मनोरंजन

... हजारों मे अकेली!

Submitted by छन्दिफन्दि on 18 May, 2023 - 21:48

आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. थोडी हटके.
आमची Fresher's Party होती. Party Games मधे एक लाल रंगाचा रुमाल मागितला.
"लाल रंगाचा रुमाल ? कोण वापरतं ??" आम्ही विचार करतोय तोपर्यंत तिने तो काढूनही दिला आणि बक्षिसपण मिळवले.
नंतर ती कोणाशी तरी बोलताना ऐकलं " अरे , वो party games मे ना ऐसा ही कुछ पुछते है इसलिये मै लाल रुमाल राखति हू |" झालात ना आश्चर्यचकीत . येवढं party च्या जामानिम्यात इतकं सगळं कोण लक्षात ठेवतो ? आणि ते सुद्धा लाल रुमाल?? माझं पण तसच झाल.

“ही चोळी कोणाची?” : सुखद दृश्यानुभव

Submitted by कुमार१ on 10 May, 2023 - 00:57

चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ?
घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ?
तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय?
आणि
शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय?
वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट:
The Bra.

The bra mov.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

होस्टेल डायरी

Submitted by संप्रति१ on 30 April, 2023 - 06:50

सगळीकडून मार खाल्ल्यावर शेवटचा रस्ता म्हणून काही जण लिखाणाकडं वळतात. जयंत समजा त्यांपैकीच एक.
तुम्ही म्हणाल जयंत? कोण जयंत? आणि कुणापैकी आहे हा ? आमच्यापैकी की त्यांच्यापैकी?? नीट सांगा जरा..! बसा..! पाणी वगैरे घेणार का ? नको ना? ठीकाय. बसा जरा... सगळं व्यवस्थित सांगा..!

तर नाही. तो कुणी नाही.
समाजाच्या काठाकाठानं फिरणारा माणूस. कुटुंब नाही. मित्र नाही.‌ गर्लफ्रेंड नाही. इंटेन्स रिलेशनशिप्स नाहीत. नोकरीबद्दल लिहिण्याचा अश्लीलपणा त्याला पटत नाही. मग उरतं काय? एकट्या मनुष्याची कादंबरी ? त्यात कुणाला इंटरेस्ट असणार?? पण आता ती लिहिलीय त्यानं.

शब्दखुणा: 

चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 

लाल गुलाब, तो आणि ती! - एक तरल प्रेमकथा

Submitted by छन्दिफन्दि on 20 April, 2023 - 02:22

हातात टपोऱ्या लाल गुलाबांचा डेरेदार गुच्छ घेऊन ती हलकेच लिफ्ट मधून बाहेर आली.

हळुवार पावलांनी रूम मध्ये शिरली. आवाज न करता टेबलावरचा फ्लॉवर पॉट अलगद उचलला, त्यात तो गुच्छ ठेवताना डोळे शांत निपचित पडलेल्या नचिकडेच होते. गेले काही दिवस हाच दिनक्रम सुरु आहे. त्याने डोळे उघडले कि त्याला त्याच्या आवडीची, टवटवीत फुलं दिसावीत, म्हणून सगळ्या धबडग्यात तिने केलेला हा अट्टहासच म्हणा ना.

“आज बहुतेक व्हॅलेंटाईन दिवस असावा म्हणून आज लाल गुलाब घ्यायला कोण गर्दी.. “, ती पुटपुटली.

विषय: 

उमलून आले पुन्हा... प्रेम हे

Submitted by प्रथमेश काटे on 16 April, 2023 - 08:33

उमलून आले पुन्हा..
प्रेम हे !

" वंदना अगं झाला की नाही डबा ? "

हॉलमधून, ऑफिसला निघण्याच्या घाईत असलेल्या अनिलने मोठ्याने विचारलं. अर्थात पत्नी पर्यंत आवाज पोहोचावा म्हणून ; पण आता त्याच्या आवाजात किंचित रागही जाणवत होता.

शब्दखुणा: 

कर्ज

Submitted by संप्रति१ on 13 April, 2023 - 13:31

"कर्ज"
२००८ साली हा रिमेक आला होता. ह्यातली हिमेशची दोन गाणी मला आवडतात. हा एक कबूलीजबाब मी आधीच देतो.

बाकी, ॲक्टींगच्या बाबतीत हिमेशचा प्रॉब्लेम आहे. डीनोकडूनही काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आणि श्वेता कुमार(टीना) तर ॲक्टिंगचा साधा प्रयत्नही करत नाही.‌ आपल्याला हे जमणार नाही, हे तिला कळलंय.
हा 'कळण्याचा क्षण' तिच्या आयुष्यात शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अवतरलाय. त्यामुळे आधीच सगळी शस्त्रं टाकलीयत तिनं. तर मग ॲक्टिंगचं सगळं कर्ज मुख्यतः उर्मिला आणि डॅनीला फेडत बसावं लागतं..!

शब्दखुणा: 

गुंत्यात अडकलेली मायबोली !

Submitted by कुमार१ on 2 April, 2023 - 22:04

बऱ्याच दिवसांनी घेऊन आलो आहे खास आपल्यासाठी आपलाच खेळ ! या खेळात तुम्हाला ८ मायबोलीकरांची सदस्यनावे ओळखायचीत. त्यासाठी खालील दोन चौकटी पहा :

चौकट १
Screensho puzz 1.jpg
.....

चौकट २

Screenshot puzz 2.jpg

या दोन चौकटींमध्ये मिळून एकूण आठ नावे अडकलेली आहेत. ती हुडकून काढायची.

विषय: 
शब्दखुणा: 

माझी अमेरिका डायरी - ८ - नव्याची नवलाई !

Submitted by छन्दिफन्दि on 31 March, 2023 - 23:53

आमच्या नवीन घरात / अपार्टमेंटमध्ये सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघर. ठाणा-मुंबईला सुद्धा कधी प्रशस्त स्वयंपाकघर नसतात, पण हे अगदीच काडेपेटीसारखं होत. ओटा म्हणून जो प्लॅटफॉर्म होता तो लाकडाचा, वरती सन्मयका लावलेला. म्हणजे पाणी टाकून धुवायही प्रश्नच नाही. तस तर म्हणा इकडे सगळंच ड्राय क्लीनिंग असतं Bw . ओट्याला मध्यभागी मोठा छेद दिलेला आणि त्यात कूकिंग रेंज बसवलेला. अनायसे ओव्हन पण मिळाला, त्यामुळे विविध ब्रेड, केक कुकीज करायला मिळणार म्हणून मी खुश झाले.

शब्दखुणा: 

जुनी गोष्ट

Submitted by संप्रति१ on 28 March, 2023 - 14:45

"तुझ्यासोबत प्रेमाच्या ह्या काटेरी रस्त्याने अनवाणी पावलांनी चालण्याची माझी तयारी आहे. मग मी रक्तबंबाळ झाले तरी पर्वा नाही..!"
अशा आवेशात नायिका व्यक्त होतेय.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन