नाशिक
सस्नेह निमंत्रण - मुशाफिरी - उदघाटनाचा मुशायरा
=========================================================================
मुशाफिरी ह्या संकल्पनेचा उदय, त्यामागची प्रेरणा आणि मार्गक्रमणाची दिशा ह्याचा अंदाज येण्यासाठी हे जरूर वाचावेत मुशाफिरी-प्रवास गझलेच्या अंतरंगाकडे
सप्रेम नमस्कार,
मूल चालण्यासाठी पहिले पाऊल टाकते तेव्हा आईला किती आनंद होत असावा?
पहिल्यांदाच प्रवासाला निघताना पहिले पाऊल टाकताना होणारा आनंद तितकाच अवर्णनीय असतो ह्याचा प्रत्यय आज मला हा लेख लिहीताना येतो आहे.
'इगतपुरी' ट्रीप साठी माहिती हवी आहे
आम्ही मित्र मिळून 'इगतपुरी' ची एक दिवसाची ट्रीप करायची योजना बनवतोय. आम्ही पुण्याहून संध्याकाळी 'सिन्नर'ला बसने निघणार. रात्री सिन्नरला मुक्काम करणार. दुसर्या दिवशी सकाळी तिकडे एका मित्राला घेऊन इगतपुरीला फिरून त्याच दिवशी पुण्याला परत बसने (रात्री) येणार असा प्लॅन आहे.
तर इगतपुरीत एका दिवसात पाहण्यासारखी ठिकाणांबद्दल माहिती हवी आहे.
तसेच सिन्नर मध्ये कुणी कॅब भाड्याने देणारी कंपनी असेल तर त्याचीही माहिती हवी आहे. कारण पुण्याहून कॅब घेऊन ट्रीप करणे परवडणार नाही.
धन्यवाद.
कालचे खग्रास चंद्रग्रहण ........ आज गुगल वर लाईव्ह....! :)
मंडळी ..... आमचा परम ज्ञानवंत मित्र गुगल्या हा आजकाल भलताच कल्पक झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे ........ काही दिवसांपुर्वी त्याने ग्रेट गिटारिस्ट लेस पॉल याच्या जयंती निमित्त आम्हास ऑनलाईन गिटार वाजवायची संधी उपलब्ध करून दिली ...... ज्याचा करोडो लोकांनी लाभ घेऊन नवीन संगीतरचनांना जन्म दिला.......तसा तो जात्याच हुशार असल्या कारणाने त्याने त्या " अव्दितीय " रचना साठवून ठेवण्याची सोय दिली होती.......पुढच्या ग्रॅमी अवार्ड साठी आम्ही नक्कीच अर्ज करण्याचा विचार करतोय........ असो..... !
सांधण दरी ! येणार का ?
मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..
गुरूवर्य पं. अण्णा थत्ते यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त पं. उल्हास कशाळकरांची संगीत मैफल
दि. १९ मार्च २०११ हा माझे गुरू संगीतज्ञ पं. अण्णासाहेब थत्ते ह्यांचा प्रथम स्मृतीदिन!!
ह्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मे २०११ शास्त्रीय संगीताची मैफल अण्णांच्या शिष्यपरीवारातर्फे आयोजित करण्यात आली आहे. त्याचा सविस्तर तपशील,
कलाकार : पं. उल्हास कशाळकर
तबला साथ : योगेश सम्सी
संवादिनी: पं. डॉ. अरविंद थत्ते
कार्यक्रमासाठी कोणतीही स्पॉन्सरशीप न घेण्याचा निर्णय घेतला असून अण्णांच्या शिष्यपरीवाराने सर्व आर्थिक भार उचलला आहे.
बह्यनी उप्पाद मारु !!
'कुलंग' ला येणार का ??
कुलंग ट्रेक :
ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..
पार वरण्या गप्पा!!!
रामराम हो मंडळी !!!
अहिराणी जित्ति ठेवाले, अहिराणीना प्रसार कराले आणि अहिराणी बोलणारा लोकेस्ले एकत्र लवाना प्रयत्न हे हाऊ.
आपला अहिरानी पट्टा ना लोकेसनी आठे इन कोणता बी विषय वर गप्पा करा.
जसे तुमना भागनी माहिती आणि काय चालु विषेश घटना या वर बोला.
माबोवर अहिराणीवर प्रेम करणारास्नी संख्या वाढी र्हायनी याना माले अभिमान वाटस.
नाशिक
Pages
