भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेमुळे पाकिस्तानात नैराश्याचे वातावरण आहे. पाकिस्तान सरकारला जनता दूषणे देताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून काही बुद्धीमान पाकिस्तान्यांनी स्वतःचे चांद्रयान बनवून त्याचे प्रक्षेपण केले. हे भारताला सडेतोड उत्तर असल्याचे म्हटले जात आहे.
व्हिडीओत पाकिस्तानचे यान दिसत आहे.
https://www.youtube.com/watch?v=LOiSVTpU5vk
दोघे एका मोठ्या पिंपळाच्या झाडापाशी पोचले. विसाजी सीमाला म्हणाला -
" तू जरावेळ या झाडाखाली बस. मी दोन मिनिटात आलो." असं म्हणून त्याने तिला झाडाला टेकुन बसवल, आणि तो जाण्यासाठी वळणार तोच सीमाने विचारलं -
" आता कुठं जाता ? "
विसाजीने करंगळीच बोट दाखवलं. सीमाने खुदकन हसत मान डोलावली. विसाजी समोरच्या, रस्त्यापलीकडच्या झाडीत गेला. आता त्या मिट्ट काळोखात तिथे सीमा एकटीच होती. पुन्हा भीती तिच्या मनाला घेरू लागली. ती डोळे मिटून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्यात समोरच्या झाडीत जराशी खुडबुड झाली. सीमाचा श्र्वास घशातच अडकला.
•••••••
आज कितीतरी दिवसांनी ती ही अशी घराबाहेर पडली होती.
ना ती, पाण्याची बाटली आणि खाऊचा एखादा डबा, चार्जर्स, घड्या केलेल्या पिशव्या, असंख्य बिलं, पावत्या कोंबलेली ढबोळी पर्स, ना भाजीची किंवा डब्याची पिशवी, ना मळखाऊ, इस्त्री केला असलातरी सुरकुत्या पडलेला ड्रेस, आणि जेमतेम केसांवरून कंगवा फिरवला न फिरवला वाटावे असा अस्ताव्यस्त केशसम्भार.
आपल्याच गावातील व्यक्तीला तिनं आजपर्यंत कधी बघितलेलही नाही या गोष्टीचं सीमाला आश्चर्य वाटत होतच. आणि तरीसुद्धा त्याच्यासोबत यायला तयार झाली, याबद्दल ती स्वत:लाच दोष देऊ लागली. अशा काळोख्या रात्री, सुनसान रस्त्यावर आपण उभ्या आहोत, आणि आपल्याजवळ... या विचारानेच सीमाच अवसान गळाल. काय कराव सुचेना. शेवटी धीर एकवटून ती विसाजीकडे वळाली ; पण समोरील दृश्य पाहून घाबरून किंचाळत मागे सरकली व डोळे गच्च मिटून घेतले. तिला घाबरवण्यासाठी तोंडाजवळ धरलेली बॅटरी बाजूला करीत विसाजी म्हणाला.
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
आता मात्र मी अगदी रडकुंडीलाच आलेले. "हे धरणीमय मला पोटात घे" असा मनातल्या मनात सीतामाई प्रमाणे धावा सुरूच होता.
एकास पळ म्हणावे, दुसऱ्यास धर म्हणावे, तिसऱ्यास बघ म्हणावे आणि चवथ्यास म्हणावे की तुजला काही कुमक पाहिजे असल्यास आम्ही आहोतच. आपण येकदा बसून बोलिले पाहिजे..!
दहा दिशांनी दहा नौका सोडोन मनासारिखे घडेतो दुरून पहात बैसावे. ऐशी पवारसाहेबी मसलत. त्याच पवारसाहेबी गोटात गलबला जाहला त्याचि गोस्ट.
परंतु हे ही खेळ अवघे साहेबांचेच आहेत, असे लोक म्हणताति. खरे खोटे ईश्वर जाणे.
उचलेगिरी केलेल्या म्हणजे चोरीची गाणी, रीमेक, परवानगी सहीत घेतलेली किंवा योगायोगाने साधर्म्य असलेली अशी गाणी याबद्दल चर्चा करण्यासाठी धागा.
हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत.