मनोरंजन

धक्का !

Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 21:15

सकाळी बरोबर ११च्या ठोक्याला आम्ही दरवाज्यात पोहोचलो. ती आमची वाटच बघत होती. दार उघडून तिने आम्हाला आत घेतले. खूप मोठी खोली, खोली कसली मोठा हॉलच म्हणा ना आणि त्यात आम्ही तिघंच!

तिने अदबीने आम्हाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.

भरयला एक फॉर्म दिला.

आम्ही फॉर्म भरून दिला.

तिने आधीच सांगून ठेवलेली कागदपत्रे तिला दाखवली.

दोन मिनिटात तिने त्यांच्या कॉपीज केल्या. परत एक दोन सह्या करायला सांगितल्या.

गोड हसून म्हणाली, “ तुमचं काम झालं. एक दोन दिवसात घरी पत्र येईल. ”

वाचनवेळा

Submitted by संप्रति१ on 8 June, 2023 - 14:23

सकाळी अर्धा-एक तास हाताशी सापडतो. कामावर जातानाच्या रस्त्याकडेला एखादा बेंच/कठडा असतो.‌ समोर तुरळक ट्रॅफिक असते. हळहळत जॉगिंग करणारे, आपण टुणटुणीत असल्याचा भास उत्पन्न करणारे काका-लोक असतात. स्वतःस मेंटेन करण्याची प्रतिज्ञा केलेल्या मुली असतात. त्यांचा हेडफोन्समधून कुणाशीतरी चिवचिवाट चाललेला असतो.‌ असेल बॉयफ्रेंड वगैरे. मला त्यातलं काही कळत नाही. आणि मी त्यात लक्षही घालत नाही, कारण अप्सरा वगैरे तशा फारशा कुणी नसतात. जॉगिंग वगैरेतला फोलपणा कळल्यामुळे त्या घरीच मस्त झोपा काढत असतील. एक आपला अंदाज.

शब्दखुणा: 

फिरून नवी जन्मेन मी

Submitted by आस्वाद on 8 June, 2023 - 11:51

कधीकधी आयुष्यात काही घटना घडतात ज्याने आयुष्यच बदलून जातं. लहानपणापासून आई वडिलांचे, शाळेचे, शेजारच्या परिस्थितीचे संस्कार आपल्यावर घडत असतात. जशी आजूबाजूची परिस्थिती असते, तसेच आपण घडतो. जे लोक लहानपणापासून मम घरात वाढतात, ते साधारण तसेच बनतात. लहानपणापासून जे पाहत आलो, तेच 'नॉर्मल' वाटत. पुढे मोठं झाल्यावर त्यातल्या त्रुटी दिसायला लागतात, मग माणूस हळूहळू बदलतो. पण हा बदल फार सटल असतो. यालाच आपली प्रगती पण म्हणू शकतो. पण काही काही लोकांच्या बाबतीत बदल अचानक होतो. इतका की हा तोच माणूस आहे ना, असा प्रश्न पडतो.

उडणारा हत्ती

Submitted by रघू आचार्य on 7 June, 2023 - 11:32

समाज माध्यमात आयुष्याचा मोलाचा काळ व्यतीत केल्यावर तो वाया गेला नाही. काही न काही शिकवण मिळाली.

जर कुणी कुणाचाही अंधभक्त असेल तर त्याच्याशी वाद घालू नये. ही शिकवण तर इथल्या लोकांना बालपणापासूनच आहे. माझ्यासारख्या मंद व्यक्तीस ती अलिकडेच प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता वादात कुणी म्हणाले कि बोवा हत्ती उडतो.
तर त्यास ओलांडे प्रश्न ( Cross questioning) करू नये.

शब्दखुणा: 

चित्रकोडे ओळखा

Submitted by ढंपस टंपू on 31 May, 2023 - 00:24

चित्रातून कोडे घाला आणि ओळखा या खेळासाठी हा धागा.

अ) कोड्याला क्रमांक टाका.
ब) पहिले कोडे सुटले कि दुसरे कोडे पुढचा क्रमांक घालून द्या.
क) कोडे माफक वेळेत न सुटल्यास उत्तराची मागणी झाल्यास कोडे घालणाऱ्याने उत्तर दिले पाहिजे.
ड) कुणालाच उत्तर आले नाही आणि कोडे घालणारा/री हजर नसल्यास पुढचे कोडे घालावे.
इ) फोटो, द्ृष्टीभ्रम, दुर्बोध चित्र, दुर्मिळ फोटोतली जागा, वस्तू, व्यक्ती, प्रसंग, प्रथा ओळखणे असे सर्व प्रकार चालतील.

शब्दखुणा: 

... हजारों मे अकेली!

Submitted by छन्दिफन्दि on 18 May, 2023 - 21:48

आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. थोडी हटके.
आमची Fresher's Party होती. Party Games मधे एक लाल रंगाचा रुमाल मागितला.
"लाल रंगाचा रुमाल ? कोण वापरतं ??" आम्ही विचार करतोय तोपर्यंत तिने तो काढूनही दिला आणि बक्षिसपण मिळवले.
नंतर ती कोणाशी तरी बोलताना ऐकलं " अरे , वो party games मे ना ऐसा ही कुछ पुछते है इसलिये मै लाल रुमाल राखति हू |" झालात ना आश्चर्यचकीत . येवढं party च्या जामानिम्यात इतकं सगळं कोण लक्षात ठेवतो ? आणि ते सुद्धा लाल रुमाल?? माझं पण तसच झाल.

“ही चोळी कोणाची?” : सुखद दृश्यानुभव

Submitted by कुमार१ on 10 May, 2023 - 00:57

चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ?
घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ?
तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय?
आणि
शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय?
वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट:
The Bra.

The bra mov.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

होस्टेल डायरी

Submitted by संप्रति१ on 30 April, 2023 - 06:50

सगळीकडून मार खाल्ल्यावर शेवटचा रस्ता म्हणून काही जण लिखाणाकडं वळतात. जयंत समजा त्यांपैकीच एक.
तुम्ही म्हणाल जयंत? कोण जयंत? आणि कुणापैकी आहे हा ? आमच्यापैकी की त्यांच्यापैकी?? नीट सांगा जरा..! बसा..! पाणी वगैरे घेणार का ? नको ना? ठीकाय. बसा जरा... सगळं व्यवस्थित सांगा..!

तर नाही. तो कुणी नाही.
समाजाच्या काठाकाठानं फिरणारा माणूस. कुटुंब नाही. मित्र नाही.‌ गर्लफ्रेंड नाही. इंटेन्स रिलेशनशिप्स नाहीत. नोकरीबद्दल लिहिण्याचा अश्लीलपणा त्याला पटत नाही. मग उरतं काय? एकट्या मनुष्याची कादंबरी ? त्यात कुणाला इंटरेस्ट असणार?? पण आता ती लिहिलीय त्यानं.

शब्दखुणा: 

चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 

लाल गुलाब, तो आणि ती! - एक तरल प्रेमकथा

Submitted by छन्दिफन्दि on 20 April, 2023 - 02:22

हातात टपोऱ्या लाल गुलाबांचा डेरेदार गुच्छ घेऊन ती हलकेच लिफ्ट मधून बाहेर आली.

हळुवार पावलांनी रूम मध्ये शिरली. आवाज न करता टेबलावरचा फ्लॉवर पॉट अलगद उचलला, त्यात तो गुच्छ ठेवताना डोळे शांत निपचित पडलेल्या नचिकडेच होते. गेले काही दिवस हाच दिनक्रम सुरु आहे. त्याने डोळे उघडले कि त्याला त्याच्या आवडीची, टवटवीत फुलं दिसावीत, म्हणून सगळ्या धबडग्यात तिने केलेला हा अट्टहासच म्हणा ना.

“आज बहुतेक व्हॅलेंटाईन दिवस असावा म्हणून आज लाल गुलाब घ्यायला कोण गर्दी.. “, ती पुटपुटली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन