एकदोन वेळा जमेल तसं अंगावर घेतलेलं पाणी. औषधं, आजारपण यातून उतरलेला चेहरा. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर गळत असलेले केस, ओढून आलेला चेहरा,सगळं कसं नको वाटू लागलं. अजून किती दिवस, महिने, वर्षं हे असं चालणार या विचारांनी अजूनच वाईट वाटू लागलं. नवीन दिवस उजाडला, थोडं खाऊन घेतलं, औषध घेतलं तरी मन काही 'उंच भरारी' घेण्याच्या मूड मध्ये नव्हतंच.
पंधरा दिवसांपूर्वी एक मैत्रीण भारतात चालली होती,म्हणाली काही हवं असेल तर सांग आणते. खरंतर पूर्वी अशी खूप मोठी यादी असे आणायची, पण हळूहळू ती यादी छोटी होत गेली. आता फक्त गरजेची वस्तू असेल तरच आणायला सांगते कुणाला. आधी म्हणाले, नाहीये काही विशेष. दुसऱ्या दिवशी आठवण झाली, म्हटलं, "अगं, कॅलेंडर घेऊन येशील का? तेही कालनिर्णय, मराठीच हां!". ती जाणार होती बँगलोरला, त्यामुळे उगाच हिंदी वगैरे काही नको होतं. नव्या वर्षाच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ती घेऊन आली होती.
१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर.
सण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. भारतीय शेतकऱ्याची शेतीशी नाळ जोडलेली आहे. शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गाशी आपले नाते दृढ करत असतो. या सणाला रब्बीची पार्श्वभूमी आहे. या दिवसात रब्बीचा हंगाम जोरात असतो. मराठवाडाच्या भूमीत अनेक सण, परंपरा, चाली रीती साजऱ्या केल्या जातात. सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी त्यात कुटुंबा सोबत साजरा करण्याची वेगळीच मज्जा आहे.
मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.
नुकतीच चार लग्ने पाहिली. चारही लग्नांमध्ये जुन्या काळापासून चालत आलेल्या बहुतेक रुढी (वरमातेचे पाय धुणे वगैरे) एखाद्या उत्सवाप्रमाणे पाळल्या गेल्या. उत्सवाप्रमाणे म्हणजे असे की ज्या गोष्टीवरून पूर्वी रुसवे फुगवे होत असत (पायच धुतले नाहीत ह्यावरून मुलाकडच्यांनी रुसणे किंवा माझ्या आईला पाय धुवायला लावले ह्यावरून मुलीने रुसणे वगैरे) ती गोष्ट आता एक मजेशीर प्रथा म्हणून मोठ्या उत्साहाने पाळली जाते की काय असे वाटावे इतक्या थाटात साजरी करण्यात आली.
ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.
हा बाहेर दोन गोजिर्या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.
'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.
आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."
तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.
क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "
“शांत राहा, बोलू नकोस”.