मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..
तेव्हा यंदाच्या सिजनमध्ये पहिलाच साधा छोटा ट्रेक करावा म्हणून आम्ही काही भटके मायबोलीकर सांधण दरीला (श्रेणी - सोप्पी) जाण्याचा बेत आखत आहोत..
सांधण दरी हा एक नैसर्गिक आश्चर्याचाच भाग.. उंचच्या उंच सह्याद्री रांगानी वेढलेली अशी ही दरी नाशिकजवळील साम्रद गावाजवळ वसलेली आहे.. अर्थात दरी म्हटली की खोल असणारच.. पण आकर्षण असे की अत्यंत अरुंद मार्ग आहे तिकडून जाण्याचा.. दोन्ही बाजूस उंचच्या उंच कातळ नि त्यातून जाणारी ही अरुंद वाट.. . जमिनीला पडलेली भेग म्हटले तर उत्तम.. दुसरे म्हणजे इथे वाटेत लागणारे पाण्याचा साठा.. पावसात इथे जाणे अशक्य.. थंडीतदेखील कमरेपर्यंत पाणी असते.. तेव्हा आता जाउन यावे म्हणतोय... तेव्हा येणार का ?
शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत... उर्वरीत माहिती (कसे जायचे, कुठे भेटायचे, किती वाजता निघायचे इति..) नंतर कळवण्यात येईल..
येत असाल तर पटापट हात वर करा (संख्या १० नाहीतर १५ पर्यंत मर्यादीत)
आमचे नियम :
१. आमच्या ग्रुपचा लिडर आमचा ग्रुपच असतो.. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते असतात.. 'पाहीजे तसेच झाले पाहीजे' अशा एकाच गोष्टीवर जास्त अडून बसत नाही..
२.प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने यावे.. पण संपूर्ण ट्रेकमध्ये 'एकमेकां साह्य करू नि पुढे जाऊ' हेच तत्व वापरतो.. मग 'कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे..
३. प्रत्येकाने पाठीवर स्वतःच्या सॅकचे ओझे वाहण्याव्यतिरीक्त ट्रेकमध्ये लागणार्या 'ह्या ना त्या' कामात मदत करणे आवश्यक..
४. ट्रेकमध्ये मद्यपान करण्यास वा मद्यपान करून ट्रेकमध्ये येण्यास मनाई.. धुम्रपान ट्रेकच्या आधी वा ट्रेक समाप्त झाल्यावर..
५. सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार !
६. ग्रुपमध्ये चालताबोलता 'हा ग्रुपमध्ये नविन आहे वा जुना आहे' अशा ओळखीची तमा बाळगत नाही..
७. नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम !
८. ट्रेकसाठी अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान/वस्तू आणायचा प्रयत्न करावा.. यादीव्यतिरीक्त अतिरिक्त सामान घेउन येत असाल तर सोबत गडी घेउन यावा
९. ग्रुपसाठी आणलेले सामान वगैरे प्रत्येकाच्या पाठीवर थोडाफार अतिरीक्त भार टाकून आनंदाने विभागण्यात येइल..
१०. ट्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी..
११. ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये
१२. फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक
१३. घरापासून ते भेटण्याच्या ठिकाणापर्यंतचा खर्च सोडला तर ट्रेकमध्ये बाकी होणारा सर्व खर्च (अगदी स्वतःहून आणलेल्या चॉकलेटचा पण) सर्वांमध्ये विभागला जाईल. कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही
१३. वरिल नियमांस पात्र असल्यास येण्याची तसदी घ्यावी अन्यथा नाही.. बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..
मी येणार .... तब्बल ६ महिने
मी येणार .... तब्बल ६ महिने झाले ट्रेक करुन , बास , आता पुन्हा सुरु ... वेळेचा लोचा आहे, पण या शनिवारी नक्की जमेल..
नाही येणार...
नाही येणार...
तारीख/वेळ: 5 June, 2011 -
तारीख/वेळ:
5 June, 2011 - 05:30 - 6 June, 2011 - 04:00
>>>> एका दिवसात होईल ?
मला वाटत होतं की शनिवारी रात्रीच निघायच
अरे शनिवारी मी नऊपर्यंत
अरे शनिवारी मी नऊपर्यंत हाफिसात..
आणि फोटोची लिन्कही इथेही दे
आणि फोटोची लिन्कही इथेही दे की मित्रा !!
@ पंत शनिवारी रात्रीच निघू १०
@ पंत शनिवारी रात्रीच निघू १० नंतर..
@ रोमा .. तुझ कुठे आहे हापिस .. आम्ही पिक अप करु तुला.. थांबु तु येइपर्यंत त्यात काय ?
punekarani kasa yaycha?
punekarani kasa yaycha?
विन्या माझ हाफिस बी.के.सी.
विन्या माझ हाफिस बी.के.सी. ला..
पंत .... येथे बघा डोंगरवेडा यांचा लेख सांदण दरी-एक निसर्गनवल
http://www.shrikantescapades.
http://www.shrikantescapades.com/2011/05/sandhan-valley-to-karoli-ghat-t...
जबरी जागा आहे !! लॉर्ड ऑफ द रिन्ग्स - ३ - रीटर्न ऑफ द किन्ग मधील एका सीनची आठवण झाली !!!
रो मा ... आपण बहुधा २ गाड्या
रो मा ... आपण बहुधा २ गाड्या घेउन जाउ , कारण आपण साधारण दहा जण होणार .. इन्द्रा निघताना तुला पिक अप करेल..
मज्जा करा लेकांनो... मी जाईन
मज्जा करा लेकांनो... मी जाईन नंतर कधीतरी... तुम्ही कट केलेला आहे मला न नेण्याचा....
मी नाव नोंदवलय....
मी नाव नोंदवलय....:-)
मला नाय जमणार
मला नाय जमणार
तुम्ही कट केलेला आहे मला न
तुम्ही कट केलेला आहे मला न नेण्याचा...>> जल्ला समुद्रापलिकडे तूच जाउन बसतोस त्याला आम्ही काय करणार... तू ये मग करूच एखादा ट्रेक.. लिस्ट न संपणारी आहे..
रोहीत.. हापिसात उशीर होईल वगैरे असली नाटके नकोत.. त्यापेक्षा उद्या-परवापासून तब्येत बरी नसल्याचे सोंग घे...
चँप.. कारण विचारत बसणार नाही.. सी यु नेक्स्ट टाईम.
यो छान योजना. या दरीत पावसात
यो छान योजना. या दरीत पावसात पाणी साठेल ना रे ? एवढ्यात पावसाला सुरवात झाली तर. काळजी घ्या. भरपूर फोटो काढा. तिथे जमल्यास खाली आडवे पडून, कडेच्या भिंतीचा आणि त्यातून दिसणार्या आकाशाच अवश्य फोटो काढ. असे फोटो नव्हते इथे.
अटी / नियम प्रचंड आवडले...
अटी / नियम प्रचंड आवडले...
ब्येष्ट!! ट्रेकला सुरूवात झाली म्हणायची!!
पण काय रे? हा काही दमवणारा ट्रेक नाहीये राईट? it should be a "rocks"-walk!!
धुम्रपान ट्रेकच्या आधी वा
धुम्रपान ट्रेकच्या आधी वा ट्रेक समाप्त झाल्यावर..
कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे..
कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही..
नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम >>>>>:हहगलो:
बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..>>>>>अजुन आहेत???????
यो जबरी नियमवली.... अजुन एक
यो जबरी नियमवली....
अजुन एक नियम -
ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये..:-)
पण काय रे? हा काही दमवणारा
पण काय रे? हा काही दमवणारा ट्रेक नाहीये राईट मग चला ना गुरुदेव.
मी नांव नोंदवले. तुम्ही नाही तर मी डोके कुणाचे खाणार
ट्रेक मध्ये चालताना मागे
ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये>>>>>:हहगलो:
गिरी,
गिरी,
आयला यो.. हम करे सो कायदा ..
आयला यो.. हम करे सो कायदा .. तरी बर तु सगळे कायदे नाही लिहिलेस...
याला जंगल कायदा म्हणाव का ???
कोण म्हणताय हा दमवणारा ट्रेक
कोण म्हणताय हा दमवणारा ट्रेक नाहीये??? जाताना उतरण असली तरी परत येताना तेवढाच भाग चढ आहे.... अर्थात ह्यांना नेहमीची ट्रेकिंगची सवय आहे त्यांना फार काही वाटणार नाही पण जे नव्याने जात आहेत त्यांनी मनाची तयारी ठेवावी.. कारण नुसते डांबरी रस्त्यावरून ओबड-धोबड वाटेवर पाय टाकला की दमायला सुरवात होतो...
गिरी
गिरी
मी नावनोंदणी केलीय खरी, पण
मी नावनोंदणी केलीय खरी, पण नस्ती खटखट सोबत न्यायला तुम्हा लोकांना परवडेल का?????
ट्रेक मध्ये चालताना मागे
ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे..
दमल्याने मागे राहिले की वाघाने उचलल्यामुळे मागे राहिले हे येओयेओ केल्याशिवाय कसे कळणार????
ते वाघ बघून घेईल... नस्ती
ते वाघ बघून घेईल... नस्ती चिंता नको
मी चाललोय शनीवारीच... पाऊस
मी चाललोय शनीवारीच... पाऊस पडणार नाही असे वाटते.. नाहीतर भैरव नाहीतर रतन करावा लागेल..
दमल्याने मागे राहिले की
दमल्याने मागे राहिले की वाघाने उचलल्यामुळे मागे राहिले >>> आणि हो, वाघ नेहमी सॉफ्ट टारगेटच उचलतो ...परत तुम्ही म्हणाल ही सरळ सरळ स्त्रीपुरुष असमानता आहे ....वाघ मेल शॉव्हेनिस्ट आहे
मला पण यायचे आहे. मी पण
मला पण यायचे आहे. मी पण येनार.
Pages